PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
05 OCT 2020 6:52PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 05 ऑक्टोबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
· सलग दोन आठवडे सक्रिय रूग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी:- कोविड-19 महामारीचा भारत अतिशय प्रभावी सामना करीत आहे. रूग्णांची संख्या कमी राखण्यात भारताने महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. भारतामध्ये सलग दोन आठवडे म्हणजेच 14 दिवस 10 लाखांपेक्षा कमी सक्रिय रूग्णांची नोंद झाली आहे. देशामध्ये गेल्या 24 तासांत 76,737 कोरोनारूग्ण बरे झाल्याची नोंद आहे. तर देशामध्ये नवीन 74,442 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अलिकडच्या दिवसात नवीन कोरोनारूग्ण संख्येपेक्षा बरे होत असलेल्या रूग्णांची संख्या जास्त असते.
नव्याने बरे झालेल्यांपैकी 75 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले आहेत. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून एकट्या महाराष्ट्रातले 15 हजारांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक लागतो. या राज्यांमधले प्रत्येकी 7000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत.
- कोविडवरील लस वितरणाबद्दल डॉ हर्ष वर्धन यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालय सध्या एक प्रारूप तयार करीत आहे ज्यामध्ये राज्यांकडून लस प्राप्त करण्यासाठी प्राधान्य लोकसंख्या गटांची यादी, विशेषत: कोविड-19 च्या व्यवस्थापनात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्यात येईल. केंद्र सरकार मनुष्यबळ, प्रशिक्षण, निरीक्षण यामध्ये क्षमतावृद्धी करण्याचे नियोजन करत आहे आणि जुलै 2021 पर्यंत 400-500 दशलक्ष डोस 20-25 कोटी लोकांना देण्यात येतील, असे प्राथमिक नियोजन आहे.
इतर अपडेट्स:
स्मार्ट’ म्हणजेच सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडोची आज, 5 ऑक्टोबर,2020 रोजी ओडिशा किनारपट्टीवरील व्हीलर बेटावरून 11.45 मिनिटांनी केलेली चाचणी यशस्वी ठरली. या चाचणीसाठी निश्चित करण्यात आलेली उंची आणि विशिष्ट श्रेणीचा टप्पा या क्षेपणास्त्राने गाठला.
जगात परिस्थिती वेगाने बदलत आहे. पूर्वग्रह मोडून पडले आहेत. कोविड-19 मुळे याची तीव्रता आणि गती विकोपाला गेली आहे. संपूर्ण जगाला आत्मपरीक्षण करणे आणि बदलांची दिशा समजून घेण्याची आवश्यकता वाढली आहे. भारतासारख्या 1.35 दशलक्ष लोकसंख्येच्या देशात या बदलांचे आव्हान मोठे आहे.
वन्यजीव सप्ताह 2020 निमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशातल्या वैविध्यपूर्ण वन्यजीवनाबद्दन सर्वांचे अभिनंदन केले आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या भागीदारीमधून (पीपीपी) देशातल्या 160 प्राणीसंग्रहालयांच्या श्रेणीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि त्यांचा विकास, विस्तार करण्याच्या योजनेवर सरकार काम करीत असल्याचे माहिती जावडेकर यांनी आज दिली.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या हितार्थ कृषी कायद्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना आर्थिक स्वतंत्र मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शेतमालाला दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने संसदेत मंजूर झालेले कृषी सुधार अधिनियम हे महत्वपूर्ण पाउल आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ, संचार तथा इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात 6 महिन्यांपासून बंद असलेले 4 लाख रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी कोविड संबंधी नियमावलीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. 4 लाख बार आणि रेस्टॉरंटपैकी एकट्या मुंबईतील संख्या 14,000 एवढी आहे, त्यापैकी सुमारे 30-40% नी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, इतरांनी आठवडाभर थांबून प्रतीक्षा करण्याचे ठरवले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी म्हणाले की, कोविड-19 रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली आहे आणि उपचाराविषयीचे प्रोटोकॉल बदलल्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे. शनिवारी राज्यात 14,000 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 19,000 रुग्ण बरे झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
FACT CHECK
*******
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661804)
Visitor Counter : 211