पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम समदेक अक्का मोहा सेना पदेई टेको हूण सेन,यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा

Posted On: 10 JUN 2020 8:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जून 2020

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज कंबोडियाचे पंतप्रधान महामहीम समदेक अक्का मोहा सेना पदेई टेको हूण सेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीवर चर्चा केली. एकमेकांच्या देशात नोकरी करणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी आणि त्यांना मायदेशात परत यायला मदत करण्यासाठी यापुढेही सहकार्य सुरू ठेवायला त्यांनी सहमती दर्शविली.

पंतप्रधानांनी आसियानचा महत्वपूर्ण सदस्य आणि भारताबरोबर सामायिक सभ्यता आणि सांस्कृतिक संबंध असलेल्या कंबोडियाशी विद्यमान संबंध आणखी दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे सांगितले.

दोन्ही नेत्यांनी आयटीईसी योजनेंतर्गत क्षमता निर्माण कार्यक्रम आणि मेकॉंग-गंगा सहकार्य आराखड्याअंतर्गत त्वरित परिणाम प्रकल्पांसह दोन्ही देशांमधील मजबूत विकास भागीदारीचा आढावा घेतला.

कंबोडियाच्या पंतप्रधानांनी सांगितले कि कंबोडियासाठी  भारताबरोबरचे संबंध अधिक महत्वाचे आहेत. पंतप्रधानांनी देखील अशीच भावना व्यक्त केली आणि भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणात कंबोडियाच्या महत्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1630830) Visitor Counter : 242