PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
27 OCT 2020 8:05PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 27 ऑक्टोबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील लाभार्थींबरोबर संवाद साधला
नीति आयोग आणि पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख तेल आणि गॅस कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) संवाद साधला. ऊर्जा मानव विकासाच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे ऊर्जा क्षेत्राच्या बाबतीत संवाद साधणे महत्त्वाचे आहे, यावर या संवादादरम्यान पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या इंडिया एनर्जी फोरममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बीजभाषण केले. यावर्षीची संकल्पना "बदलत्या जगात भारताचे ऊर्जा भविष्य" होती. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताकडे भरपूर ऊर्जा आहे आणि ऊर्जा भविष्य प्रकाशमान आणि सुरक्षित आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) आज आदेश जारी करून सर्व व्यवहार पुन्हा सुरु करण्याबाबत दि 30.09.2020 रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम ठेवल्या असून त्या 30.11.2020 पर्यंत लागू राहतील. बर्याच व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे, तर मोठ्या संख्येने लोक एकत्र जमण्याच्या काही विशिष्ट प्रसंगांमध्ये काही निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे आणि आरोग्य आणि सुरक्षिततेच्या खबरदारीबाबत कार्य पद्धतीचे पालन अनिवार्य आहे. यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे - मेट्रो रेल; शॉपिंग मॉल्स; हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि आतिथ्य सेवा; धार्मिक स्थळे, योग आणि प्रशिक्षण संस्था; व्यायामशाळा; चित्रपटगृहे मनोरंजन पार्क इ.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
देशातील कोविड परिस्थिच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेण्यात आली.
भारतात 10 कोटींहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्के आहे तर भारतात रुग्ण बरे होण्याची संख्या जगात सर्वाधिक आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी दिली.
भारतात, प्रति दशलक्ष रुग्ण संख्या आणि प्रति दशलक्ष मृत्यू जगात सर्वात कमी असल्याचे ते म्हणाले. एक लाखावरून दहा लाख रुग्ण बरे होण्यासाठी आम्हाला 57 दिवस लागले, पण नुकतेच बरे झालेल्या 10 लाख रुग्णांची नोंद केवळ 13 दिवसात झाली आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतामध्ये दैनंदिन कोविड रुग्णसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान 83,232 वरून 21 ते 27 ऑक्टोबरमध्ये 49,909 इतकी घट झाली आहे. गेल्या 24 तासात 36,470 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, असे ते म्हणाले.
कोविडमुळे होणाऱ्या मृत्यू दरात सतत घट होत आहे. 1 सप्टेंबर ला हा दर 1.77 टक्के होता, तो आता 27 ऑक्टोबर रोजी 1.50 टक्के झाला आहे. बहुतेक राज्य/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर 1.50 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे त्यांनी सांगितले.
78 टक्के सक्रिय रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात असून सुमारे 21.5% सक्रिय रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. एकूण मृत्यूपैकी 86 टक्के मृत्यू 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहेत तर 36 टक्के हून अधिक मृत्यू महाराष्ट्रात आहेत. गेल्या 24 तासात झालेल्या मृत्यूंमध्ये 5 राज्यांचा 58 वाटा आहे, यात महाराष्ट्रात सर्वाधिक मृ्त्यू झाले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
गेल्या 24 तासात नोंद झालेले सुमारे 50 टक्के नवीन कोविड रुग्ण 5 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील असून यापैकी महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. केरळमध्ये सर्वाधिक 4287 नवीन रुग्णांची नोंद झाली तर महाराष्ट्रात 3645 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
कोविड संदर्भात योग्य वर्तन आत्मसात करणे अतिशय महत्वाचे असून या सण-उत्सवाच्या काळात, मास्कचा वापर करा, हात वारंवार धुवा, सुरकाहित सामाजिक अंतर राखा असे त्यांनी सांगितले.
इतर अपडेट्स:
- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल म्हणाले, की भविष्यकालीन दृष्टी आणि सक्षम निर्णयशक्ती यांच्या संयोगामुळे भारतातील स्टार्ट अप्सच्या वातावरणाला पुष्टी मिळाली आहे. शांघाय सहकारी संस्थेच्या(SCO) पहिल्या स्टार्ट अप मंचाचे उद्घाटन त्यांनी आज केले ,या प्रसंगी ते म्हणाले ,की युवावर्ग ही आमची संपत्ती असून सध्याच्या या असुरक्षिततेच्या आणि अनिश्चिततेच्या काळात, त्यांनी चापल्य,समायोजकता आणि क्षमता दाखवत प्रतिसाद दिला आहे.
- बनावट बिलिंगद्वारे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम निर्माण करणाऱ्यांच्या मोठ्या रॅकेटचा शोध आणि जप्तीची कारवाई आयकर विभागाने 26.10.2020 रोजी सुरू केली आहे. दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथील 2 ठिकाणी शोध घेण्यात आला.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाविरुद्ध लढा देण्याच्या देशाच्या दृढ निश्चयाचा पुनरुच्चार केला आहे. या सुधारित तरतुदीनुसार केंद्र सरकारने सप्टेंबर, 2019 मध्ये चार आणि जुलै 2020 मध्ये नऊ जणांना दहशतवादी म्हणून घोषित केले.
- भारताला संपूर्ण जगाची कौशल्य विकसनाची राजधानी बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे,त्या दिशेने वाटचाल करताना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने एनसीव्हीईटी म्हणजेच राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने कौशल्य विकासन कार्यप्रणाली अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कृत संस्था आणि मूल्यांकन एजन्सी यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे, कार्य पुस्तिकेचे अनावरण आज केले. डिजिटल कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. कौशल्य भारत अभियानाअंतर्गत गुणवत्ता, सुधारित निकाल आणि प्रक्रियेचे प्रमाणिकरण यांचा समावेश आहे.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री डॉ. मार्क टी. इस्पर यांच्या दरम्यान मंत्रिस्तरीय बैठक झाली. नवी दिल्लीतल्या साउथ ब्लॉकमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये उभय नेत्यांनी व्दिपक्षीय संरक्षण सहकार्य, सुरक्षित संप्रेषण प्रणाली आणि माहितीचे सामायिकीकरण या विषयांवर चर्चा केली.
- सरकारच्या वतीने बालसंगोपन रजाविषयक नियमांमध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाकडून सुधारणा करण्यात आल्या आहेत. याची माहिती केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री, ईशान्य क्षेत्र विकास (स्वतंत्र कार्यभार) राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा आणि अंतराळ खात्याचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली. नियमांमधल्या या सुधारणांनुसार आता सरकारी कार्यालयातल्या पुरूष कर्मचारीही बाल संगोपनासाठी रजा घेण्यासाठी पात्र असणार आहेत
महाराष्ट्र अपडेट्स:
खासगी प्रयोगशाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या कोविड-19 आरटी-पीसीआर चाचण्यांसाठीचे दर महाराष्ट्र सरकारने सुमारे 200 रुपयांनी कमी केले आहेत. नवीन दर संकलनाच्या स्थानानुसार 980 ते 1800 दरम्यान असतील. पूर्वी हे दर 1200 ते 2000 दरम्यान होते. राज्यात चौथ्यांदा सरकारने आरटी-पीसीआर दर कमी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात 3,645 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी गेल्या 146 दिवसातील सर्वात कमी आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667957)
Visitor Counter : 175