• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
संरक्षण मंत्रालय

ओपी समुद्र सेतू - आयएनएस जलाश्व 700 भारतीयांसह माले येथून तुतीकोरिनसाठी रवाना

प्रविष्टि तिथि: 06 JUN 2020 1:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2020


परदेशातून आपल्या नागरिकांना समुद्र मार्गे भारतात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देत ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत तिसऱ्या मोहिमेसाठी भारतीय नौदलाचे जलाश्व हे जहाज 04 जून 20 रोजी  मालदीव मधील माले येथे पोहचले होते - ते 05 जून 20 रोजी 700 भारतीय नागरिकाना घेऊन काल सायंकाळी उशिरा भारतासाठी रवाना झाले. भारताकडे प्रस्थान करण्यापूर्वी मालदीव तटरक्षक दलाचे कमांडंट कर्नल मोहम्मद सलीम यांनी या जहाजाला भेट दिली.

या फेरीबरोबरच केंद्र सरकारच्या मिशन वंदे भारतच्या व्यापक मोहिमेंतर्गत जलाश्व मालदीव आणि श्रीलंका मधील सुमारे 2700 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या भारतीय किना-यावर परत आणेल.

जहाजावर कोविड प्रोटोकॉलचे  कठोर पालन केले जाईल आणि 07 जून 20 रोजी ते तूतीकोरिनला पोहोचणे अपेक्षित आहे.

सुखरूप सुटका केलेल्या लोकांना तामिळनाडूच्या तुतीकोरिन येथे उतरवण्यात येईल आणि राज्य प्रशासनाच्या देखरेखीखाली सोपविण्यात येईल.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1629848) आगंतुक पटल : 300
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate