शिक्षण मंत्रालय
प्रतिष्ठीत संस्था योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
Posted On:
05 JUN 2020 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2020
विशिष्ट संस्था योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक बैठक झाली.केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्य मंत्री संजय धोत्रे सह अध्यक्ष म्हणून बैठकीला उपस्थित होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे आणि प्रतिष्ठीत संस्था योजना सहसचिव चंद्र शेखरही यावेळी उपस्थित होते.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे ब्युरो प्रमुख,विविध संस्थाचे संचालक आणि प्रतिष्ठीत संस्थाच्या कुलगुरूनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली.
नुकत्याच जारी झालेल्या द आशिया मानांकनात पहिल्या 100 मधे स्थान प्राप्त करणाऱ्या बंगळूरू आयआयएससी आणि इतर आयआयटीच्या केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदन केले. इतर संस्थांनी आपले मानांकन उंचावण्यासाठी यांचे अनुकरण करावे असे आवाहन त्यांनी केले.नव भारत घडवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी संस्थांनी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपले आंतरराष्ट्रीय मानांकन कसे उंचावू शकतो हे सुचवण्यासाठी या संदर्भात आयआयटीच्या संचालकांचे पथक नियुक्त करता येईल असे ते म्हणाले. "भारतात शिक्षण घ्या" या योजने अंतर्गत, ब्रान्ड विकसित करण्यासाठी आपण कृती आराखडा विकसित करायला हवा असे ते म्हणाले.
Held a review meeting on the progress of works sanctioned under the Institute of Eminence Scheme of IOE, along with the MOS for HRD, Shri @SanjayDhotreMP ji today. pic.twitter.com/IA8e1nwo54
— Dr Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank)
June 5, 2020
प्रतिष्ठीत संस्था योजना आणि एचईएफएच्या कामाच्या देखरेखीसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयामधे प्रकल्प व्यवस्थापन युनिट 15 दिवसात स्थापन करण्यात यावा असे मंत्र्यांनी बैठकीत सांगितले. प्रतिष्ठीत संस्थाच्या विविध सार्वजनिक संस्थाना सामंजस्य करारानुसार करण्यात आलेल्या खर्चासाठी निधी जारी करण्याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून प्रतिबद्धता पत्र जारी करण्यात येईल असे आश्वासन निशंक यांनी दिले. बांधकामविषयक कामे पुन्हा आता सुरु करता येणार आहेत असे सांगून कोविड-19 मुळे प्रतिष्ठीत संस्थामधे थांबलेल्या कामाना आता गती द्यावी असे त्यांनी सुचवले.
प्रत्येक संस्थेने तीन वर्षासाठी पुढचे आराखडे मांडणारे व्हिजन डॉक्युमेंट तयार करून ते मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठवावे असे ते म्हणाले.विविध संस्थांमध्ये सुरु असलेले संशोधन आणि नाविन्यता विषयक कार्य व्यापक प्रसारासाठी YUKTI पोर्टलवर अपलोड करावे असेही त्यांनी सांगितले. सामंजस्य कराराचा मसुदा आणि खाजगी संस्थांची तपासणी या मुद्यांवरही बैठकीत चर्चा झाली.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
(Release ID: 1629760)
Visitor Counter : 296