शिक्षण मंत्रालय
केंद्रिय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते आयआयटी मुंबई आयोजित राष्ट्रीय शिक्षण दिवस कार्यक्रमाचे आभासी माध्यमातून उद्घाटन
Posted On:
10 NOV 2020 7:25PM by PIB Mumbai
केंद्रिय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल `निशंक` यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवत, राष्ट्रीय शिक्षण दिवस (राष्ट्रीय शिक्षा दिवस) कार्यक्रमाचे आभासी माध्यमातून आज उद्घाटन केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (आयआयटी) यांच्या वतीने भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती, 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन हे समारंभाचे सन्माननीय अतिथी होते.
राष्ट्रीय शिक्षण दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री पोखरियाल आपल्या भाषणात म्हणाले, ``भारतात शिकणे, भारतात राहणे आणि शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण`, असे असले तरी या माध्यमातून आम्ही शिक्षणाचे केंद्र म्हणून भारताची स्थापना करण्यास वचनबद्ध आहोत. शिक्षणाचा उच्च दर्जा सुनिश्चित करण्यासाठी, जगातील आघाडीच्या विद्यापीठांच्या बरोबर सहकार्य, समन्वय आणि करार करण्यासाठी देखील आता पुढे येणे अतिशय आवश्यक झाले आहे. जगभरातील सर्वोच्च 100 विद्यापीठांच्या शैक्षणिक संस्था भारतामध्ये सुरू करण्याचे आमंत्रण देऊन याचा अंतर्भाव एनईपी 2020 मध्ये करण्यात आला आहे.``
आज @iitbombay द्वारा हमारे देश के प्रथम शिक्षा मंत्री भारत रत्न डॉ. मौलाना अब्दुल कलाम साहब के जन्मदिन 'शिक्षा दिवस' के सुअवसर पर #NEP2020 पर आयोजित कार्यशाला में नई शिक्षा नीति के वास्तुकार पद्म विभूषण डॉ.के कस्तूरीरंगन जी एवं अन्य गणमान्य शिक्षाविदों के साथ सहभागिता की। pic.twitter.com/9PL7yOYfq5
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) November 10, 2020
Inaugurating @iitbombay’s National Education Day programme & workshop on #NEP2020. @SanjayDhotreMP @EduMinOfIndia @mygovindia @PIB_India @MIB_India https://t.co/2YR6wsMXsu
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) November 10, 2020
श्री पोखरियाल यांनी नमूद केले की आयआयटी मुंबई ही एक अग्रगण्य जागतिक तंत्रज्ञान संस्था आहे जी नवनिर्मिती करणाऱ्यांना परिवर्तनात्मक शिक्षण प्रदान करते, आणि उद्योग क्षेत्रासाठी आणि समाजासाठी नवीन ज्ञानभांडार निर्माण करते. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची, एनईपी 2020 ची अंमलबजावणी हे देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये निश्चितच बदल घडवून आणेल, असे त्यांनी नमूद केले. भारताला अत्युच्च पातळीवर नेण्यासाठी संशोधन आणि विकास कार्याच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या सर्व पुरस्कारार्थींचे मंत्र्यांनी अभिनंदन केले. आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिश चौधरी म्हणाले, `` राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याची शिक्षण मंत्रालयाकडून तयार करण्यात आले आहे, जे त्याच्या व्यापीमध्ये खूप मोठे आहे, आणि योग्य पद्धतीने ते आत्मसात केल्यास भारतातील सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची आम्हाला अपेक्षा आहे.``
आयआयटी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक जयकृष्णन नायर यांना त्यांनी केलेल्या `स्मार्ट, नूतनीकरणक्षम – समृद्ध ऊर्जा ग्रीडमधी अनिश्चिततेचे व्यवस्थापन` या बाबतच्या उल्लेखनीय संशोधनातील योगदानासाठी आणि आयआयटी मुंबईच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. वरूण भालेराव यांना `गुरुत्वाकर्षणाच्या लहरी स्त्रोतांचे विद्युत चुंबकीय भाग` या विषयावरील उल्लेखनीय संशोधनासाठी क्रिएटिव्ह रिसर्च – 2019 साठी कृतीराममृतम पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सन्माननीय अतिथी डॉ. के. कस्तुरीरंगन त्यांच्या भाषणात म्हणाले, ``राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे शिक्षणाकडे एकात्मिक परंतु, लवचिक दृष्टिकोन दर्शविते, शिक्षणाच्या विविध टप्प्यांमधील परस्पर संपर्काची योग्य पद्धतीने दखल घेतल्यामुळे देशाला अखेरच्या टप्प्यापर्यंत शैक्षणिक पथदर्शक मार्गाची अखंडता, सुसंगतता आणि प्रक्रिया सक्षम करता येईल.``
Research Publication Awards
Sr. No.
|
Awardee (Prof.)
|
Department/Centre
|
Theme Title
|
-
|
MaheswaranShanmugam
|
Chemistry
|
Influence of diamagnetic ion on slow relaxation of magnetization of lanthanide ion
|
-
|
NutanLimaye
|
Computer Science and Engineering
|
Exploring the Frontiers of Algebraic Computations
|
-
|
Rajneesh Bharadwaj
|
Mechanical Engineering
|
Complex fluid droplets on engineered surfaces
|
-
|
SoumyoMukherji* and SuparnaMukherji%
|
*Biosciences and Bioengineering & % Environmental Science and Engineering
|
Synthesis and Immobilization of Silver Nanoparticles, and their Application in Water Disinfection
|
-
|
SubhankarKarmakar
|
Environmental Science and Engineering
|
Precipitation extremes and urban flood management
|
Research Dissemination Awards
S. No.
|
Awardee (Prof.)
|
Department/Centre
|
Title / Details
|
-
|
Hetu C. Sheth
|
Earth Sciences
|
Monograph: A Photographic Atlas of Flood Basalt Volcanism; Springer, New York (2018), 363
|
-
|
Parinda Vasa
|
Physics
|
Strong light-matter interaction in quantum emitter/metal hybrid nanostructures; ACS Photonics 5(1) (2018), pp. 2-23
|
-
|
Raghavan B. Sunoj
|
Chemistry
|
Mechanistic Insights on Cooperative Catalysis through Computational Quantum Chemical Methods; ACS Catalysis. 5, (2015) 480−503
|
Early Research Achiever Awards
Sr.
No.
|
Awardee (Prof.)
|
Department/Centre
|
-
|
Pradip P. Kalbar
|
Centre for Urban Science and Engineering
|
-
|
ShobhnaKapoor
|
Chemistry
|
-
|
VarunBhalerao
|
Physics
|
M.Iyengar/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671774)
Visitor Counter : 1212