शिक्षण मंत्रालय

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘एनसीईआरटी’च्या उच्च प्राथमिक इयत्तांसाठीच्या आठ आठवड्याच्या वैकल्पिक शैक्षणिक दिनदर्शिकेचे मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 03 AUG 2020 8:50PM by PIB Mumbai

 

संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक लक्षात घेवून विद्यार्थी वर्गाला शाळेत न जाता घरामध्ये रहावे लागत आहे, त्यामुळे त्यांना पालक आणि शिक्षक यांच्या मदतीने शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून व्यस्त ठेवण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘एनसीईआरटी’च्या उच्च प्राथमिक इयत्तांसाठी आठ आठवड्याच्या वैकल्पिक शैक्षणिक दिनदर्शिकेचे प्रकाशन आज मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिकपर्यंतच्या मुलांना शिकवता येणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री ‘निशंक’ म्हणाले, उच्च प्राथमिक वर्गासाठी म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांसाठी चार सप्ताहांसाठी दैनंदिनी याआधीजाहीर करण्यात आली होती. आता उच्च प्राथमिक गटासाठी पुढील आठ आठवड्यांची दैनंदिनी जाहीर केली आहे. या दिनदर्शिकेमध्ये मुलांना शिकणे मनोरंजक आणि मजेदार वाटावे, यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा, साधनांचा आणि त्याचबरोबर समाज माध्यमांचा वापर कसा करणे शक्य आहे, यासाठी शिक्षकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा उपयोग घरात असताना पालक आणि शिक्षक करू शकतील.

Alternative Academic Calendar for upper primary stage (Classes VI to VIII) for four weeks was released earlier. I have launched the academic calendar for the next eight weeks today. https://t.co/VRNUh42NDW pic.twitter.com/AJXPsSwVSf

— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) August 3, 2020

मनुष्य बळ विकास मंत्री पोखरियाल म्हणाले, विविध घटकांना असलेल्या मोबाईल फोन, रेडिओ, दूरचित्रवाणी-टी.व्ही, एसएमएस, आणि अशी विविध समाज माध्यमांच्या कमी जास्त उपलब्धतेचा शिक्षण देताना विचार करण्यात आला आहे. आपल्यापैकी अनेकांच्या मोबाईल फोनमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, तसेच बरेचजण व्हॉटसअप, फेसबुक, व्टिटर, गूगल यांचा वापर करू शकत नाहीत. तरीही शिकताना किंवा शिकवताना समस्या निर्माण होवू नये म्हणून यामध्ये मार्गदर्शक सूचना साध्या मोबाईल फोनवर एसएमएस करून किंवा व्हॉईस कॉल करून देण्याची सोय करण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थी वर्गाची विशेष गरज लक्षात घेवून त्यांच्यासाठी आॅडिओ पुस्तके, रेडिओचे कार्यक्रम यांच्यासाठी लिंक देण्यात येत आहे. या विशेष मुलांच्या सर्व आवश्यकता पूर्ण करण्यात येत असल्याचे मंत्री पोखरियाल यांनी नमूद केले.

या दैनंदिनीमध्ये भारत सरकारच्या ई-पाठशाळा, NROER आणि दिक्षा पोर्टल यांच्यावर प्रत्येक पाठनिहाय ई-सामुग्री आणि तिच्या लिंक्स समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

या दैनंदिनीमध्ये देण्यात आलेले सर्व उपक्रम केलेच पाहिजेत किंवा दिलेल्या अनुक्रमानुसारच केले पाहिजेत, असे बंधन नाही. तर मुलांचा नैसर्गिक कल लक्षात घेवून पाठ, उपक्रम सुचवण्यात आलेले आहेत.

एनसीईआरटीच्यावतीने याआधीच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये संवादात्मक सत्र सुरू केले आहे. हे सत्र स्वयंप्रभा (किशोर मंच) या टीव्ही वाहिनीच्या माध्यमातून सुरू आहे. ही वाहिनी मोफत उपलब्ध आहे. (डीटीएच -128, डिश टीव्ही- 950 नंबर चॅनल, सनडायरेक्ट- 793, जिओ टीव्ही, टाटास्काय- 756, एअरटेल-440, व्हिडिओकॉन-477 ) किशोर मंच ॲप, हे ॲप प्ले स्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येते. त्याचबरोबर यू-ट्यूबच्या एनसीईआरटीच्या अधिकृत वाहिनीव्दारे शैक्षणिक कार्यक्रमाचा मुलांना लाभ घेता येत आहे.

-------

M.Chopade/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643240) Visitor Counter : 214