पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन तसेच विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला त्यांचे नाव देण्याचा कार्यक्रम
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2020 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, म्हणजेच 13 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग च्या माध्यमातून डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे. तसेच विखे पाटील यांच्या सन्मानार्थ प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे नामांतर करुन, त्या संस्थेला ‘लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ असे नाव दिले जाणार आहे.
डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी अनेकदा लोकसभेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांचे आत्मचरित्र, “देह वेचावा कारणी” ,त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीतील त्याच्या सेवाव्रती जीवनाचा आणि कृषी तसेच सहकार क्षेत्रात त्यांनी केलेल्या विविध पथदर्शी कामांचा आलेख मांडणारे आहे.
अहमदनगर जिल्ह्यात लोणी येथे, 1964 साली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि मुलींना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. सध्या या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि मानसिक अशा सर्वांगीण उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1663807)
आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam