कोळसा मंत्रालय
देशातील पहिल्या कोळसा खाणी व्यावसायिक लिलाव प्रक्रीयेच्या ऐतिहासिक यशस्वितेतून राज्यांना 6,656 कोटी रुपये वार्षिक महसूल मिळणार- प्रल्हाद जोशी
Posted On:
09 NOV 2020 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2020
देशातील पहिल्या कोळसा खाणी व्यावसायिक लिलाव प्रक्रीयेच्या ऐतिहासिक यशस्वितेतून राज्यांना 6,656 कोटी रुपये वार्षिक महसूल मिळेल अशी माहिती, केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे ही लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानिमित आज नवी दिल्लीत जोशी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. देशातील 19 खाणींचा लिलाव यशस्वीपणे पूर्ण झाला असून कोळसा लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच खाणींचा लिलाव पूर्ण झाला आहे, असे जोशी यांनी सांगितले.
“या लिलाव प्रकियेचे परिणाम ऐतिहासिक असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखील सरकारचा, कोळसा क्षेत्र व्यावसायिक लिलावासाठी खुले करण्याचा निर्णय योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे सिद्ध करणारा आहे, तसेच भारताला कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे,” असे जोशी यांनी सांगितले. 18 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोळसा खाणींच्या पहिल्या व्यावसायिक लिलाव प्रक्रियेचे उद्घाटन केले होते.
या खाणींसाठी एकाहून एक सरस बोली लावली गेली आणि कंपन्यांनी मोठी रक्कम देऊ केली, असेही त्यांनी सांगितले. सर्वाधिक बोली 66.75% प्रीमियम वर होती, तर सरासरी प्रीमियम 29%. टक्के एवढे होते, असे जोशी म्हणाले.
ज्या खाणींचा लिलाव यशस्वी झाल्या आहेत त्या 19 खाणी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि झारखंड या राज्यातील आहेत. या सर्व खाणींची एकत्रित पीक रेटेड कपॅसिटी- PRC प्रतिवर्ष 51 दशलक्ष टन इतकी आहे.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671546)
Visitor Counter : 174