अर्थ मंत्रालय

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ(CBDT)आणि भारतीय प्रतिभूती नियामक मंडळ( SEBI) दरम्यान माहितीच्या आदान प्रदानासाठी आज सामंजस्य करारावर करण्यात आल्या स्वाक्षऱ्या

Posted On: 08 JUL 2020 10:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

केंद्रीय  प्रत्यक्ष कर मंडळ(CBDT)आणि भारतीय प्रतिभूती नियामक मंडळ( SEBI) यांच्यादरम्यान माहितीच्या आदान  प्रदानासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे झालेल्या या करारावर,आयकर खात्याच्या प्रमुख महासंचालिका श्रीमती अनु जे. सिंग आणि  सेबीच्या पूर्णवेळ सदस्य असलेल्या श्रीमती माधबी पुरी बूच यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दोन्ही मंडळातील वरीष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

या सामंजस्य करारानुसार सेबी आणि सीबीडीटी यांच्यात स्वयंचलित आणि नियमितपणे माहितीचे आदानप्रदान होईल. याशिवाय ही दोन्ही मंडळे परस्परांमध्ये विविध कायद्यांच्या कक्षेत येणारी, डेटाबेस मधील माहिती, विनंतीवरून अथवा  अधिकृत परवानगी शिवाय (suo moto) माहितीची   देवाणघेवाण करू शकतील.

ह्या  सामंजस्य  कराराची अंमलबजावणी स्वाक्षऱ्या झाल्या दिवसापासून सुरू  होईल. तसेच  सेबी आणि सीबीडीटी यांच्यात यापूर्वीपासून सुरूअसलेल्या विविध उपक्रमासाठी हा सामंजस्य करार असेल. डेटा एक्स्चेंज  स्टेटसचे पुनर्लोकन करण्यासाठी, आणि डेटा एक्सचेन्ज  शेअरिंग यंत्रणेची  परिणामकता सुधारण्यासाठी डेटा एक्स्चेंज स्टीअरींग ग्रुप स्थापन केला, त्यांच्या नियमितपणे बैठका  होतील.

या सामंजस्य करारामुळे, सेबी आणि सीबीडीटी या दोन्ही मंडळाच्या कारभारात सहकार्य आणि एकजिनसीपणा येऊन एका नव्या युगाला प्रारंभ होईल.

 

B.Gokhale/S.Patgoankar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637429) Visitor Counter : 194