PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 15 JUL 2020 7:27PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्‍ली-मुंबई, 15 जुलै 2020

 

जागतिक युवा कौशल्य दिन आणि कौशल्य भारत मिशनच्या आरंभाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आज भरलेल्या डिजिटल कौशल्य परिषदेला पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशात युवकांना सतत बदलत्या व्यावसायिक वातावरणात आणि बाजारव्यवस्थेत तग धरून राहण्यासाठी कौशल्य प्राप्ती, कौशल्य जोपासना आणि कौशल्यवृद्धी या गोष्टी हस्तगत करण्यासाठी प्रोत्साहन केले. त्यांनी युवावर्गाचे या प्रसंगी अभिनंदन केले आणि काळासोबत राहण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात करणाऱ्या युवकांच्या मुठीत विश्व असेल असा संदेश दिला.

15 व्या भारत-युरोपियन युनियन (आभासी) शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी  बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाही देशांमध्ये अधिकाधिक सहकार्याची आवश्यकता व्यक्त केली.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

गेल्या 24 तासात कोविड-19 च्या रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 20,572 रुग्ण बरे झाले असून कोविड-19 च्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 5,92,031 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 63.24 % झाला आहे.

आग्रही चाचणी, वेळेवर निदान आणि गृह अलगीकरण किंवा रुग्णालयात सक्रिय वैद्यकीय सहाय्य याच्या माध्यमातून रूग्णांचे प्रभावी व्यवस्थापन केल्याने रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. कोविड-19 च्या  सक्रीय रुग्णांची संख्या 3,19,840 असून ते सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. ऑक्सिमीटरच्या वापरासह गृह अलगीकरणाचे सर्व निकष आणि मानकांमुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवर दबाव न आणता लक्षण नसलेल्या किंवा सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यास मदत झाली आहे.

States testing more than 140 per day per million.jpg

बरे झालेल्या आणि सक्रीय रुग्णांमधील दरी सातत्याने वाढत आहे. आज हा आकडा 2,72,191 आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या तुलनेत 1.85 पटींनी जास्त आहे.

भारतात कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये 1378 समर्पित कोविड रुग्णालये (डीसीएच), 3077 समर्पित कोविड आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आणि 10351 कोविड सुश्रुषा केंद्र (सीसीसी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण 21,738 व्हेंटिलेटर, 46,487 आयसीयू खाटा आणि 1,65,361 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा आहेत.

कोविड-19 चे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना 230.98 लाख एन95 मास्क, 123.56 लाख पीपीई आणि 11,660 व्हेंटिलेटरचे वितरण केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या 'covid-19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य व सामाजिक उपाययोजनांशी जुळवून घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना' अंतर्गत संसर्गाचा संशय असलेल्या क्षेत्रांमध्ये अधिक तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. सर्वसमावेशक तपास (Comprehensive surveillance) या संकल्पनेबद्दल व संशयित रुग्णांच्या तपासणी बद्दल सांगताना जागतिक आरोग्य संघटनेने दर दहा लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन 140 चाचण्यांची देशाला गरज असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार व राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रयत्नातून 22 राज्य व केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाख लोकसंख्येमागे 140 किंवा त्याहून जास्त चाचण्या केल्या जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य/ केंद्रशासित प्रदेशांनी त्यांची चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्याच्या सूचना नियमितपणे दिल्या जात आहेत.

देशभरात covid-19 चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्या वाढत असल्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्यास मदत होत आहे. सरकारी क्षेत्रातल्या 865 प्रयोगशाळा आणि 358 खाजगी प्रयोगशाळा मिळून आता एकूण संख्या 1223 झाली आहे. चाचणीसाठी ठरवलेल्या सुवर्ण प्रमाणकाबरोबरच आधारित सरकारी व खाजगी तपासणी प्रयोगशाळा देशात जानेवारी 2020 मध्ये covid-19 साठी एकच प्रयोगशाळा उपलब्ध होती त्यांची संख्या मार्च 2020 मध्ये 121 झाली आणि आता 1223 पर्यंत झपाट्याने वाढली आहे गेल्या चोवीस तासात तीन लाख 20 हजार 161 नमुन्यांची तपासणी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांची संख्या एक कोटी 24 लाख 12664 इतकी आहे व ती सतत वाढत आहे दर दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या सतत वाढत असून ती आता 8994.7 वर पोहोचली आहे 14 जुलै 2020 रोजी एका दिवसात 3.2 लाख चाचण्या करण्यात आल्या.

 

इतर

  • भारतीय औषध नियामक महामंडळाने (डीसीजीआय) सर्वात पहिल्या संपूर्णतः स्वदेशी विकसित न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसला मान्यता दिली आहे. ही लस पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड यांनी विकसित केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने भारतात न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसच्या पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याची क्लिनिकल चाचणी करण्यासाठी डीसीजीआयची मंजुरी प्राप्त केली. त्यानंतर संपूर्ण देशभरात या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर या कंपनीने भारता व्यतिरिक्त गॅम्बियामध्येही क्लिनिकल चाचण्या केल्या आहेत.
  • केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हरियाणामध्ये 20,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध नवीन महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि शिलान्यास करण्यात आला. आभासी- वेबच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला. उद्‌घाटन आणि शिलान्यास झालेले हे महामार्ग नवीन आर्थिक कॉरिडॉरचा भाग आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल होते.
  • केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी गरिब कल्याण रोजगार अभियानाच्या प्रगतीसंदर्भात सहा राज्यांचे ग्रामविकास मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून 2020 रोजी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा आणि राजस्थान या राज्यांमधील 116 जिल्ह्यांमध्ये गरीब कल्याण रोजगार अभियान घोषित केले. हे अभियान 125 दिवस चालणार असून या अभियानासाठी आणि 11 विविध मंत्रालयाअंतर्गत येणारी 25 कामे निवडण्यात आली आहेत.

 

महाराष्ट्र अपडेट्स

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या 6741 नवीन केसेसहीत राज्यातील रुग्ण संख्या 2,67,655 झाली आहे. 1.49 लाख केसेस बऱ्या झाल्या असून सक्रीय रुग्णांची संख्या 1,07,963 आहे. मंगळवारी मुंबईमध्ये 969 पॉझिटिव्ह केसेस सापडल्या. 1011 जण बरे  झाले तर 70 जणांचा मृत्यू झाला याबरोबरच मुंबईमधील रुग्णांची संख्या 94,863 झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66,633 आहे तर 5402 मृत्यू झाले आहेत. शहरामध्ये सध्या 22,828 सक्रिय पेशंट आहेत केस दुप्पट होण्याचा मुंबईतील दर 52 दिवस झाला आहे

***

MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1638865) Visitor Counter : 37