वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भविष्यकालीन दृष्टी आणि सक्षम निर्णयशक्ती यांच्या संयोगाने भारतातील स्टार्ट अप्सच्या भक्कम पर्यावरणाला मिळाली पुष्टी: पियुष गोयल

Posted On: 27 OCT 2020 2:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

केंद्रीय वाणिज्य  आणि  उद्योग मंत्री पियूष गोयल म्हणाले, की भविष्यकालीन दृष्टी आणि सक्षम निर्णयशक्ती यांच्या संयोगामुळे भारतातील स्टार्ट अप्सच्या वातावरणाला पुष्टी मिळाली  आहे. शांघाय सहकारी संस्थेच्या(SCO) पहिल्या स्टार्ट अप मंचाचे उद्‌घाटन त्यांनी आज केले ,या प्रसंगी ते म्हणाले ,की युवावर्ग ही आमची संपत्ती असून  सध्याच्या या असुरक्षिततेच्या आणि अनिश्चिततेच्या काळात, त्यांनी चापल्य ,समायोजकता आणि क्षमता दाखवत प्रतिसाद दिला आहे.

गोयल म्हणाले, की आमच्या स्टार्ट अप उद्योगांनी या कठोर प्रतिकूलतेचे  भविष्यकालीन सामर्थ्यात रुपांतर करत, आपल्या क्षमता सिध्द केल्या आहेत.स्टार्ट अप उद्योगांनी  उच्च श्रेणीच्या  ऊर्जेने आणि  उत्साहानेवेळेवर आणि वाजवी दरातील पर्याय उपलब्ध करण्याच्या दाखविलेल्या क्षमतांची  प्रशंसा करत  ते म्हणाले,की आपल्या प्रगतीची आस, ही आपण  बनविलेल्या( EdTech apps) शैक्षणिक तांत्रिक  ॲप्स मधील  सुधारणांतून आणि कोविडच्या काळात ज्याप्रकारे  लाखो भारतीयांना त्यातील मजकूर  शिकण्यासाठी विनामूल्य  उपलब्ध केला गेला, यातून दिसून येते.आपल्या सर्व युवावर्गाने अनेक महत्त्वाचे  अनुप्रयोग  केले , ज्यांचा उपयोग अनेक क्षेत्रे डिजिटल होण्यासाठी आणि महामारीच्या काळात आत्मविश्वासाने तोंड देण्यासाठी झाला आणि त्यामुळेच आपण अर्थव्यवस्था खुली करत आपला आर्थिक कारभार विस्तारू शकलो.

गोयल म्हणाले की, कोविडच्या महामारीला  भारतातील युवा वर्गाच्या कंपन्यांनी जलद  प्रतिसाद देत आणि गतीशीलतेने आपली उत्तम कार्यपद्धती आणि ज्ञान सामाईक करत, संघटना आणि गुंतवणूकदार यांना अंतर्भूत करत,लाभ  मिळवीत आणि भांडवल गतीमान करत,नवनवीन उद्योग उभे करत, ते वाढवत नेले आहेत. ते म्हणाले, की यामुळे स्टार्ट अप्स उद्योगांच्या नवनिर्माण संकल्पनांना अधिकाधिक चालना मिळेल.

गोयल म्हणाले ,की भारताला आपल्या पहिल्या राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार कार्यक्रमातून काही वेगवेगळ्या स्टार्ट अप्सचे महत्त्व कळले. ते पुढे म्हणाले,की आम्ही अधिकाधिक स्टार्ट अप्सनी उज्वल संकल्पनांसह पुढे यावे म्हणून  उत्साहवर्धक जाळे तयार केले असुन पंतप्रधान या सर्व स्टार्टअप्सच्या प्रतिबध्दतांच्या अग्रभागी आहेत,असे त्यांनी नमूद केले.

गोयल यांनी महिला उद्योजिकांना वाव देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करुन, त्यांनी  केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ते म्हणाले कीभारतातील  स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात स्टार्ट अप सुरू केले आहेत.श्री. गोयल म्हणाले की आजच्या स्टार्ट अप मंचाचे उदघाटन हे आज सहभागी होणाऱ्या सर्व राज्यांतील सदस्यांच्या प्रतिबध्दतेचा विस्तार करण्याच्या  आणि नवनिर्मितीचे संवर्धन करण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे.उद्योजकतेचे चैतन्य हा  एससीओ सदस्यांना एकत्र गुंफणारा धागा आहे.आजच्या एससीओच्या स्टार्ट अप मंचाचे उदघाटन  हे सर्व सहभागी होणाऱ्या सर्व राज्यांतील सदस्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनाचे आणि नवनिर्मितीचे संवर्धन करण्याचे प्रतिबिंब आहे,असे ही ते  म्हणाले.  ते पुढे म्हणाले की सर्व सदस्य राज्यांतील स्टार्ट अप नव्या पर्यावरणीय व्यवस्थेचा विकास करतील आणि त्यांना प्रोत्साहन देत स्टार्ट अप्सचा दृष्टिकोन विस्तारतील कारण   या जागतिकीकरण झालेल्या  विश्वात आपल्या प्रश्नांचे स्वरूप आणि परीणाम विस्तृत  झाले आहे.

 

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1667869) Visitor Counter : 187