• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
संरक्षण मंत्रालय

आयुध कारखाना मंडळाच्या व्यावसायीकरणावर संरक्षण मंत्रालयाने आयुध कारखाना मंडळाच्या कर्मचारी संघटनांबरोबर साधला संवाद

प्रविष्टि तिथि: 05 JUN 2020 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या (डीडीपी), उच्चस्तरीय अधिकृत समितीने (एचएलओसी) आज ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी) अर्थात आयुध कारखाना मंडळाच्या व्यावसायीकरणावर कर्मचाऱ्यांच्या महासंघ / संघटनांशी संवाद साधण्यास पुढाकार घेतला आहे.

अतिरिक्त सचिव (डीडीपी) श्री व्ही.एल. कंठा राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संरक्षण मंत्रालय व लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'कॉन्फेडरेशन ऑफ डिफेन्स रेकग्नाईज्ड असोसिएशन' (सीडीआरए), 'इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज गॅझेटेड ऑफिसर्स असोसिएशन' (आयओएफजीओए) आणि 'नॅशनल डिफेन्स ग्रुप-बी गॅझेटेड ऑफिसर्स असोसिएशन' (एनडीबीजीजीओए) या तीन संघटनाबरोबर बैठका घेतल्या; ज्यामध्ये सर्व हितधारकांच्या सहभागाने वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा हेतू सांगितला गेला आणि आयुध कारखाना मंडळाला एक किंवा अधिक 100 % व्यावसायिक संस्थांमध्ये रूपांतरित करताना वेतन, पगार, सेवानिवृत्तीचे फायदे, आरोग्य सुविधा आणि इतर सेवा इत्यादी बाबतीत कर्मचार्‍यांचे फायदे / हितसंबंधांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने संघटनेच्या सदस्यांकडून सूचना मागविण्यात आल्या.

भविष्यातील मागणी आणि नवीन व्यावसायिक घटक / संस्थांना शासनाकडून आवश्यक अर्थसंकल्पीय पाठबळ या संदर्भात त्यांच्या चिंतेवरही सूचना मागविण्यात आल्या.

सौहार्दपूर्ण वातावरणात बैठकीत चर्चा झाली. आयुध कारखाना मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या महासंघ / संघटनांनी एकत्रितपणे जास्तीत जास्त बैठका आयोजित करण्याच्या संघटनेच्या विनंतीवर समितीने विचार केला आणि महासंघ / संघटनांशी संबंध कायम ठेवले जातील असे आश्वासन देण्यात आले.

आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून, सरकारने 16 मे 2020 रोजी आयुध कारखाना मंडळाच्या व्यवसायीकरणाद्वारे आयुध पुरवठ्यात स्वायत्तता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता सुधारण्याची घोषणा केली होती.

कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधित्व सीडीआरएचे अध्यक्ष बी के सिंह आणि सरचिटणीस बी बी मोहंती यांनी केले. आयओएफएसजीओएचे प्रतिनिधित्व सरचिटणीस एस बी चौबे यांनी आणि महा कोषाध्यक्ष एम ए सिद्दीकी यांनी केले तर एनजीडीबीजीओएचे प्रतिनिधित्व अध्यक्ष एम. बारिक आणि सरचिटणीस जयगोपाल सिंग यांनी केले.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1629754) आगंतुक पटल : 315
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate