PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 11 JUN 2020 8:26PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 11 जून 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि महाराष्ट्रातल्या कोविड -19 बाधित जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्च स्तरीय बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान,यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

महाराष्ट्रातल्या कोविड-19 बाबतच्या सध्याच्या स्थितीविषयी बोलताना डॉ हर्ष वर्धन यांनी, प्रतिबंधित क्षेत्रांच्या वाढत्या संख्येकडे  तातडीने लक्ष पुरवण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रभावी प्रतिबंध धोरणासाठी दाट लोकवस्तीच्या भागात, प्रादुर्भाव लगेच होऊ शकण्यासंदर्भात मॅपिंग करण्यात यावे. मृत्यू दरात वाढ होत असल्याकडे लक्ष पुरवतानाच प्रती दशलक्ष लोकसंख्येत करण्यात येणाऱ्या चाचण्यांकडेही लक्ष द्यायला हवे असे हर्ष वर्धन म्हणाले.

राज्यातले सर्व 36 जिल्हे बाधित आहेत. डॉ हर्ष वर्धन यांनी वैयक्तिकरित्या  संवाद साधत मुंबई, ठाणे, पुणे,नाशिक, पालघर, नागपूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोविड-19 स्थितीचा आणि त्याबाबतच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद-आयसीएमआर ने केलेल्या सीरो सर्वेक्षण म्हणजेच रक्तचाचणी अध्ययनात असे आढळले आहे की एकूण तपासलेल्या नमुन्यांमधील 0.73 टक्के  लोकांना याआधी सार्स-कोविड-2 चा संसर्ग झाल्याचे पुरावे आढळले आहेत. आयसीएमआर चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

आयसीएमआर ने मे 2020 मध्ये, राज्य आरोग्य विभाग, एनसीडीसी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने, कोविड-19 साठीचे पहिले सेरो सर्वेक्षण घेतले होते. या अंतर्गत, 83 जिल्ह्यातील  28,595 कुटुंबे आणि 26,400 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले.

या अध्ययनात, लॉकडाऊनच्या काळात, केलेल्या उपाययोजनांमुळे संक्रमण कमी करण्यात आणि कोविड नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचेही स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. आयसीएमआरच्या निष्कर्षानुसार, ग्रामीण भागाच्या तुलनेत,शहरी भागात हे संक्रमण पसरण्याची शक्यता, 1.09 पट अधिक आहे, तर शहरी भागातील झोपडपट्यामध्ये हा धोका  1.89 पट अधिक आहे. संसर्गित रुग्णांचा मृत्यूदर 0.08% आहे. याचा एक अर्थ असाही आहे की लोकसंख्येच्या मोठ्या भागाने अद्याप कोविड बाबतीतली सर्व काळजी घेणे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

गेल्या 24 तासांत, देशभरात कोविडचे 5,823 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,41,028 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 49.21% इतका झाला आहे.  सध्या देशात, 1,37,448 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या, सक्रीय रूग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या अधिक आहे.

इतर अपडेट्स:

कोविड-19 विरुध्दच्या लढ्याचा आपल्या भाषणात उल्लेख करतांना पंतप्रधान म्हणाले की,या संकटाशी सामना करतांना, संपूर्ण जगासोबत भारतही मोठ्या धैर्याने पावले उचलत आहे. या संकटासोबतच, टोळधाड, गारपीट, तेल-वायू विहिरीत आग, छोटे-मोठे भूकंप आणि दोन वादळे अशा इतर संकटांचाही सामना करावा लागतो आहे. मात्र आज देश संपूर्ण शक्तीनिशी एकत्र येऊन या संकटांचे आव्हान पेलतो आहे.

अशा कसोटीच्या काळांनीच भारताला अधिक दृढनिश्चयी बनवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. दृढनिश्चय, इच्छाशक्ती आणि एकता हीच आपल्या देशाची ताकद आहे, ज्यामुळे आपला देश कोणत्याही संकटाचा सामना करु शकतो. कोणतेही संकट आपल्यासाठी एक संधी घेऊन येत असते, ह्या संधीचा वापर करुन घेत आपल्याला आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे असे पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात बुधवारी कोविडच्या 3254 नवीन रुग्णांची नोंद झाली, यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 94,041 इतकी झाली आहे. राज्यात 46,074 सक्रिय रुग्ण असून 44,517 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात बुधवारी या आजारामुळे 149 मृत्यू झाले असून आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. मुंबईतही बुधवारी कोविडचे 1567 नवीन रुग्ण आढळले असून 97 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोविड19 ची रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा होत आहे तसेच मृत्यू दरही राष्ट्रीय सरासरी दराएवढाच झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आणि धारावी, माहीम आणि दादर या कोविडचे हॉटस्पॉट बनलेल्या ठिकाणी परिस्थितीत होत असलेली सुधारणा यामुळे राज्य सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

RT/ST/PM

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630961) Visitor Counter : 274