आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढून 62.42% वर पोहोचला
18 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे झालेल्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त
मृत्यू दर 2.72% वर रोखला
30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Posted On:
10 JUL 2020 5:28PM by PIB Mumbai
कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोविड -19 रूग्णांमधील एकूण 19,138 रुग्ण बरे झाले असून त्यामुळे आजपर्यंत कोविड -19 चे एकूण 4,95,515 रूग्ण बरे झाले आहेत. परिणामी, रुग्ण बरे होण्याच्या राष्ट्रीय दरामध्ये वाढ होऊन तो आज 62.42% वर पोहोचला आहे. सध्या 2,76,882 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
चाचणी संख्या वाढल्याने रुग्ण निदान वेळेवर होऊन परिणामी रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये सुधारणा होत आहे. भारतामध्ये रुग्णालयाची पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे वेळेवर वैद्यकीय आणि रुग्णालयीन व्यवस्थापनास मदत होते. देशात रूग्णालय पायाभूत सुविधांची संख्या वाढल्यामुळे आजपर्यंत आपल्याकडे 1218 कोविड समर्पित रुग्णालये, 2705 कोविड समर्पित आरोग्यसेवा केंद्रे आणि 10,301 कोविड सेवा केंद्र आहेत ज्यात विलगीकरण खाटा, ऑक्सिजन समर्थन आणि आयसीयू सुविधा आहेत.
रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असलेली 18 राज्ये / केंद्रशासित प्रदेश आहेत. यादी खालीलप्रमाणे आहेः
राज्य/केंद्रशासित प्रदेश
|
रुग्ण बरे होण्याचा दर
|
राज्य/केंद्रशासित प्रदेश
|
रुग्ण बरे होण्याचा दर
|
पश्चिम बंगाल
|
64.94%
|
मध्य प्रदेश
|
74.85%
|
उत्तर प्रदेश
|
65.28%
|
हरियाणा
|
74.91%
|
ओदिशा
|
66.13%
|
त्रिपुरा
|
75.34%
|
मिझोरम
|
67.51%
|
राजस्थान
|
75.65%
|
झारखंड
|
68.02%
|
दिल्ली
|
76.81%
|
पंजाब
|
69.26%
|
चंदीगड
|
77.06%
|
बिहार
|
70.40%
|
छत्तीसगड
|
78.99%
|
गुजरात
|
70.72%
|
उत्तराखंड
|
80.85%
|
हिमाचल प्रदेश
|
74.21%
|
लडाख (केंद्रशासित प्रदेश)
|
86.73%
|
भारतात मृत्यूचे प्रमाण 2.72% नोंदविण्यात आले आहे. हे जगातील इतर अनेक देशांमधील मृत्यू प्रमाणापेक्षा कमी आहे. कोविड -19 व्यवस्थापनाचे मुख्य लक्ष्य मृत्यू दर कमी ठेवणे आहे. या अनुषंगाने वयस्कर आणि गंभीर आजार असणाऱ्या उच्च जोखीम गटावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी समुदाय सर्वेक्षणासारखी अनेक पावले उचलली आहेत. आयुष्मान भारत - आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या बरोबरीने आशा व एएनएम (सहाय्यक परिचारिका) यांनी या सर्वेक्षणात, रुग्णांच्या संपर्कात व्यक्तींच्या ज्यात लाखो स्थलांतरीत आणि परतलेल्या नागरिकांचाही समावेश आहे, त्यांच्या शोधात मदत केली आहे. याचा परिणाम असा झाला की, राष्ट्रीय सरासरीपेक्षा 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यू दर कमी आहे. यादी खालीलप्रमाणे आहेः
राज्य/कें.प्रदेश
|
मृत्यू दर
|
राज्य/कें.प्रदेश
|
मृत्यू दर
|
मणिपूर
|
0%
|
बिहार
|
0.82%
|
नागालँड
|
0%
|
हिमाचल प्रदेश
|
0.96%
|
दादरा व नगरहवेली आणि दमण व दीव
|
0%
|
तेलंगणा
|
1.07%
|
मिझोरम
|
0%
|
आंध्र प्रदेश
|
1.16%
|
अंदमान व निकोबार बेटे
|
0%
|
पुदुच्चेरी
|
1.22%
|
सिक्कीम
|
0%
|
चंदीगड
|
1.34%
|
त्रिपुरा
|
0.06%
|
तामिळनाडू
|
1.39%
|
लडाख (केंद्रशासित प्रदेश)
|
0.09%
|
उत्तराखंड
|
1.39%
|
आसाम
|
0.16%
|
हरियाणा
|
1.48%
|
केरळ
|
0.41%
|
कर्नाटक
|
1.56%
|
छत्तीसगड
|
0.41%
|
जम्मू आणि काश्मीर (कें.प्रदेश)
|
1.62%
|
गोवा
|
0.42%
|
मेघालय
|
1.77%
|
ओदिशा
|
0.46%
|
राजस्थान
|
2.18%
|
अरुणाचल प्रदेश
|
0.66%
|
पंजाब
|
2.56%
|
झारखंड
|
0.71%
|
उत्तर प्रदेश
|
2.66%
|
कोविड -19 चाचणीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी अलीकडे केलेल्या विविध उपाययोजना व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून व्यापक चाचणीची सोय यामुळे देखील दररोज करण्यात आलेल्या नमुना चाचणीत निरंतर वाढ दिसून आली आहे; गेल्या 24 तासांत 2,83,659 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आत्तापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 1,10,24,491 आहे.
देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 835 पर्यंत तर खासगी प्रयोगशाळांची संख्या 334 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1169 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:
- जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 614 (शासकीय: 382 + खासगी: 232)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 458 (शासकीय: 418 + खाजगी: 40)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 97 (शासकीय: 35 + खासगी: 62)
कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.
कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.
कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf यावर उपलब्ध आहे.
***
S.Thakur/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1637779)
Visitor Counter : 230
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam