पंतप्रधान कार्यालय
‘श्रीराम जन्मभूमी मंदिरा’च्या उद्या होणाऱ्या शिलान्यास कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2020 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020
अयोध्येत उद्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाआधी, हनुमानगढी येथे होणारी पूजा आणि दर्शन सोहळ्यालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते रामजन्मभूमीस्थळी जातील, तिथे ते ‘भगवान श्री रामल्लला विराजमान’ इथे होणारी पूजा आणि दर्शनात देखील सहभागी होतील. त्यानंतर ते पारिजातकाचं रोप लावतील आणि नंतर त्यांच्या हस्ते भूमीपूजन होईल.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास होईल. तसेच ‘श्री राम जन्मभूमी मंदिरा’विषयीच्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन देखील पंतप्रधान करतील.
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1643354)
आगंतुक पटल : 272
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam