आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील सक्रीय कोविड रुग्णांच्या प्रमाणात सातत्याने घट


सद्यस्थितीला एकूण कोविडबाधित रुग्णसंख्येच्या केवळ 13.75 टक्के सक्रीय रुग्ण

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 74 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील

देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत नव्याने बाधित रुग्णांपेक्षा रोगमुक्त झालेल्यांची संख्या जास्त

Posted On: 06 OCT 2020 1:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020

 

भारतातील सक्रीय कोविड बाधितांची संख्या सतत कमी होत असल्यामुळे एकूण सक्रीय कोविड रुग्णांच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले आहे.

देशातील एकूण कोविड बाधित 9,19,023 रुग्णांच्या संख्येचा विचार करता त्यातील  फक्त 13.75 टक्के रुग्ण सध्या सक्रीय असल्याचे दिसून आले आहे.

सक्रीय रुग्णांच्या घसरत्या दरासोबत, रोगमुक्त  होणाऱ्या रुग्णांचा दर वाढताना दिसत आहे.

देशात कोविड संसर्गातून रोगमुक्त  झालेले एकूण 56,62,490 रुग्ण आहेत. सध्या देशातील बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्या एकूण संख्येत 47,43,467 इतके अंतर दिसून आले आहे.

रुग्ण रोगमुक्त  होण्याच्या वाढत्या प्रमाणासोबतच हे अंतर वाढताना दिसत आहे.

अधिकाधिक कोविड रुग्ण रोगमुक्त होत असल्यामुळे राष्ट्रीय रोगमुक्तता दर वाढून आता 84.70% झाला आहे.गेल्या चोवीस तासांत रोगमुक्त झालेल्या  75,787  जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून, या कालावधीत 61,267 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली आहे.

देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या नव्याने कोविड बाधित रुग्णसंख्येपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 74 टक्के रुग्ण देशातील महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, ओडिशा, दिल्ली, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 13,000 कोविडबाधित रोगमुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासांत 61,267 नव्या कोविडबाधितांची नोंद झाली आहे.

नव्याने बाधित रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 10,000 पेक्षा जास्त बाधित नोंदले गेले, त्याखालोखाल कर्नाटक राज्यात 7,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत 884 कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यापैकी सुमारे 84 टक्के रुग्ण देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश,तामीळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश,पंजाब, छत्तीसगड, दिल्ली, आणि मध्य प्रदेश  या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

यापैकी 29 टक्क्याहून जास्त म्हणजे 263 रुग्णांचे मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत.

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1661998) Visitor Counter : 176