PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 04 AUG 2020 8:45PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 4  ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

अयोध्येत उद्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाआधी, हनुमानगढी येथे होणारी पूजा आणि दर्शन सोहळ्यालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते रामजन्मभूमीस्थळी जातील, तिथे ते भगवान श्री रामलला विराजमानइथे होणारी पूजा आणि दर्शनात देखील सहभागी होतील. त्यानंतर ते पारिजातकाचं रोप लावतील आणि नंतर त्यांच्या हस्ते भूमीपूजन होईल.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास होईल. तसेच श्री राम जन्मभूमी मंदिराविषयीच्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन देखील पंतप्रधान करतील.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

गेल्या 24 तासांत विक्रमी 6,61,892 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 2,08,64,750 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.  प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 15,119 नमुन्यांची चाचणी करण्यात येत आहे. 28 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत दररोज दर दशलक्ष लोकसंख्येमागे 140 पेक्षा जास्त कोविड19 तपासण्या करण्यात येत आहेत.

कोविडचे एकूण 12,30,509 रुग्ण बरे झाले असून देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा दुप्पट आहे. गेल्या 24 तासात 44,306 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर66.31 टक्के इतका झाला आहे.

आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या, कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येच्या दुप्पट झाली आहे. 25 मार्चच्या पहिल्या लॉकडाऊन पासून विचार करता, कोरोना आजार बळावून रुग्ण मरण पावण्याचे प्रमाण आता सर्वात कमी झाले आहे. कोविड19 साठीची तयारी आणि यासंदर्भातील माहिती यावरील पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी आरोग्य मंत्रालयाने ही माहीती दिली. अनेक राज्यांनी आर.टी.-पी.सी.आर. आणि जलद अँटिजेन दोन्ही प्रकारची तपासणी क्षमता वाढवली आहे. अनेक राज्यांत तपासण्यांचे प्रमाण, राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

देशात कोविड19 वर उपचार घेत असलेल्यांची संख्या आजमितीला 5,86,298 इतकी आहे. तर आजवर 12 लाखांहून अधिक व्यक्ती पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्या आहेत अशी माहिती आरोग्य सचिवांनी यावेळी दिली. पहिल्या लॉकडाऊनपासून विचार करता, कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू ओढवण्याचे प्रमाण, आज प्रथमच सर्वात कमी म्हणजे 2.10% इतके झाले आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस सातत्याने घटत चालले आहे. हे अत्यंत चांगले लक्षण आहे, असे ते म्हणाले.

आपण 2 कोटींपेक्षा अधिक कोविड19 तपासण्या केल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळा उभारण्यातही आपण यशस्वी झालो आहोत. काल 6.6 लाख  तपासण्या करण्यात आल्या, असे आयसीएमआरचे महासंचालकांनी यावेळी सांगितले. 60,000 व्हेंटिलेटर्सपैकी 50,000 व्हेंटिलेटर्सना  पीएम केअर फंडातून अंदाजे 2,000 कोटी रुपयांचे अर्थसाह्य मिळाले आहे.

 

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

371 खाटांच्या कोविड सुविधा केंद्राचे मिरा भाईंदर येथे सोमवारी उदघाटन करण्यात आले.  लॉक डाउन च्या नियमांमध्ये मोठी शिथिलता आणत, सम-विषम नियम बदलून मुंबईतील सर्व दुकने यापुढे सुरू ठेवण्याची परवानगी मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच बुधवारपासून मॉल्स आणि व्यापारी संकुले सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान सिनेमागृह, फूड कोर्टस/रेस्टॉरंट बंदच राहतील.

महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती (सोमवार)

नवीन रुग्ण - 8968

बरे झालेले रुग्ण - 10,221

मृत्यू - 266

सक्रीय रुग्ण - 1,47,018

एकूण रुग्ण - 4,50,196

एकूण बरे झाले रुग्ण - 2,87,030

एकूण मृत्यू - 15,842

 

BG/ST/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643383) Visitor Counter : 272