युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
कोविड-19 ची लागण झालेल्या उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुन्हा खेळण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मार्गदर्शक प्रणाली केली जारी
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2020 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
प्रत्येक खेळाडूच्या तंदुरूस्तीचा विचार करून कोविड-19 ची लागण झालेल्या उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुन्हा खेळण्यासाठी प्रारंभ करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हे निश्चित करून भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मार्गदर्शक प्रणाली जारी केली आहे. काही खेळाडूंना प्रशिक्षण केंद्रावर कोविड-19 ची बाधा झाल्याचे लक्षात आले आहे.
या मार्गदर्शन सूचनांनुसार जीआरटीपी म्हणजेच आजारानंतर पुन्हा प्रारंभ करणाऱ्या खेळाडूंसाठी काही गोष्टींचे पालन करावे लागणार आहे. तसेच कोविडमधून बरे झालेल्या खेळाडूंच्या आरोग्याकडे तसेच त्यांच्या खेळातल्या प्रगतीकडे प्रशिक्षकांनाही लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
कोविड-19 प्रकरणांप्रमाणे या मार्गदर्शन सूचनांचे तीन विभागामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे.
- पहिला गट- कोविड -19 चाचणी सकारात्मक आणि लक्षणे न दिसणारी (सौम्य लक्षणे- दहा दिवसांत प्रकृती बरी होण्यासारखे)
- दुसरा गट - कोविड -19 चाचणी सकारात्मक आणि दीर्घकाळ आजारपण असलेले (क्षेत्रिय / 10 दिवसांपेक्षा जास्त काळ आजारी असणारे)
- तिसरा गट - कोविड -19 चाचणी सकारात्मक आणि ‘जीआरटीपी’साठी प्रगतिपथावर असलेले (आजार बरा झालेले)
या नवीन मार्गदर्शक नियमांनुसारच सर्व क्रीडापटूंना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाकडे सोपविण्यात आली आहे.
एसएआयने खेळाडूंच्या तंदुरूस्तीसाठी प्रत्येक केंद्रांवर वैद्यकीय मदत देवू केली आहे. तसेच कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून आवश्यक त्या उपाय योजना केल्या आहेत. तसेच वैद्यकीय आणि निमवैद्यकीय तज्ञांची नियुक्ती प्रत्येक केंद्रांवर करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रांवरच्या नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खेळाडूंची वेळोवेळी तपासणी करून जीआरटीपी प्रगतीसंदर्भामध्ये स्पष्टीकरण सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रशिक्षकांनी कोविडबाधित खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करून 50 टक्क्यांपर्यंत शारीरिक कसरती करून घ्याव्यात तसेच लक्षणे न दिसणाऱ्या खेळाडूंनाही सात दिवस किती प्रमाणात प्रशिक्षण द्यावे, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय आणि इतर वैद्यकीय कर्मचारी वर्गाला खेळाडूच्या प्रगतीची नियमित देखरेख ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
व्यायामाच्या सत्रापूर्वी, मधल्या काळात आणि नंतरही खेळाडूंचे परीक्षण करण्यास सांगण्यात आले आहे. जर खेळाडूंमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने पुढील तपासासाठी वैद्यकीय अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661396)
आगंतुक पटल : 270