PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 06 OCT 2020 8:30PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 6 ऑक्टोबर 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काल उशिरा रेझ - 2020 अर्थात सामाजिक सक्षमीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या जागतिक परिषदेचे आभासी उद्‌घाटन केले. 5 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत चालणाऱ्या या परिषदेत शिक्षण, उद्योग आणि सरकारी क्षेत्रातील सुमारे 300 वक्ते सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी आज दूरध्वनीवरुन चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी, कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात, द्विपक्षीय सहकार्याबद्दल, समाधान व्यक्त केले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारतातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या सतत कमी होत असल्यामुळे एकूण सक्रीय कोविड रुग्णांच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले आहे.

देशातील एकूण कोविड बाधित 9,19,023 रुग्णांच्या संख्येचा विचार करता त्यातील  फक्त 13.75 टक्के रुग्ण सध्या सक्रीय असल्याचे दिसून आले आहे.

सक्रीय रुग्णांच्या घसरत्या दरासोबत, रोगमुक्त  होणाऱ्या रुग्णांचा दर वाढताना दिसत आहे.

देशात कोविड संसर्गातून रोगमुक्त  झालेले एकूण 56,62,490 रुग्ण आहेत. सध्या देशातील बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्या एकूण संख्येत 47,43,467 इतके अंतर दिसून आले आहे.

रुग्ण रोगमुक्त  होण्याच्या वाढत्या प्रमाणासोबतच हे अंतर वाढताना दिसत आहे.

अधिकाधिक कोविड रुग्ण रोगमुक्त होत असल्यामुळे राष्ट्रीय रोगमुक्तता दर वाढून आता 84.70% झाला आहे.गेल्या चोवीस तासांत रोगमुक्त झालेल्या  75,787  जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून, या कालावधीत 61,267 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली आहे.

देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या नव्याने कोविड बाधित रुग्णसंख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 74 टक्के रुग्ण देशातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 13,000 कोविडबाधित रोगमुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 61,267 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली आहे.

नव्याने बाधित रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 10,000 पेक्षा जास्त बाधित नोंदले गेले, त्याखालोखाल कर्नाटक राज्यात 7,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत 884 कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यापैकी सुमारे 84 टक्के रुग्ण देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश,तामीळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश,पंजाब, छत्तीसगड, दिल्ली, आणि मध्य प्रदेश  या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

यापैकी 29 टक्क्याहून जास्त म्हणजे 263 रुग्णांचे मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात 5 ऑक्टोबर पासून रेस्टॉरंटस, भोजनालय आणि बार पुन्हा सुरू करण्याचे उद्योग क्षेत्राकडून स्वागत होत असले तरी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. कमी मागणी, कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीतीत अडचणी इत्यादी कारणांमुळे मुंबईतील 1400 पैकी केवळ 25 ते 30 टक्केच हॉटेल उघडण्यात आले.  राज्यात सोमवारी 10,244 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली तर 12,982 रुग्ण बरे झाले.

 

BG/ST/PM

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662139) Visitor Counter : 226