आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड यांनी विकसित केलेल्या न्यूमोकोकल पॉलिसॅकराइड कॉन्जुगेट लसीला डीसीजीआयने दिली मंजुरी

Posted On: 15 JUL 2020 6:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 जुलै 2020

 

भारतीय औषध नियामक महामंडळाने (डीसीजीआय) सर्वात पहिल्या संपूर्णतः स्वदेशी विकसित न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसला मान्यता दिली आहे. ही लस पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड यांनी विकसित केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने भारतात न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसच्या पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्याची क्लिनिकल चाचणी करण्यासाठी डीसीजीआयची मंजुरी प्राप्त केली. त्यानंतर संपूर्ण देशभरात या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर या कंपनीने भारता व्यतिरिक्त गॅम्बियामध्येही क्लिनिकल चाचण्या केल्या आहेत.

त्यानंतर, या कंपनीने या लसचे उत्पादन करण्याची मान्यता आणि परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला. भारतीय औषध नियामक महामंडळ कार्यालयाने लसीसाठी स्थापन केलेल्या विशेष तज्ञ समितीच्या (एसईसी) सहाय्याने, कंपनीने केलेला अर्ज आणि प्रयोगात्मक क्लिनिकल चाचण्यांचा डेटा यांचे परीक्षण केले. समितीने शिफारस केली आहे की या लसीच्या मार्केट ऑथोरायजेशनला परवानगी द्यावी. 14 जुलै 2020 रोजी पुण्याच्या मेसर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला सर्वात पहिल्या संपूर्णतः स्वदेशी विकसित न्यूमोकोकल पॉलिसेकेराइड कॉन्जुगेट लसची निर्मिती करण्याची परवानगी देण्यात आली आहे. न्यूमोनियाच्या क्षेत्रामध्ये ही सर्वात पहिली संपूर्णतः स्वदेशी विकसित लस आहे. लसींच्या सर्व उत्पादक कंपन्या ह्या भारताबाहेर स्थित असल्याने याआधी या लसीची मागणी देशातील परवानाधारक आयातकांनी मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहे.

ही लस अर्भकांमध्ये "स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया" मुळे होणारे आक्रमक रोग आणि न्यूमोनिया विरूद्ध सक्रिय लसीकरणासाठी वापरली जाते. ही लस इंट्रामस्क्युलर (अंतस्नायू) पद्धतीने दिली जाते.


* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638818) Visitor Counter : 231