अर्थ मंत्रालय
दिल्ली – एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथे आयकर विभागाची शोध मोहिम
Posted On:
27 OCT 2020 1:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020
बनावट बिलिंगद्वारे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम निर्माण करणाऱ्यांच्या मोठ्या रॅकेटचा शोध आणि जप्तीची कारवाई आयकर विभागाने 26.10.2020 रोजी सुरू केली आहे. दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथील 2 ठिकाणी शोध घेण्यात आला.
या शोधामुळे एन्ट्री ऑपरेटर, मध्यस्थ, रोख व्यवहार करणारे, लाभार्थी आणि त्यात समाविष्ट असलेल्या कंपन्या आणि कंपन्यांचे पूर्ण नेटवर्क उघडकीस आणणारे पुरावे जप्त केले गेले आहेत. आतापर्यंत रुपये 500 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या नोंदी असलेली कागदपत्रे सापडली आणि ती जप्त करण्यात आली आहेत.
बनावट बिले आणि दिलेली असुरक्षित कर्जे यांच्या विरुद्ध बेहिशेबी रक्कम आणि रोख रक्कम काढण्यासाठी एन्ट्री ऑपरेटरद्वारे बनावट संस्था / कंपन्यांचा शोध घेण्यात आला. वैयक्तिक कर्मचारी / सहकारी यांना बनावट घटकांचे बनावट संचालक / भागीदार बनविले गेले होते आणि सर्व बँक खाती या एन्ट्री ऑपरेटरद्वारे व्यवस्थापित आणि नियंत्रित केली जात होती. अशा एन्ट्री ऑपरेटर, त्यांचे बनावट भागीदार / कर्मचारी, रोख हाताळणारे तसेच समाविष्ट लाभार्थी यांचेही जबाब स्पष्ट नोंदविली गेले आहेत, जेणेकरून योग्य रकमेची पडताळणी होईल.
या शोधात अनेक बँक खाती नियंत्रक आणि लाभार्थी आणि पकडलेल्या व्यक्तींचे लॉकर सापडले, जे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्याच नावावर उघडले गेले होते. विश्वासू कर्मचारी आणि बनावट कंपन्या यांच्या संगनमताने डीजीटल माध्यमांद्वारे व्यवहार व्यवस्थापित करीत होते, त्याचाही पुढील तपास केला जात आहे.
लाभार्थ्यांनी मुख्य शहरे आणि भूसंपत्तीमध्ये कित्येक शेकडो कोटी रुपयांच्या ठेवींमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे आढळले आहे. या झडती दरम्यान 2.37 कोटी रुपये रोख आणि 2.89 कोटी रुपयांचे दागिने यासह 17 बँक खाती आढळली, जी खाती अद्याप वापरण्यात आलेली नाहीत.
पुढील तपास सुरू आहे.
U.Ujgare/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1667783)
Visitor Counter : 181