माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रसार भारतीचा भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स आणि जिओ-इन्फॉर्मेटीक्स सोबत सामंजस्य करार

Posted On: 04 NOV 2020 5:36PM by PIB Mumbai

 

एका महत्त्वपूर्ण घटनेत, भारताची सार्वजनिक क्षेत्रातील प्रसारक प्रसार भारतीने भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फोर्मेटीक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत परस्पर सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या कक्षेत 51 डिटीएच शिक्षण दूरचित्रवाहिन्या, यात स्वयंप्रभा (22 वाहिन्या) (शिक्षण मंत्रालय), ई-विद्या इयत्ता 1 ली ते 12 वी या एनसीईआरटीच्या 12 वाहिन्या, वंदे गुजरात, या गुजरात सरकारच्या 16 वाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या डिजीशालाची एक वाहिनी डिडी को-ब्रँडेड रुपाने दूरदर्शनच्या फ्री डिश दर्शकांसाठी उपलब्ध असेल.

यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागासह प्रत्येक घरात दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे. सर्व दर्शकांना ही सुविधा कौशल्य विकास आणि देशातील शेवटच्या व्यक्तीस दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेनुसार 24x7, मोफत असणार आहे. सर्वांना शिक्षण देण्याचे सरकारचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सरकारचा हा उपक्रम आहे. 

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670080) Visitor Counter : 171