संरक्षण मंत्रालय
‘स्मार्ट’ची चाचणी यशस्वी
Posted On:
05 OCT 2020 3:33PM by PIB Mumbai
‘स्मार्ट’ म्हणजेच सुपरसॉनिक मिसाइल असिस्टेड रिलीज ऑफ टॉरपेडोची आज, 5 ऑक्टोबर,2020 रोजी ओडिशा किनारपट्टीवरील व्हीलर बेटावरून 11.45 मिनिटांनी केलेली चाचणी यशस्वी ठरली. या चाचणीसाठी निश्चित करण्यात आलेली उंची आणि विशिष्ट श्रेणीचा टप्पा या क्षेपणास्त्राने गाठला. तसेच समोरच्या नाक सदृश कोनाचे विलगीकरणही नियत वेळेत आणि पद्धतीने झाले. या क्षेपणास्त्रातून टॉरपेडो म्हणजेच जलतीर सोडणे तसेच त्याचा वेग कमी करण्याचे तंत्रज्ञान (व्हीआरएम) या सर्व चाचण्यांची निश्चित केलेली उद्दिष्टे या क्षेपणास्त्राने यशस्वी केली आहेत.
या चाचणीसाठी किनारपट्टीवरून ट्रॅकिंग स्थानकामध्ये रडार्स, इलेक्ट्रो ऑप्टिकल कार्यप्रणाली तपासण्यात आली.
‘स्मार्ट’ या क्षेपणास्त्रयुक्त जलतीराचा वापर युद्धकाळामध्ये शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्यासाठी केला जातो. पाणबुड्ष्या नष्ट करण्यासाठी आवश्यक असणारी युद्धक्षमता निर्माण करण्यासाठी या जलतीराचे काम महत्वाचे मानले जाते. त्यामुळे आज झालेल्या यशस्वी चाचणीचे महत्व आहे.
हैद्राबादच्या डीआरडीएल, आरसीआय, आग्रा इथल्या एडीआरडीई, विशाखापट्टणमच्या एनएसटीएल या संरक्षण क्षेत्रातल्या संशोधन आणि विकास संस्थांनी मिळून ‘स्मार्ट’ साठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल डीआरडीओच्या संशोधकांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केले आहे.
पाणबुडी युद्धामध्ये ‘स्मार्ट’ हे ‘गेम चेंजर’ तंत्रज्ञान ठरणार आहे, असा विश्वास डीडी आर अँड डी चे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केला आहे.
------
M.Chopade/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661736)
Visitor Counter : 327
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam