विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग देशातील वेगाने बदलणाऱ्या भविष्यकालीन गरजांवर कार्य करत आहे: सचिव प्रा.आशुतोष शर्मा
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवनिर्माण क्षेत्राचे क्षितिज विस्तारत आहे आणि कंपन्यांनी, धोरणकर्त्यांनी आणि संस्थांनी याचा उपयोग आर्थिक वृध्दी साठी आणि समृद्धीसाठी करायला हवा: डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम, प्रमुख अर्थ सल्लागार(CEA), भारत सरकार
Posted On:
09 NOV 2020 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2020
देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाला नुकतीच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या वेबिनारमधे बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सचिव प्रा.आशुतोष शर्मा म्हणाले ,की विज्ञान ,तंत्रज्ञान विभाग (DST)नवनिर्माण,स्टार्ट अप यांच्यावर भर देत नवे रोजगार आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून वेगवान गतीने आणि मापदंडांनी बदलणाऱ्या देशाच्या भविष्यकालीन गरजांसाठी कार्य करत आहे.
डीएसटी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सर्वच क्षेत्रांत आपली शक्ती आणि क्षमता विकसित करत आहे. गेल्या पाच वर्षांत आमचे अंदाजपत्रक दुपटीने वाढले आहे आणि त्यामुळे आम्ही विज्ञान,तंत्रज्ञान आणि नवनिर्माण क्षेत्रातील नवनवीन क्षेत्रे काबीज करत असून ,या नवनिर्मितीचा उपयोग देशाचे भविष्य समृध्द करण्यासाठी देशाला मदत करत आहोत,असे प्रा.शर्मा म्हणाले. ते, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संप्रेषण राष्ट्रीय परीषद(NCSTC) आणि विज्ञान प्रसार यांनी “विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग संघटना सुवर्ण जयंती मालिका-महामारीची दुसरी बाजू” या विषयावर आयोजित केलेल्या वेबिनारमधे बोलत होते.
यावेळी बोलताना, भारत सरकारचे प्रमुख अर्थ सल्लागार(CEA)डॉ. कृष्णमूर्ति सुब्रमण्यम यांनी यांची राष्ट्रनिर्मिती आणि देशाची आर्थिक प्रगती यामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची भूमिका आणि वेगाने बदलणाऱ्या विश्वातील मार्ग यावर चर्चा केली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची राष्ट्र निर्मिती मधील पूरक भूमिका विशद करताना ते म्हणाले,"आर्थिक वृद्धीत नवनिर्मितीची महत्त्वाची भूमिका आहे. आपण आतापर्यंत चांगले काम केले आहे, परंतु पुढील 50 वर्षांचा विचार करता विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे क्षितिज विस्तारत आहे हे लक्षात घेऊन आपल्या कंपन्या, धोरणकर्ते आणि संस्थांनी याचा वापर देशातील प्रश्नांच्या संशोधनासाठी कार्यान्वित करून आर्थिक प्रगती आणि समृद्धी साध्य करायला हवी.अन्वेषक नवनिर्मिती ही पथदर्शक असते पण त्यात असफलता येऊ शकते ,म्हणून असफलतेला ही पथदर्शक परीणामांसाठी मोकळीक द्यायला हवी".
त्यांनी सावधगिरी बाळगण्याची आणि या महामारीच्या युरोप आणि इतर देशात आलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या गंभीर परीणामांपासून दूर रहाण्यासाठी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, अनेकदा हात धुणे ,गर्दी टाळणे आणि शारिरीक अंतर राखणे हे कोविड-19चे शिष्टाचार पाळण्यावर यावेळी भर दिला.

* * *
M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671478)
Visitor Counter : 229