श्रम आणि रोजगार मंत्रालय

नवीन श्रम संहितांमुळे सौहार्दपूर्ण औद्योगिक संबंधांना प्रोत्साहन मिळेल, उच्च उत्पादनक्षमता सुनिश्चित होऊन अधिक रोजगारनिर्मिती होईल-संतोष गंगवार

Posted On: 05 OCT 2020 9:19PM by PIB Mumbai

 

नवीन श्रम संहितांमुळे सौहार्दपूर्ण औद्योगिक संबंधांना प्रोत्साहन मिळेल, उच्च उत्पादनक्षमता सुनिश्चित होऊन अधिक रोजगारनिर्मिती होईल असे प्रतिपादन केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांनी केले.

फिक्कीची संलग्न संस्था एआयओईच्या 86 व्या सर्वसाधारण बैठकीनिमित्त आयोजित वेबिनारला संबोधित करताना गंगवार म्हणाले, श्रम संहितांमुळे पारदर्शक, उत्तरदायी आणि एकल नोंदणीमुळे सुलभ प्रणाली निर्माण होईल, सर्व संहितांसाठी एक परवाना आणि कमी परतावा सादर करावा लागेल. श्रम संहितांच्या माध्यमातून सरकारने श्रमिकांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत. 

नवीन श्रमसंहितांचे लाभ अधोरेखीत करताना, गंगवार म्हणाले की यामुळे संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील 50 कोटी श्रमिकांना संरक्षण पुरवण्यात  येईल, त्यांना किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळेल. निश्चित मुदतीचा रोजगार सुरु करण्यात आला आहे आणि निश्चित मुदतीच्या कर्मचार्‍यांऱ्यांप्रमाणे सेवा शर्ती लागू होतील. कोणत्याही कंपनीतील आकस्मिक संपावर आळा आणण्यासाठी 14 दिवसांची पूर्वसूचना देण्याची तरतूद श्रमसंहितेत करण्यात आली आहे. कोणत्याही कंपनीतील कर्मचाऱ्यांना संप पुकारण्यापूर्वी 14 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागेल. कर्मचाऱ्यांच्या समस्या सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवण्यात याव्यात, यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. वाटाघाटी करण्यासाठी गटाची स्थापना करण्याचीही तरतूद आहे, ज्याचा कामगार आणि उद्योग दोघांनाही लाभ होईल.   

व्यवस्थेमधून इन्स्पेक्टर राज काढून टाकण्यासाठी निरीक्षकांना यापुढे सुविधा दाते म्हणून बोलावले जाईल. पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व वाढण्यासाठी आम्ही वेब आधारित निरीक्षण प्रणाली तयार केली आहे नवीन श्रमसंहिता केवळ कायद्यांना सोपेच बनणार नाही तर व्यवसायसुलभता निर्माण करेल.

आयएलओच्या संचालिका डॅग्मार वॉल्टर म्हणाल्या की नवीन श्रम संहितेचे यश हे त्यांच्या अंमलबजावणीवर अवलंबून असेल तसेच सरकारी संस्थांची क्षमता देखील महत्त्वाची भूमिका बजावेल. कामगार कायदे आणि कामगार धोरण हे कुठल्याही कार्यक्षेत्राचे महत्त्वाचे अंग आहेत आणि त्यातूनच कामगारांच्या हितांचे रक्षण आणि आणि त्यांच्यासाठी सुरक्षित काम करण्याची जागा याची सुनिश्चिती होते आणि उत्पादकता वाढीस लागते.

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1661874) Visitor Counter : 221