इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
यूएन वुमनच्या सहकार्याने मायगव्हने आयोजित केलेल्या कोविड-19 श्री शक्ती चॅलेंजमध्ये 6 महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप्सने मिळविला विजय
Posted On:
03 NOV 2020 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2020
यूएन वुमनच्या सहकार्याने मायगव्हने आयोजित केलेल्या कोविड-19 श्री शक्ती चॅलेंजमध्ये 6 महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप्सने विजय मिळविला आहे. कोविड19 विरुद्धच्या लढ्यात अभिनव उपाय घेऊन पुढे येण्यासाठी किंवा महिलांसंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सने पुढे यावे या उद्देशाने यूएन वुमनच्या सहकार्याने मायजीओव्ही ने कोविड -19 श्री शक्ती चॅलेंज एप्रिल 2020 मध्ये सुरू केले.
मायगव्हच्या इनोव्हेट प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेले हे एक आगळेवेगळे आव्हान होते ज्यामध्ये महिलांच्या नेतृत्वातील स्टार्टअप्स तसेच महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या स्टार्टअप्स कडून अर्ज मागविण्यात आले होते.
हे चॅलेंज दोन टप्प्यात राबविण्यात आले: आयडिएशन स्टेज आणि प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट (पीओसी) स्टेज. देशभरातून एकूण 1265 प्रवेशिकांसह या आव्हानाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
यामधून 25 प्रवेशिकांची निवड करण्यात आली. आणि नंतर त्यातून अंतिम 11 स्टार्टअप्स निवडण्यात आले. निवडलेल्या सर्व 11 स्टार्टअपना त्यांच्या कल्पनांचा विकास करण्यासाठी प्रत्येक 75000 रुपयांची बक्षिसे दिली गेली.
स्टार्टअप्स च्या कल्पनांचा विकास करण्याच्या उद्देशाने काही मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये वित्तीय, कायदेविषयक, विपणन यासारख्या विषयांचा समावेश होता.
आवक्या कल्पनांना उपाय म्हणून अंतिम स्वरूपात विकसित करण्यासाठी 11 स्टार्टअप्सना वेळ दिल्यानंतर, 27 ऑक्टोबर 2020 रोजी पुन्हा निवड समितीला अंतिम सादरीकरणे देण्यात आली. यापैकी उत्तम 3 विजेत्यांची 'प्रोमोटिंग सोल्युशन्स' म्हणून निवड करण्यात आली. विजेत्यांसाठी पूर्वी जाहीर झालेल्या पाच लाख रुपयांच्या बक्षीसांव्यतिरिक्त, यूएन वुमनने या 3 स्टार्टअप्सना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्यास सहमती दर्शविली.
पहिल्या 3 विजेत्यांमध्ये, डॉ. पी. गायत्री हेला,संस्थापक, बेंगळुरू-आधारित रेसाडा लाइफसेन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, कर्करोगाशी लढलेल्या रोमिता घोष , संस्थापक, सिमलास्थित आयएचएल हेल्थटेक प्रायव्हेट लिमिटेड, डॉ. अंजना रामकुमार आणि डॉ. अनुष्का अशोकन, प्रॉडक्ट मॅनेजर आणि सह-संस्थापक, केरळ स्थित थानमत्र इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
तर ‘सोल्युशन्स प्रॉमिसिंग' म्हणून निवडलेल्या पहिल्या 3 स्टार्टअप्समध्ये वासंती पलानीव्हल, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक, बेंगळुरू स्थित सेरेजन बायो थेरेप्यूटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, शिवि कपिल, सहसंस्थापक, बेंगळुरू-आधारित एम्पाथी डिझाईन लॅबस्टॅट, जया पराशर आणि अंकिता पाराशर ही आई आणि मुलिची जोडी, संस्थापक आणि सहसंस्थापक, स्ट्रीम माइंड्स आणि एड-टेक यांची निवड करण्यात आली आहे.
मायगव्हने श्री शक्ती चॅलेंजच्या विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना आशा आहे की या स्टार्टअप्सद्वारे विकसित केलेल्या अभिनव कल्पना, कोविड19 च्या विरोधात लढा देण्यासाठी आणि अर्थातच महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी मदत करेल.
* * *
B.Gokhale/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669885)
Visitor Counter : 211