PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 10 JUL 2020 8:01PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 10 जुलै  2020

 

Coat of arms of India PNG images free download 

 

Text Box: •	Recovery Rate further climbs up to 62.42%; 18 States/UTs have Recovery Rate more than National average•	Fatality Rate declines further to 2.72%; 30 States/UTs have Fatality Rate lower than the National average•	There are 2,76,882 active cases at present.•	Prime Minister says that for the Government or the society, compassion and vigilance are the greatest motivators to tackle this difficult challenge.•	More than 41 thousand Ayushman Bharat- Health & Wellness Centres provide Universal and Comprehensive Primary Health Care especially during COVID-19•

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प राष्ट्राला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समर्पित केला. आशियातील हा सर्वात मोठा उर्जा प्रकल्प आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

कोविड-19  चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोविड -19 रूग्णांमधील एकूण 19,138 रुग्ण बरे झाले असून त्यामुळे आजपर्यंत कोविड -19 चे एकूण 4,95,515 रूग्ण बरे झाले आहेत. परिणामी, रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दरामध्ये वाढ होऊन तो आज 62.42% वर पोहोचला आहे. सध्या 2,76,882 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

चाचणी संख्या वाढल्याने रुग्ण निदान वेळेवर होऊन परिणामी रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये सुधारणा होत आहे. भारतामध्ये रुग्णालयाची पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे वेळेवर वैद्यकीय आणि रुग्णालयीन व्यवस्थापनास मदत होते. देशात रूग्णालय पायाभूत सुविधांची संख्या वाढल्यामुळे आजपर्यंत आपल्याकडे 1218 कोविड समर्पित रुग्णालये, 2705 कोविड समर्पित आरोग्यसेवा केंद्रे आणि 10,301 कोविड सेवा केंद्र आहेत ज्यात विलगीकरण खाटा, ऑक्सिजन समर्थन आणि आयसीयू सुविधा आहेत.

भारतात मृत्यूचे प्रमाण 2.72% नोंदविण्यात आले आहे. हे जगातील इतर अनेक देशांमधील मृत्यू प्रमाणापेक्षा कमी आहे. कोविड -19 व्यवस्थापनाचे मुख्य लक्ष्य मृत्यू दर कमी ठेवणे आहे. या अनुषंगाने वयस्कर आणि गंभीर आजार असणाऱ्या उच्च जोखीम गटावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी समुदाय सर्वेक्षणासारखी अनेक पावले उचलली आहेत. आयुष्मान भारत - आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या बरोबरीने आशा व एएनएम (सहाय्यक परिचारिका) यांनी या सर्वेक्षणात, रुग्णांच्या संपर्कात व्यक्तींच्या ज्यात लाखो स्थलांतरीत आणि परतलेल्या नागरिकांचाही समावेश आहे, त्यांच्या शोधात मदत केली आहे. याचा परिणाम असा झाला की, राष्ट्रीय सरासरीपेक्षा 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यू दर कमी आहे.

कोविड -19 चाचणीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी अलीकडे केलेल्या विविध उपाययोजना व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून व्यापक चाचणीची सोय यामुळे देखील दररोज करण्यात आलेल्या नमुना चाचणीत निरंतर वाढ दिसून आली आहे; गेल्या 24 तासांत 2,83,659 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आत्तापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 1,10,24,491 आहे.

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 835 पर्यंत तर खासगी प्रयोगशाळांची संख्या 334 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1169 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 614 (शासकीय: 382 + खासगी: 232)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 458 (शासकीय: 418 + खाजगी: 40)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा:  97 (शासकीय:  35 + खासगी:  62)

 

इतर अपडेट्स:

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज दूरध्वनीवरुन कोरिया गणराज्याचे संरक्षणमंत्री जोंग क्योंग-दू यांच्याशी संवाद साधला. दोन्ही संरक्षणमंत्र्यांनी कोविड-19 महामारीसंदर्भात चर्चा केली. राजनाथसिंग यांनी जोंग क्योंग-दू यांना कोविड विरोधातील आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये भारताच्या योगदानाविषयी माहिती दिली आणि महामारीविरोधातील जागतिक लढाईत परस्पर सहकार्याच्या क्षेत्रावर चर्चा केली.  या महामारीमुळे निर्माण झालेल्या किचकट आव्हानांचा एकत्रित मुकाबला करण्यावर दोन्ही मंत्र्यांची सहमती झाली.

आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य व निरामय केंद्र, आधारस्तंभ ठरत आहेत. वर्ष 2022 पर्यंत देशातील 1,50,000 उपआरोग्य केंद्र  व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपांतर आरोग्य व निरामय केंद्रात (Health & Wellness Centres -HWCs) करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, या केंद्रांद्वारे जनतेला सार्वत्रिक व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. कोविड-19 विरुध्दच्या लढाईत, या केंद्रांनी असाधारण योगदान दिल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. झारखंडमध्ये, राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सर्वेक्षण सप्ताहादरम्यान, आरोग्य केंद्राच्या पथकांनी लोकांची ‘इली’ या फ्लू सदृश ताप व ‘सारी’च्या लक्षणांची तपासणी केली; तसेच कोविड-19 साठीच्या तपासणी सुविधाही पुरवल्या. ओडिशामधील सुबालया येथे आरोग्य केंद्राच्या पथकांनी आरोग्य तपासणी मोहिम राबवत कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जनजागृती केली. या पथकांनी तिथे गेलेल्या स्थलांतरित मजूरांसाठीच्या तात्पुरत्या आरोग्य शिबीरांमध्ये देखील आरोग्य विषयक सत्रे घेतली.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मार्ग शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यातील बहुतेक नागरिक हे शहरातील रहिवासी असून  एकटेपणा आणि नोकरी गमावण्याची  तसेच उत्पन्न कमी होण्याची चिंता यासारख्या विविध मुद्द्यांवर समुपदेशन मिळविण्यासाठी ते ऑनलाइन टेली मेडिसिन मंचाचा वापर करीत आहेत. मानसिक आरोग्याच्या समस्येचे महत्त्व ओळखून केंद्राने कोविड 19 विषयी लोकांमध्ये वाढणाऱ्या मानसिक-सामाजिक चिंतांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी यंत्रणा तयार करून ती बळकट करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांना अग्रक्रम देण्याच्या गरजेवर तसेच  मानसिक समस्यांना सामान्य आजार म्हणून मान्य केल्यास उपचारांसाठी उपयुक्त ठरेल यावर जोर देण्यात आला. केंद्र सरकारला अभिप्रेत आहे कि सल्ला आणि जागरूकता अभियानासह मानसिक आरोग्य सेवा या कोविड 19 विषयीच्या  सरकारच्या प्रतिसादाचा भाग बनल्या पाहिजेत.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि  आत्मनिर्भर भारत अभियानाच्या प्रगतीविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला पाच महिन्यांसाठी म्हणजे नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कोविड-19 च्या जागतिक आजाराच्या काळात, कोणावरही उपाशी झोपण्याची वेळ येऊ नये, यासठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गरीब आणि गरजू लोकांसाठी पीएमजीकेएवाय(PMGKAY) आणि एएनबीए(ANBA) या दोन सर्वात मोठ्या योजना सुरु केल्या. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरण करण्यासही मंत्रिमंडळाने मुदतवाढ दिली असून, आता सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 31 ऑगस्टपर्यंत हे अन्नधान्य वितरण करता येईल, असे पासवान यांनी यावेळी सांगितले.

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) आज ‘प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं उत्थान महाअभियान-(पीएम-कुसुम)’ योजने अंतर्गत नोंदणीचा दावा करणाऱ्या फसव्या संकेतस्थळांविरुध्द नवीन नियमावली जारी केली. दोन नवीन संकेतस्थळांनी ‘पीएम-कुसुम’ योजनेसाठी नोंदणी पोर्टलचा बेकायदेशीरपणे दावा केल्याचे अलिकडेच लक्षात आले आहे.

केंद्रिय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडने (एफएसीटी) 2020-21 च्या पहिल्या तीन महिन्यात उत्पादन आणि विपणन आघाडीवर उत्साहवर्धक कामगिरी बजावली आहे. खतांच्या व्यापाराच्या माध्यमातून सर्वंकष सुधारणा करण्याचे  कंपनीचे नियोजन आहे.  आतापर्यंत कंपनीने 3 जहाज खतांची ऑर्डर दिली आहे. यापैकी दोन जहाजांचे यापूर्वीच आगमन झाले आहे. एका जहाजामध्ये 27500 मेट्रिक टन एमओपी आणि दुसरे जहाज 27500 मेट्रिक टन कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचे आहे.  तिसरे एमओपी चे जहाज जे येत्या ऑगस्टमध्ये येणे अपेक्षित आहे.

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6,875 नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 2.30 लाख इतकी झाली आहे. राज्यात 1.27 लाख रुग्ण बरे झाले आहेत तर 93,652 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 88,795 वर पोहचली आहे. राज्यात रॅपिड अँटीबॉडी टेस्टसाठी कमाल दर निश्चित करण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत आहे.

FACTCHECK

******

B.Gokhale/S.Pophale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637832) Visitor Counter : 175