मंत्रिमंडळ

दूरसंचार आणि माहिती-प्रसारण तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्याविषयीच्या भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 04 NOV 2020 5:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आज भारत आणि इंग्लड यांच्यात दूरसंचार आणि माहिती व प्रसारण तंत्रज्ञान सहकार्या(आयसिटी) बाबतच्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. भारताचे दूरसंचार मंत्रालय आणि इंग्लंडमधील डिजिटल, संस्कृती, माध्यमे आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात हा करार केला जाणार आहे.

या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशात, दूरसंचार तसेच माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत. ब्रेक्झीट म्हणजे, युरोपीय महासंघातून इंग्लंड बाहेर पडल्यानंतरच्या या सामंजस्य करारामुळे भारताला या क्षेत्रात सहकार्य आणि संधींसाठी अधिक वाव मिळणार आहे. या करारांतर्गत पुढील सामाईक हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणे निश्चित करण्यात आले:-

a. दूरसंचार/माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञान धोरण आणि नियमन;

b. स्पेक्ट्रम व्यवस्थापन;

c. मोबाईल रोमिंगसह दूरसंचार संपर्कयंत्रणा;

d. दूरसंचार/आयसीटी तंत्रज्ञान प्रमाणीकरण आणि चाचण्या तसेच प्रमाणित करणे;

e. वायरलेस संपर्क यंत्रणा;

f. दूरसंचार/आयसिटी क्षेत्रात तंत्रज्ञान विकास, यात, 5-जी, इंटरनेट ऑफ थिंग्स/ मशीन टू मशीन, क्लाऊड कॉम्पुटिंग, बिग डेटा इत्यादी अभिप्रेत.

g. दूरसंचार पायाभूत सुविधांची सुरक्षितता, दूरसंचार सेवांची व्यवस्था आणि सेवांचा वापर करतांनाची सुरक्षितता.

h. उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात क्षमता बांधणी आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे तज्ञांची देवघेव;

नवनवे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याबाबत जिथे गरज असेल तिथे माहितीची देवघेव आणि संशोधन व विकासकार्यात समन्वय साधणे;

j. दूरसंचार आणि माहिती-संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रात सहभागी देश किंवा इतर देशातही एकत्र काम करण्याच्या संधी शोधणे;

k.  दूरसंचार/ आयसिटी उद्योगांची शिष्टमंडळे आणि त्यांचे दौरे, विविध उपक्रम किंवा प्रदर्शने यांच्या माध्यमातून परस्परांना व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानविषयक सुविधा आणि संधी उपलब्ध करुन देणे; आणि 

l.  या करारातील दोन्ही पक्षांच्या परस्परसंमतीने दूरसंचार/ आयसिटी क्षेत्रातील इतर कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य, जे या सामंजस्य कराराच्या कक्षेत येऊ शकेल.

******

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670061) Visitor Counter : 279