वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार 2020 चा निकाल  6 ऑक्टोबर, 2020 ला जाहीर होणार

Posted On: 05 OCT 2020 4:13PM by PIB Mumbai

 

पहिल्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्काराच्या निकालाची घोषणा रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उद्या- दि. 6 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता करणार आहेत. नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय प्रसार माध्यम केंद्रामध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. यावेळी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम एनआयसी, माय गव्ह आणि संबंधित समाज माध्यमांवरून वेबकास्ट करण्यात येणार आहे.

डीपीआयआयटी म्हणजेच उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्यावतीने राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. देशामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळावी तसेच उच्च संभाव्यतेसह नवसंकल्पना प्रत्यक्षात येवून नाविन्यपूर्ण उत्पादने तसेच पर्यायी सेवा व्यवस्था निर्माण व्हावीत यासाठी स्टार्टअप्सना असलेला वाव लक्षात यावा, असा उद्देश पुरस्कार सुरू करण्यामागे आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून केवळ आर्थिक लाभाचा विचार करून गुंतवणूक केली जावी असे नाही, तर समाजाच्या भल्यासाठीही कार्ययोजना प्रत्यक्षात येणे अपेक्षित आहे. एखाद्या स्टार्टअपच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडविण्यासाठी हातभार लागणार असेल तर, चांगलेच आहे, याचा विचारही पुरस्कार देताना करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे यंदाचे हे पहिलेच वर्ष आहे. यावर्षी विविध 12 विभागामध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्याचे एकूण 35 गटांमध्ये वर्गिकरण केले आहे. या 12 विभागांमध्ये कृषी, शिक्षण, व्यवसाय तंत्रज्ञान, ऊर्जा, वित्त, अन्न, आरोग्य, उद्योग, अंतराळ, सुरक्षा, पर्यटन आणि नागरी सेवा अशी विभागणी करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण जीवनामध्ये चांगल्या बदलासाठी  प्रभाव निर्माण करणारे व्यवसाय, महिलांच्या नेतृत्वाखाली चालणारे उद्योग, आणि शैक्षणिक उपक्रमाशी निगडित उद्योग यांचाही विभाग करण्यात आला आहे.

पुरस्कार प्राप्त स्टार्टअप्सना 5 लाख रुपयांचा रोख पुरस्कार, तसेच संभाव्य पथदर्शी प्रकल्पासाठी तसेच कामाच मागणी नोंदविण्यासाठी संबंधित सार्वजनिक प्राधिकृत आधिकारी, कॉर्पेारेट यांना कामाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.

उद्योग कार्यक्षेत्राची मुख्य इमारत चांगली निर्माण व्हावी, यासाठी असे स्टार्टअप्स इमारतीचे भक्कम पाया ठरणार आहेत. तसचे अगदी नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त असणा-या इनक्यूबेटरमधल्या उद्योगाला तसचे एक्सलेरॅटर व्यवसायाला प्रत्येकी 15 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

-----

M.Iyangar/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661748) Visitor Counter : 189