अर्थ मंत्रालय

आयकर विभागाला सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्व फेसलेस इ-मूल्यांकन पूर्ण करण्याची अपेक्षा

Posted On: 04 AUG 2020 4:22PM by PIB Mumbai

मुंबई, 4 ऑगस्ट 2020

600 आयकर अधिकाऱ्यांसह 3,130 आयकर कर्मचारी फेसलेस (ओळखविरहित) ई-मूल्यांकन योजनेच्या अंमलबजावणीत व्यग्र आहेत.फेसलेस मूल्यांकनसाठी निवडलेल्या, 58,319 प्रकरणांपैकी 8,700 प्रकरणांचा आधीच निपटारा करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2019 च्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रथम जाहीर केलेली ही योजना म्हणजे पारदर्शक कर प्रशासनाकडे मोठी झेप म्हणून पाहिले जात आहे.

आम्ही प्रथमच ई-मूल्यांकन करत आहोत. पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशीसंबंधित सर्व बाबींवर लक्ष दिल्यानंतर जुलैपासून हे काम हाती घेण्यात आले आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सर्वप्रकरणे पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. असे आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त आणि केंद्रीय प्रत्यक्षकर मंडळाचे सदस्य एस.के. गुप्ता म्हणाले.

ऑक्टोबर 2019 मध्ये आयकर विभागाने आणलेल्या या योजनेमुळे मूल्यांकन अधिकारी आणि करदाते यांच्यामधील थेट संवाद संपुष्टात आला. या योजनेंतर्गत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे ही आठ शहरे समाविष्ट आहेत. फेसलेस ई-मूल्यांकनसाठीच्या प्रकरणांमध्ये व्यक्ती, व्यवसाय, एमएसएमई तसेच मोठ्या कंपन्यांनी दाखल केलेल्या परताव्याचा समावेश असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

फेसलेस इ-मूल्यांकनाचे कार्य कसे चालते?

दिल्लीतील राष्ट्रीय ई-मूल्यांकन केंद्र हे करदात्यास तसेच मूल्यांकन करणाऱ्या सर्व विभागांसाठी एकच संपर्ककेंद्र आहे. कलम 143(2) अन्वये हे केंद्र करदात्याला नोटिस बजावते आणि सूचना मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत करदात्याकडून उत्तर देणे आवश्यक आहे. नोटीस बजावल्यानंतर एनईसी स्वयंचलित वितरण प्रणालीद्वारे कोणत्याही आयकर विभागाला हे प्रकरण नाव न छापता सुपूर्त करते.

पारंपारिक छाननी मूल्यांकन प्रणालीमध्ये करदाता आणि प्राप्तिकर विभागाचे अधिकारी यांच्यात उच्च पातळीवरील वैयक्तिक संवाद होता. फेसलेस ई-मूल्यांकन प्रणाली अंतर्गत, करदात्यास त्याच्या परताव्याचे मूल्यांकन कोणाद्वारे किंवा कोणत्या शहरात केले जात आहे हे माहिती नसते, असे गुप्ता पुढे म्हणाले. करदात्याच्या नावाबाबत गुप्तता राखल्यामुळे अडवणूक तसेच भ्रष्टाचाराच्या घटनांवर अंकुश ठेवता येईल, असे गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, क्षेत्रीय कार्यक्षेत्र घेण्याऐवजी आम्ही ते गतिमान कार्यकक्षेत आणले आहे.

 

U.Ujgare/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1643309) Visitor Counter : 180


Read this release in: English