Posted On:
03 AUG 2020 9:20PM by PIB Mumbai
"आत्मनिर्भर भारत मोहिमे"अंतर्गत देशाला संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याला चालना देण्यासाठी विविध घोषणा जाहीर करण्यात आल्या. या धोरणाची रचना करण्यासाठी आणि देशाला संरक्षण आणि तसेच अंतराळ क्षेत्रात जगात आघाडीच्या स्थानी नेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने संरक्षण सामग्री आणि निर्यात विस्तार धोरणाची रचना केली आहे. (डिफेन्स प्राँडक्शन अँड एक्स्पोर्ट प्रमोशन पाँलिसी 2020,DPEPP2020) द डीपीईपीपी 2020 हे संरक्षण मंत्रालयाचे महत्त्वाचे मार्गदर्शक दस्तऐवज असून त्या योगे संरक्षण सामुग्री क्षेत्रात विशेष ,संरचनात्मक ,हेतुपूर्ण जोर देत स्वयंपूर्ण होणे आणि निर्यात वाढवणे ही उद्दिष्टे साकार करण्याचे उद्दिष्ट आहे.
या धोरणाची ध्येय आणि उद्दिष्टे अशी आहेत.
1. 2025 सालापर्यंत एकूण 1,75,000कोटी रुपयांची (25 बिलियन यूएस डॉलर्स) उलाढाल, संरक्षण सामग्री आणि सेवा क्षेत्रात करण्याचे उद्दिष्ट गाठणे, त्यापैकी अंतराळ क्षेत्रात 35,000कोटी रुपये ( 5 बिलीयन यूएस डॉलर्स).
2. सशस्त्र दलांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरविण्यासाठी तसेच अंतराळ, नौदलासाठी जहाज बांधणी तसेच संरक्षण क्षेत्रात गतिमानता, मजबूतीकरण आणि स्पर्धात्मकता आणण्यासाठी संरक्षण उद्योग विकसित करणे.
3.आयात केलेल्या परदेशी मालावर विसंबून न रहाता स्वदेशी डिझाईन आणि उत्पादने विकसित करत मेक ईन इंडिया मोहिमेचा पुरस्कार करणे.
4.संरक्षण सामुग्री निर्यात करून जगाच्या संरक्षण मूल्य साखळीचा हिस्सा बनणे.
5.संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वातावरण तयार करून नवनिर्मितीला पुरस्कृत करणे, भारतीय बौद्धिक संपदेची मालकी तयार करणे, आणि मजबूत आणि स्वयंपूर्ण संरक्षण उद्योगाला चालना देणे.
खालील बाबींवर या धोरणात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे:
1. खरेदीतील सुधारणा
2. स्वदेशीकरण आणि एमएसएमई/स्टार्ट अप ना आधार देणे
3. संसाधनांचे योग्य वाटप
4. गुंतवणूक प्रोत्साहन, थेट परकीय गुंतवणूक, आणि इझ आँफ डुईंग बिझिनेस
5.नवनिर्मिती, संशोधन आणि विकास
6.संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (डीपीएसयूज) आणिआयुध उत्पादन मंडळ (ओएफबी)
7.गुणवत्ता हमी आणि चाचणीकरीता पायाभूत सुविधा
8.निर्यातिला प्रोत्साहन
डीपीईपीपी 2020 चा मसुदा या https://ddpmod.gov.in/dpepp संकेतस्थळावर आणि https://www.makeinindiadefence.gov.in/admin/webroot/writereaddata/upload/recentactivity/Draft_DPEPP_03.08.2020.pdf इथे नागरीकांच्याआणि भागधरकांच्या सूचना, टिप्पणी, शेरे यासाठी उपलब्ध आहे. आलेल्या सूचनांचा विचार करून त्यानंतर संरक्षण मंत्रालय ती सर्वत्र जाहीर करेल.
येत्या 17 आँगस्ट पर्यंत डीपीईपीपी 2020 वरील मसुद्यावर सूचना/शेरे dirpnc-ddp[at]nic[dot]in. या इमेल वर मागविले आहेत.
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com