PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 09 JUL 2020 7:49PM by PIB Mumbai

 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

दिल्ली-मुंबई, 9 जुलै 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'इंडिया ग्लोबल विक'च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. सध्याच्या संकटाच्या काळाचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, जागतिक पुनरुत्थानात भारत अग्रगण्य भूमिका बजावेल. ते म्हणाले की, दोन घटकांशी याचा निकटचा संबंध आहे. पहिले म्हणजे - भारतीय प्रतिभा आणि दुसरी म्हणजे सुधारणा तसेच पुनरुज्जीवन करण्याची भारताची क्षमता. त्यांनी हे स्पष्ट केले की, जगभरात भारताच्या कौशल्य-शक्तीचे विशेषतः भारतीय तंत्रज्ञान उद्योग आणि तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या योगदानाला मान्यता प्राप्त झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या कोविड-19 च्या काळात मदतकार्य करणाऱ्या वाराणसीतील विविध स्वयंसेवी संस्थांशी आज व्हिडीओ  कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. वाराणसीसारख्या पवित्र आणि वरदायिनी नगरीत आशा आणि उत्साहाला बळ देत कोरोना महामारीशी दोन हात करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी वाराणसी वासियांची प्रशंसा केली. सेवाभाव आणि धैर्य जागवत गरजूंना सतत मदत आणि सहकार्य कशा  तऱ्हेने केले जात होते याबद्दल आपल्याला माहिती असल्याचे  मोदी यांनी सांगितले. लागण होउ नये म्हणून करण्यात येणारे प्रयत्न, रुग्णालयातील परिस्थिती, अलगीकरणाची व्यवस्था, आणि स्थलांतरीत मजूरांना केलेली मदत याबद्दलही आपल्याला वेळोवेळी माहिती मिळत असल्याचे ते म्हणाले.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

कोविड-19 च्या प्रतिबंधनात्मक उपायांची लक्षणीय उपलब्धी म्हणजे, देशात कोविडच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सक्रीय रूग्णांपेक्षा 2,06,588 ने अधिक झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रीय रुग्णांच्या तुलनेत 1.75 म्हणजेच पावणेदोन पट (सुमारे दुप्पट) अधिक आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे एकूण 19,547 रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 4,76,377 इतकी झाली आहे. रुग्णांशी संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठीघरोघरी जाऊन केलेलं सर्वेक्षण, लवकर आजाराचे निदान आणि वेळेत अलगीकरण  तसेच कोविड रुग्णांवर प्रभावी वैद्यकीय उपचार या सर्व उपाययोजनांना हा परिणाम आहे.

सध्या, देशभरात कोविडच्या 2,69,789 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

भारतात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दरही सातत्याने वाढतो आहे. कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आज सुधारुन 62.09 टक्के इतका झाला आहे.

केवळ कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे, भारताची इतर देशांशी तुलना करणे योग्य ठरणार नाही. भारतात सध्या प्रती दशलक्ष लोकसंख्येमध्ये 195.5 रुग्ण इतकी असून ही जगातल्या इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी संख्या आहे. प्रतिबंधित क्षेत्र आणि बफर झोन यांना त्वरित आणि कार्यक्षमपणे वेगळे ठेवणे,आक्रमक पद्धतीने केलेल्या चाचण्या आणि वेळेत निदान तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल्सचे पालन आणि आयसीयू/ रूग्णालय व्यवस्थापन या सर्व उपाययोजनामुळेच भारतात कोविड संक्रमणाचा परिणाम  कमी जाणवतो आहे. तसेच देशातला कोरोना रुग्ण मृत्यूदर देखील जगात सर्वात कमी आहे. प्रतीदशलक्ष लोकसंख्येमागे भारतात सध्या कोरोनाचे 15.31 रुग्ण दगावत आहेत, म्हणजेच कोविडचा सरासरी मृत्यूदर 2.75%. आहे. मात्र आज जगात हा सरासरी 68.7. टक्के इतका आहे. 

देशात चाचण्यांची संख्या देखील सातत्याने वाढते आहे. गेल्या 24 तासांत 2,67,061 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशभरात कोविडच्या  1,07,40,832 चाचण्या करण्यात आल्या. लोकसंख्येच्या प्रमाणात कोविडचे प्रमाण जाणण्यासाठीही काही चाचण्या करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय तसेच ICMR च्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे देशात कोविडच्या चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. सध्या देशभरात 1132 प्रयोगशाळा  आहेत, त्यापैकी, 805 सरकारी तर  327 खाजगी प्रयोगशाळा आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

  • रियल-टाईम RT PCR आधारित चाचणी प्रयोगशाळा: 603 (सरकारी: 373  + खाजगी: 230)
  • TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 435 (सरकारी: 400 + खाजगी: 35) 
  • CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 94 (सरकारी: 33 + खाजगी: 61)

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात कोविडचे 6,603 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 2,23,724 इतकी झाली आहे. राज्यात 1,23,192 रुग्ण बरे झाले आहेत तर 91,065 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत मंगळवारी 1,381 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

 

A stamp with the word Fake on a press note which claims that CBSE has released result dates for Board exams and also lists 3 websites to view the results

 

* * *

BG/ST/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1637604) Visitor Counter : 22