विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कमी खर्चाची नवीन कोरोना विषाणू चाचणी विकसित

Posted On: 11 JUN 2020 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2020

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नोवेल कोरोना विषाणू चाचणी केवळ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन - पॉलिमरेझ शृंखला प्रतिक्रिया (RT-qPCR) चाचणी करण्याची शिफारस केली आहे. कोशिकीय आणि आण्विक जीवशास्त्र (CCMB) केंद्राच्या संशोधकांनी सार्स-कोव्ह -2 चाचणीसाठी नवीन कमी खर्च येणारी आणि कमी तंत्रज्ञानाची आवश्यक चाचणी विकसित केली आहे. ही चाचणी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन नेस्टेड पीसीआर (आरटी-एनपीसीआर) चाचणी म्हणून ओळखली जाते.

या चाचणीसाठी वास्तविक-वेळ संख्यात्मक आरटी-क्यूपीसीआर आवश्यक नाही. सीसीएमबी संशोधन कार्यसंघाने विकसित केलेल्या आरटी-एनपीसीआरने मानक आरटी-क्यूपीसीआर चाचणीशी तुलनात्मक कामगिरी दर्शविली आहे. नेस्टेड पीसीआर (आरटी-एनपीसीआर) दृष्टिकोन आरटी-क्यूपीसीआरवर अवलंबून नाही तर अंतिम परीक्षणाचा भाग म्हणून मानक आरटी-पीसीआर वापरतो.

दोन्ही चाचण्यांच्या निकालांची तुलना करत असताना संशोधकांना असे आढळले की प्रमाणित आरटी-क्यूपीसीआर चाचणीमध्ये वास्तविक चाचणी परिस्थितीत कमी शोध कार्यक्षमता (50% पेक्षा कमी) असू शकते, जी बर्‍याच नमुन्यांमधील विषाणूंच्या प्रतिनिधित्वामुळे कमी असू शकते. या शोधामुळे चाचणीच्या वातावरणात थेट तपासणी कार्यक्षमतेचे परीक्षण केले गेले.

सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी इंडिया सायन्स वायरशी बोलताना सांगितले कि त्यांनी आरटी-एनपीसीआर चाचणी विकसित केली आहे ज्यामध्ये चार सार्स -कोव्ह -2 ॲप्लिकॉनच्या प्रवर्धनासाठी बहुविध प्राथमिक आरटी-पीसीआर आणि एक मानवी नियंत्रक ॲप्लिकॉन नंतर वैयक्तिक अँप्लिकॉनसाठी दुय्यम नेस्टेड पीसीआर आहे. त्यांनी पूलिंग चाचणीमध्ये आणि आरएनए अलगीकरणाशिवाय थेट प्रवर्धनात आरटी-एनपीसीआरच्या वापराची तपासणी केली.

यापूर्वी दोन आरटी-क्यूपीसीआर चाचणीपैकी एक चाचणी करून चाचणी करण्यात आलेल्या नासोफरेन्जियल स्वॅब नमुन्यांपासून वेगळ्या केलेल्या आरएनएची आरटी-एनपीसीआर वापरुन तपासणी केली गेली आणि दोन्ही आरटी-क्यूपीसीआर मानक चाचण्या घेऊन निकालांची तुलना केली गेली असून त्यात असे आढळले आहे की आरटी-एनपीसीआर चाचणी ही आरटी-क्यूपीसीआरद्वारे आढळलेल्या 90 ०% नमुन्यांची नोंद करण्यास सक्षम होती. प्रमाणित आरटी-क्यूपीसीआर चाचणी (संभवतः चुकीची नकारात्मक) द्वारे नकारात्मक असलेल्या नमुन्यांपैकी 13% नमुने देखील सकारात्मक आढळले. या अभ्यासानुसार आरटी-एनपीसीआर चाचण्यांद्वारे प्रायोगिकदृष्ट्या मोजल्या गेलेल्या खोट्या नकारात्मक दराच्या आधारे, असा अंदाज केला गेला आहे की, वास्तविक चाचणी परिस्थितीत आरटी-क्यूपीसीआरने केलेल्या एकल उत्तीर्ण चाचणीमध्ये जवळपास 50% सकारात्मक नमुने शोधून काढले जाऊ शकतात.

ही नवीन चाचणी आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आम्ही आयसीएमआरला आरटी-क्यूपीसीआर मशीन नसलेल्या ठिकाणी ही चाचणी वापरण्यास सांगू, असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

 

S.Thakur/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1630907) Visitor Counter : 354