PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 06 JUN 2020 7:21PM by PIB Mumbai

 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

दिल्‍ली-मुंबई, 6 जून 2020

 

आत्मनिर्भर भारत अभियानाचाएक भाग म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी भारत सरकारद्वारे घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या घोषणे नंतर, कृषी आणि संलग्न क्षेत्रात कार्यरत शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भारताला चालना देण्याच्या उद्देशाने राष्ट्रपतींनी दोन अध्यादेश जारी केले आहेत.

  1. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) अध्यादेश 2020
  2. शेतकरी हमीभाव (हक्कांचे संरक्षण व संरक्षण) आणि कृषी सेवा अध्यादेश 2020

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 4,611 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,14,073 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.20% वर पोहोचले आहे. आजमितीस 1,15,942 रुग्ण संक्रमित असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोशाळांची संख्या 520 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 222 पर्यंत (एकूण 742) वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1,37,938 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 45,24,317 आहे.

 

इतर अपडेट्स:

  • देशव्यापी टाळेबंदीमुळे उपजिविकेवर आणि आर्थिक परिस्थितीवर परिणाम झालेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा समग्र विकास करून त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा समानता, सक्षमीकरण आणि विकासासाठीचा विज्ञान विभाग (सीड) हा अनेक ज्ञानाधारित संस्था आणि विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित स्वयंसेवी संस्थांना अनुदानाधारित आर्थिक मदत पुरवित आहे.
  • परदेशातून आपल्या नागरिकांना समुद्र मार्गे भारतात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देत ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत तिसऱ्या मोहिमेसाठी भारतीय नौदलाचे जलाश्व हे जहाज 04 जून 20 रोजी  मालदीव मधील माले येथे पोहचले होते - ते 05 जून 20 रोजी 700 भारतीय नागरिकाना घेऊन काल सायंकाळी उशिरा भारतासाठी रवाना झाले. भारताकडे प्रस्थान करण्यापूर्वी मालदीव तटरक्षक दलाचे कमांडंट कर्नल मोहम्मद सलीम यांनी या जहाजाला भेट दिली.
  • विशिष्ट संस्था योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक बैठक झाली. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्य मंत्री संजय धोत्रे सह अध्यक्ष म्हणून बैठकीला उपस्थित होते. प्रतिष्ठीत संस्था योजना आणि एचईएफएच्या कामाच्या देखरेखीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयामधे प्रकल्प व्यवस्थापन युनिट 15 दिवसात स्थापन करण्यात यावा असे मंत्र्यांनी बैठकीत सांगितले. बांधकामविषयक कामे पुन्हा  आता सुरु करता येणार आहेत  असे सांगून कोविड-19 मुळे   प्रतिष्ठीत संस्थामधे  थांबलेल्या कामाना आता गती द्यावी असे त्यांनी सुचवले.
  • संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या (डीडीपी), उच्चस्तरीय अधिकृत समितीने (एचएलओसी) आज ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी) अर्थात आयुध कारखाना मंडळाच्या व्यावसायीकरणावर कर्मचाऱ्यांच्या महासंघ / संघटनांशी संवाद साधण्यास पुढाकार घेतला आहे.
  • भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्यावतीने दि. 4 जून,2020 रोजी 'देखो अपना देश' या वेबिनार मालिकेचे 28 सत्र प्रदर्शित करण्यात आले. "इंडिया- ए गोल्फर्स पॅराडाईस" या शीर्षकाअंतर्गत दाखवलेल्या या सत्रामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी गोल्फ खेळण्यासाठी असलेल्या स्थानांचा परिचय करून दिला. तसेच त्या स्थळांचे सौंदर्य, वैशिष्ट्ये दाखवण्यात आली. आणि देशातल्या तसेच परदेशातल्या गोल्फप्रेमींना भारतामध्ये वर्षातले सर्व म्हणजे 365 दिवस सुट्टीचा आनंद प्रदान करणारी ही गोल्फ स्थाने असल्याचे सांगितले.

 

महाराष्ट्र अपडेट्स

2,436 नवीन केसेस सहित महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 80,229 झाली आहे. तर सक्रिय केसेसची संख्या 42,215 आहे. हॉटस्पॉट असलेल्या मुंबईमध्ये 1,150 नवीन रुग्ण आढळले त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या 45,854 झाली आहे. यापैकी 25,539 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा महाराष्ट्रातील दर 43.81 टक्के असून मृत्यूदर 3.55 टक्के आहे.

 

* * *

RT/MC/SP/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1629925) Visitor Counter : 26