PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात, म्हणजेच 17 मे पर्यंतच्या कालावधीत जनतेने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे : डॉ. हर्षवर्धन

Posted On: 03 MAY 2020 7:43PM by PIB Mumbai

Delhi-Mumbai, May 3, 2020

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices  and Fact checks undertaken by PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वित्तीय क्षेत्रातल्या बाबींविषयी रणनीती त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत कल्याण आणि विकासाला चालना देण्यासाठी संरचनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. वित्त मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि शेतकऱ्यांना सहाय्य, रोकड सुलभता वाढवणे तसेच पत विषयक ओघ बळकट करण्यासाठीच्या रणनितीवर चर्चा झाली. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर वित्तीय स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी मार्ग आणि साधने यावर तसेच कोविडच्या परिणामातून व्यापार क्षेत्राने लवकर सावरावे यासाठीच्या उचलण्यात आलेल्या पावलांबाबतही बैठकीत चर्चा झाली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने  सातत्याने एकत्रितपणे आणि सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

कोविड-19 च्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेजला भेट दिली. या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी, संचालकांचे कार्यालय, आपत्कालीन कक्ष, बाह्य रुग्ण विभाग, नमुना संकलन केंद्र, कोविड ब्लॉक-गंभीर रुग्ण कक्ष, रेड झोन क्षेत्र आणि डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचारी यांना PPE सूट्स बदलण्याची जागा अशा सर्व भागांचा दौरा केला.

या रुग्णालयात कार्यरत डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना रुग्णालयाच्या कर्करोग उपचार इमारतीत, जिथे आता कोविड विशेष सुविधा आहेत, तिथे स्नान, कपडे बदलणे आणि निर्जंतुकीकरणासाठी स्प्रे अशा सुविधा  दिल्या जात आहेत, या सुविधांबद्दल डॉ हर्षवर्धन यांनी समाधान व्यक्त केले. या लढ्यात पहिल्या फळीत काम करणाऱ्या सर्वांशी दिवसातून दोनदा संवाद साधण्याच्या रुग्णालय प्रशासनाच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

लॉकडाऊन च्या तिसऱ्या टप्प्यात, म्हणजेच 17 मे पर्यंतच्या कालावधीत जनतेने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी जनतेला केले.

 कोविड-19 ची संक्रमण साखळी तोडण्यासाठी हा एकमेव उपाय असून, नागरिकांनी तो गांभीर्याने करावा, असे ते म्हणाले. तसेच, कोविड चा सामना करणाऱ्या डॉक्टरांशी गैरवर्तन करु नये तसेच कोविडचे जे रुग्ण बरे झाले आहेत, ते कोविडवर मात करणारे रुग्ण असून, त्यांच्याशी गैरवर्तन करु नये, असेही आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी केले.

आतापर्यंत 10,632 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत,682 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 26.59% इतका आहे. आज देशभरात, कोरोनाचे एकूण रुग्ण 39,980 इतके आहेत. कालपासून, देशभरात कोविडचे 2644 नवे रुग्ण आढळले आहेत.

इतर अपडेट्स :

  • कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढाईत कोरोना योद्ध्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदान आणि त्यागाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्यांना सलाम केला. अमित शहा यांनी ट्विट मध्ये म्हंटले की, भारत आपल्या वीर कोरोना योद्ध्यांना सलाम करतो. मी तुम्हाला खात्री देतो की, मोदी सरकार आणि संपूर्ण देश तुमच्या सोबत उभा आहे. देशाला कोरोना मुक्त करून, आपल्याला या आव्हानांना संधीत रुपांतरीत करायचे आहे आणि निरोगी, समृद्ध व बळकट भारत निर्माण करून जगासमोर एक उदाहरण ठेवायचे आहे. जय हिंद!.  मुंबईमध्ये आज भारतीय हवाई दलातर्फे कोविड योद्ध्यांच्या सन्माना प्रित्यर्थ लढाऊ विमानांचे उड्डाण पाहायला मिळाले. देशभरात राबविण्यात आलेल्या कोविड योद्ध्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या कार्यक्रमाचा तो भाग होता.
  • केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई )आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अनुसूचित जाती -अनुसूचित जमातीतील  (एससी-एसटी) उद्योजकांच्या मालकीच्या एमएसएमईवर कोविड -१९  च्या परिणामाबाबत  दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डीआयसीसीआय) च्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादादरम्यान डीआयसीसीआयच्या प्रतिनिधींनी कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर एससी-एसटी एमएसएमईला सामोरे जावे लागत असलेल्या विविध आव्हानांबाबत काही सूचनांसह चिंता व्यक्त केली आणि या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून मदत मागितली.
  • लॉक डाऊन दरम्यान देशांतर्गत आंतरराज्य माल  वाहतुकीसह रिकाम्या ट्रकची ये-जा करण्याबाबत चालक आणि  वाहतूकदारांच्या तक्रारी आणि मुद्यांचे  जलद गतीने निराकरणासाठी, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचा  उपयोग करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अधिकारी या कामासाठी नियुक्त केले जातील.
  • कोरोनाव्हायरस विरुद्धच्या लढ्यात कॉन्टॅक्ट ड्रेसिंग हे खूप सहाय्यभूत ठरत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना संसर्ग झालेल्या लोकांबरोबरच कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. विषश म्हणजे यामध्ये आरोग्य सेतू अँपची खूप मदत होत आहे.
  • रेल्वेकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या इतर व्यक्तींसाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार काही विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. इतर सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद राहतील. रेल्वे केवळ राज्य सरकारांनी पाठवलेले आणि सुविधा पुरवलेले प्रवासी घेत आहे. प्रवाशांचा कोणताही गट किंवा व्यक्तीनी स्थानकावर यायला परवानगी  नाही.
  • कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात खरेदी आणि लॉजिस्टिकविषयक समस्या असतानाही प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र- PMBJAK ने एप्रिल महिन्यात 52 कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली असून, मार्च महिन्यात या औषधांची 42 कोटी रुपयांची विक्री झाली होती, तर एप्रिल 2019 मध्ये ही विक्री 17 कोटी इतकी होती.

महाराष्ट्र अपडेट्स

  • एका दिवसात 790 केसेसची नोंद झाल्यानंतर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 12,296 झाली आहे. 521 ची एकूण मृत्यू संख्या देखील देशभरात सर्वाधिक आहे. मुंबई संदर्भातली आकडेवारी 322 मृत्यू आणि आठ 8,359 पेशंट आहे. आणखी 27 केसेसची नोंद झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या 360 झाली आहे. यापैकी मालेगाव मध्ये 324 केसेस आहेत.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने राज्यात लागू होणारे दिशानिर्देश जारी केली आहेत

***

 

RT/MC/SP/PM

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1620720) Visitor Counter : 181