ग्रामीण विकास मंत्रालय
केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या प्रगतीसंदर्भात सहा राज्यांच्या प्रतिनिधींसोबत घेतली बैठक
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2020 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2020
केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज गरिब कल्याण रोजगार अभियानाच्या प्रगतीसंदर्भात सहा राज्यांचे ग्रामविकास मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 जून 2020 रोजी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा आणि राजस्थान या राज्यांमधील 116 जिल्ह्यांमध्ये गरीब कल्याण रोजगार अभियान घोषित केले. हे अभियान 125 दिवस चालणार असून या अभियानासाठी आणि 11 विविध मंत्रालयाअंतर्गत येणारी 25 कामे निवडण्यात आली आहेत.

राज्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या स्वतःच्या गावात रोजगार उपलब्ध करणे हा सरकारचा प्रयत्न आहे. हे अभियान परतलेल्या मजूरांना रोजगार पुरवण्यापुरते मर्यादित नाही, तर ग्रामीण नागरिकांनाही उपयुक्त आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेला यामुळे मजबूती येऊन ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मुलभूत सोयीं निर्माण होतील व रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उदा. रस्ते, अंगणवाडी केंद्रे, पंचायत भवन, रोजगाराची साधने आणि समाजगृहे हे सुद्धा उपलब्ध होईल. केंद्र आणि राज्ये यांच्यांमधील सहकार्यांमुळे होत असलेल्या अभियानाच्या प्रगतीवर त्यांनी संतोष व्यक्त केला. या अभियानाला अजून वेग देण्याची तसेच जास्तीत जास्त मुलभूत सुविधांच्या उभारणाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
* * *
S.Tupe/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1638716)
आगंतुक पटल : 237