कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

एमएसडीई आणि एनसीव्हीईटी यांच्यावतीने कौशल्य विकास कार्यप्रणाली अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कृत संस्था आणि मूल्यांकन एजन्सी यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे, कार्य पुस्तिकेचे अनावरण


पुरस्कृत संस्था आणि मूल्यांकन एजन्सी कौशल्य विकसन कार्यप्रणालीचे आधारस्तंभ; नवीन मार्गदर्शक तत्वे, नियमनाच्या चौकटी अधिक मजबूत करतील: डॉ. महेंद्रनाथ पांडे

Posted On: 27 OCT 2020 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2020

भारताला संपूर्ण जगाची कौशल्य विकसनाची राजधानी बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे, त्या दिशेने वाटचाल करताना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने एनसीव्हीईटी म्हणजेच राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने कौशल्य विकासन कार्यप्रणाली अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कृत संस्था आणि मूल्यांकन एजन्सी यांच्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे, कार्य पुस्तिकेचे अनावरण आज केले. डिजिटल कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम पार पडला. कौशल्य भारत अभियानाअंतर्गत गुणवत्ता, सुधारित निकाल आणि प्रक्रियेचे प्रमाणिकरण यांचा समावेश आहे.

कुशल भारत बनविताना आपल्याला गतिशील मार्गदर्शक तत्वांची आवश्यकतेवर भर देताना डाॅ. महेंद्रनाथ पांडे म्हणाले, आपला देशात कौशल्य कार्यप्रणालीचे पालन करताना ज्या प्रमुख भागधारक आणि संघटनांचे पाठबळ आहे, त्यांचा विचार करणे महत्वाचे आहे. त्यामुळे कौशल्य सुधारणा आणि परिवर्तन यांना प्रोत्साहन देणारी धोरणात्मक चौकट असणे गरजेचे आहे.

गुणवत्तेची हमी आणि पात्रता निश्चितीची जबाबदारी एनसीव्हीईटीवर आहे. कौशल्य विकसन संस्थांच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शक सूचनांमध्ये नवीन पद्धती आणि साधने अधोरेखित करण्यात आली आहेत, त्यामुळे संस्थेचे कार्यचलन नियमनानुसार होवू शकणार आहे, असेही पांडे यावेळी म्हणाले.

गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे 5.5 कोटी युवकांनी कौशल्य विकसनाचे प्रशिक्षण घेतले आहे, अशी माहिती पांडे यांनी यावेळी दिली. कौशल्यांमध्ये सुधारणा घडवून आणल्यानंतर मोठे परिवर्तन घडून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या विविध कौशल्य परिसंस्था वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक स्तरावर कौशल्यपूर्णतेने कार्यरत आहेत. त्यामुळे एक बळकट नीतिगत चौकट निर्माण केली तर त्यामध्ये सुधारणा करणे शक्य होणार आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये संबंधित प्रमुख सहभागितांच्या गरजा पूर्ण करून सुशासन करण्याचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाविषयी माहिती -

भारत सरकारने दि. 9 नोव्हेंबर, 2014 रोजी कौशल्याधारित रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या मंत्रालयाची स्थापना केली. स्थापनेपासूनच मंत्रालयाचे धोरण, विशिष्ट चौकट, प्रमाणिकरण यांच्या औपचारिकरणाच्या दृष्टीने पुढाकार घेवून सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पायाभूत सुविधा निर्माण करणे, विद्यमान संस्थांच्या श्रेणीत सुधारणा करणे, राज्यांना सहभागी करून घेणे, उद्योग आणि कौशल्यांविषयी समाजामध्ये आकांक्षा निर्माण करण्यासाठी कार्य केले जात आहे.

एनसीव्हीईटीविषयी माहिती-

एनसीव्हीईटी म्हणजेच राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेच्या स्थापनेची अधिसूचना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने दि. 5 डिसेंबर, 2018 रोजी काढली होती. कौशल्य विकसनासाठी प्रशिक्षण देताना कामाचे नियोजन करण्यासाठी नियामक म्हणून ही संस्था कार्य करते. या संस्थेच्या माध्यमातून अल्पमुदतीचे तसेच दीर्घ अवधीचे कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी किमान मानक स्थापित करण्यात येतात.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1667882) Visitor Counter : 231