कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

भारत कोविड-19 नंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेत जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येईल : डॉ. जितेंद्र सिंह


ईशान्य प्रदेशातील विकास भारतीय अर्थव्यवस्थेसाठी “नवीन इंजिन” म्हणून काम करेल

Posted On: 03 NOV 2020 7:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2020

 

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पंतप्रधान कार्यालय,  कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन,  अणु उर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह यांनी आज “कोविड -19  नंतर भांडवल बाजाराच्या माध्यमातून  आर्थिक पुनरुज्जीवन” वरील वेबिनारचे उद्घाटन केले.. भारतीय कंपनी सचिव संस्था (आयसीएसआय-एनआयआरसी), नवी दिल्ली यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  सक्षम नेतृत्वाखाली  भारत कोविड -19 नंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक नेतृत्व म्हणून उदयाला येईल . ते म्हणाले की, लवकरात लवकर लॉकडाउन लागू करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने उचललेल्या प्रतिबंधक पावलामुळे अनेकांचे जीव  वाचले आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान टाळता आले.  लॉक-डाउन कालावधीने आपल्याला जीवनाचे बरेच धडे दिले आहेत आणि ही प्रतिकूल परिस्थिती आपल्यासाठी चांगली सवय  म्हणून उदयाला  आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेत ईशान्य प्रदेशाच्या भूमिकेविषयी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविड -19 नंतर ईशान्य प्रदेश युरोपियन पर्यटनस्थळांना पर्याय ठरेल, कारण ईशान्य भागात वेळेवर लॉक-डाउन लागू केल्यामुळे खूप कमी  कोविड रुग्ण  आढळून आले.

ते म्हणाले की कोविड -19 नंतर ईशान्य प्रदेश हा भारतातील सर्वाधिक पसंतीच्या  व्यावसायिक स्थळांपैकी एक असेल आणि बांबू हा आर्थिक घडामोडींचा प्रमुख आधारस्तंभ ठरेल. महामारीच्या गडद ढगांमध्ये बांबू हे रुपेरी रेषा असल्याचे  वर्णन करताना डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविडनंतरच्या काळात ईशान्य प्रदेश आणि संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यास यामुळे मदत होईल. कोविड 19  नंतर भारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यात  ईशान्य प्रदेश महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्याचा विकास अर्थव्यवस्थेसाठी “नवीन इंजिन” म्हणून काम करेल असेही त्यांनी नमूद केले.

देशाचा आर्थिक विकास कायम राखण्यात कंपनी सचिवांच्या भूमिकेचे कौतुक करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, असे वेबिनार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) च्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवतील आणि व्यापार धोरणात महत्वाची माहिती देऊन देशाच्या विकासात सहभागी होण्याबाबत त्यांचे मनोबल उंचावतील. सहभागी झालेल्यांच्या बहुमूल्य योगदानामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवण्यात हितधारकांना मदत होईल, अशी आशा त्यांनी  व्यक्त केली.

सीएस आशिष गर्ग, अध्यक्ष आयसीएसआय, सुरेश पांडे, अध्यक्ष आयसीएसआय आणि अन्य प्रमुख वक्तांनी वेबिनारला संबोधित केले.

 

* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669844) Visitor Counter : 143