पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा
Posted On:
05 OCT 2020 9:12PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी आज दूरध्वनीवरुन चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांनी नेतन्याहू यांना तसेच इस्त्रायलच्या जनतेला ज्यू नववर्षाच्या तसेच ज्यू समाजाचा सण सुक्कोटसाठी शुभेच्छा दिल्या.
या दोन्ही नेत्यांनी, कोविड-19 साथीच्या आजाराच्या काळात, द्विपक्षीय सहकार्याबद्दल, समाधान व्यक्त केले. विशेषतः संशोधनाच्या क्षेत्रात आणि निदान चाचण्या आणि लस विकसित करण्याबद्दल परस्पर सहकार्य योग्य दिशेने सुरु असल्याचे मत व्यक्त केले. केवळ दोन देशातील लोकांच्या लाभांसाठीच नव्हे तर, संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी दोन्ही देशांमध्ये महत्वाच्या क्षेत्रात दृढ सहकार्य असण्याच्या महत्वाविषयी सहमती झाली.
त्याशिवाय, पाणी, कृषी,आरोग्य, व्यापार आणि स्टार्ट अप तसेच नवोन्मेष अशा क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला आणि हे संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
त्याशिवाय, नव्याने निर्माण होत असलेली प्रादेशिक व जागतिक आव्हाने तसेच संधी यावर नियमित सल्लामसलत करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. आणि द्विपक्षीय राजनैतिक भागीदारी अधिक गतिमान व दृढ करण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यावरही यावेळी सहमती झाली.
****
M.Chopade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661869)
Visitor Counter : 240
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam