PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 04 NOV 2020 8:08PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 4 नोव्हेंबर 2020

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

Text Box: •	India's active caseload stands at 5,33,787•	Total recovered cases are more than 76.5 Lakhs•	National Recovery Rate has surpassed 92% (92.09%)•	53,357 patients have recovered in the last 24 hours whereas the new confirmed cases stand at 46,253•	Cumulative tests are nearly 11.3 crore, with 12,09,609 tests conducted in the last 24 hours•	6 women led Startups win COVID-19 Shri Shakti Challenge

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

 

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने पुढील निर्णय घेतले आहेत.

भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

भारत आणि स्पेन यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

दूरसंचार आणि माहिती-प्रसारण तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्याविषयीच्या भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

210 मेगावॅटच्या लुहरी जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 1,810 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि.5 नोव्हेंबर, 2020 रोजी जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (व्हीजीआयआर) होणार आहे. या परिषदेचे आयोजन भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय आणि राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

कोविड-19 मधून बरे होणाऱ्यांची दरदिवशी वाढती संख्या आणि मृत्यूदरातील घट यामुळे भारताची कोविड रुग्णसंख्येतील घट नोंदवण्याकडे स्थिर वाटचाल सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी, आज उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाखांहून कमी नोंदली गेली.

भारतात आज 5,33,787 जण बरे झाल्याचे नोंदवले गेले.

देशातील एकूण बाधित रूग्णांपैकी उपचार सुरू असलेले (Active) रुग्ण फक्त 6.42% एवढेच आहेत, 16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील बाधित रूग्णांची सरासरी राष्ट्रीय सरासरीहून कमी आहे.

रोगमुक्तांच्या एकूण संख्येने आज 76.5 लाखांचा आकडा (76,56,478) पार केला. बरे होणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे राष्ट्रीय रोगमुक्तीचा दरसुद्धा सातत्याने वाढत आहे. रोगमुक्तीच्या राष्ट्रीय स्तरावरील दरानेसुद्धा 92 (92.09%) टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.

संपूर्ण देशात गेल्या 24 तासांमध्ये 53,285 जणांना बरे होऊन सुट्टी मिळाली तर 46,253 ही नवी रूग्णसंख्या नोंदवली गेली.

गेल्या 24 तासात 514 मृत्यू नोंदवले गेले. यापैकी 80% मृत्यू 10 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात नोंदवले गेले. गेल्या 24 तासात दैंनदिन मृत्यूसंख्येची नोंद महाराष्ट्रात सर्वाधिक झाली.

भारताचा मृत्यूदर 1.49 % वर आला आहे.

16 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात दर दशलक्षामागील मृत्यूंची संख्या राष्ट्रीय सरासरीहून कमी नोंदवली गेली.

 

इतर अपडेट्स:

एका महत्त्वपूर्ण घटनेत, भारताची सार्वजनिक क्षेत्रातील प्रसारक प्रसार भारतीने भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फोर्मेटीक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत परस्पर सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या कक्षेत 51 डिटीएच शिक्षण दूरचित्रवाहिन्या, यात स्वयंप्रभा (22 वाहिन्या) (शिक्षण मंत्रालय), -विद्या इयत्ता 1 ली ते 12 वी या एनसीईआरटीच्या 12 वाहिन्या, वंदे गुजरात, या गुजरात सरकारच्या 16 वाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या डिजीशालाची एक वाहिनी डिडी को-ब्रँडेड रुपाने दूरदर्शनच्या फ्री डिश दर्शकांसाठी उपलब्ध असेल.

 

पंजाबमध्ये आंदोलकांनी रेल्वे मार्ग रोखल्यामुळे मालवाहतूक स्थगित ठेवणे भाग पडत आहे. रेल्वे सेवेद्वारे महत्वाची धान्ये वाहून नेणाऱ्या 2,225 मालवाहतूक बोगी आजपर्यंत धावू शकल्या नाहीत आणि यामुळे या आधीच 1,200 कोटी रुपयांहून जास्त तोटा झाला आहे.

 

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान भारतीय जनौषधि परियोजनेची (पीएमबीजेपी) सर्वसमावेशक आढावा बैठक घेतली. बैठकीत गौडा यांनी बीपीपीआय टीमचे कोविड -19 च्या कठीण काळात लोकांना परवडणाऱ्या दरात मास्क तसेच औषधे आणि इतर उत्पादनांचा पुरवठा केल्याबद्दल अभिनंदन केले.

 

गुंतवणूकीबाबत भारत-युएई उच्चस्तरीय संयुक्त कृती दलाची आठवी बैठक (संयुक्त कृती दल) कोविड -19 महामारीमुळे आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आली. संयुक्त कृती दलाच्या या बैठकीत कोविड -19 च्या अलिकडच्या आव्हानात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक घडामोडींन चालना मिळावी या उद्देशाने परस्पर हिताच्या क्षेत्रात गुंतवणूक आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे अधिक महत्वाचे असल्यावर उभय देशांनी सहमती दर्शवली.

 

यूएन वुमनच्या सहकार्याने मायगव्हने आयोजित केलेल्या कोविड-19 श्री शक्ती चॅलेंजमध्ये 6 महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप्सने विजय मिळविला आहे. कोविड19 विरुद्धच्या लढ्यात अभिनव उपाय घेऊन पुढे येण्यासाठी किंवा महिलांसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सने पुढे यावे या उद्देशाने यूएन वुमनच्या सहकार्याने मायजीओव्ही ने कोविड -19 श्री शक्ती चॅलेंज एप्रिल 2020 मध्ये सुरू केले.

 

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनीकोविड -19 नंतर भांडवल बाजाराच्या माध्यमातून आर्थिक पुनरुज्जीवनवरील वेबिनारचे उद्घाटन केले. भारतीय कंपनी सचिव संस्था (आयसीएसआय-एनआयआरसी), नवी दिल्ली यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते.

 

महाराष्ट्र अपडेट्स:

भारतातील कोविड -19 रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे, असं असलं तरी गेल्या 15 दिवसांत नवीन रुग्णांची संख्या जवळजवळ अर्ध्यावर गेली आहे आणि मृत्यूही कमी होत आहेत. सरकारी अधिकारी आणि आरोग्य तज्ञांनी असे म्हटले आहे की नवीन रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूमध्ये होणाऱ्या घसरणीमागे अनेक कारणे आहेत, ती पुढीलप्रमाणे - गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या उद्दिष्ट पूर्ण चाचण्या, मोठ्या प्रमाणात विषाणूच्या संपर्कात आलेली लोकसंख्या, विषाणूचा कमी होत असलेला प्रादुर्भाव, आणि हळूहळू सुरू झालेली अन लॉक प्रक्रिया. हिवाळा, दिवाळी आणि लोकांची वर्दळ सुरू झाल्यामुळे जानेवारीत कोविड19 चे रुग्ण पुन्हा वाढू शकतात असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. म्हणूनच इतक्यात आनंदी होणं घाईचं ठरेल. महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1.16 लाख आहे.

 

M.Chopade/S.Tupe /P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1670196) Visitor Counter : 16