• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
Ministry of Health and Family Welfare

कोरोना विरुद्धच्या लढ्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बनलं प्रमुख साधन

Posted On: 03 MAY 2020 1:44PM

मुंबई, 3 मे 2020

 

कोरोनाव्हायरस विरुद्धच्या लढ्यात कॉन्टॅक्ट ड्रेसिंग हे खूप सहाय्यभूत ठरत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे कोरोना संसर्ग झालेल्या लोकांबरोबरच कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. विषश म्हणजे यामध्ये आरोग्य सेतू अँपची खूप मदत होत आहे.

खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये बरेच लोक परदेशातून आले होते, ज्यांच्यामध्ये या विषाणूची लक्षणे आढळली होती. या व्यक्ती स्वतः बरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना सुद्धा लपवत होते. इतकंच नव्हे तर ते कुठे गेले, कोणाला भेटले इत्यादी गोष्टीसुद्धा सांगण्यासाठी कचरत होते.

मात्र यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि इम्मिग्रेशन सेंटर यांच्याकडून परदेशातून आलेल्या व्यक्तींचा डाटा मागवला आणि विविध माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला गेला.

जसजशी रुग्णांची संख्या वाढत गेली तसतशी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती एकत्र केली गेली आणि या आधारावर नॅशनल सेंटर फॉर डिजीस कंट्रोल या विभागाने सर्विलन्स आणि रिस्‍पॉन्‍स सिस्‍टम स्थापन केली.

कॉन्टेक्ट ट्रेसिंग म्हणजे काय...

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेला कॉन्टेक्ट ट्रेसिंग असं म्हंटलं जातं. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला हा संसर्ग होऊ शकतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यास हा संसर्ग होण्याची भीती जास्त असते. म्हणूनच कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना 14 दिवस अलगीकरणात ठेवले जाते. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवणं महत्वपूर्ण आहे जेणेकरून त्यांची काळजी घेतली जाईल आणि गरज भासल्यास तात्काळ उपचारही केले जातील.

कॉन्टेक्ट ट्रेसिंग तीन प्रकार ची असते

    1. संपर्कात आलेल्या व्यक्तींची ओळख

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट होते तेव्हा त्या व्यक्तीला हा आजार झाल्यापासून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसंदर्भात माहिती घेतली जाते.

    1. संपर्क सूची

संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची सूची तयार केली जाते त्यांना स्वतःलाच आयसोलेट होण्यास सांगितले जाते आणि लक्षणं आढळल्यास मेडिकल टीमशी संपर्क साधण्यास सांगितले जाते. तसंच संपर्कात आलेल्या या व्यक्तींना या रोगाला आळा घालण्यासंदर्भातही माहिती दिली जाते.

    1. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांशी वेळोवेळी संपर्क

कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींसोबत आरोग्य अधिकारी नियमितपणे संपर्क ठेवून असतात. संपर्कात आलेल्या या व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळत तर नाहीत ना याबाबत ते लक्ष ठेवून असतात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

लॉक डाऊनच्या नियमांचं पालन करत असताना खरं तर प्रत्येक व्यक्ती ही सवय आत्मसात करु शकते. जेव्हा आपण काही महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडतो तेव्हा आपण ज्या ज्या व्यक्तींना भेटतो त्यांची एक यादी एक वहीत आपण लिहून ठेऊ शकतो. या माहितीचा उपयोग कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी जाऊ शकतो.

आरोग्य सेतू ॲप कशा प्रकारे मदत करत आहे.

नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे डॉक्टर नंदकुमार यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपण महत्वाच्या कामासाठी बाहेर जातो किंवा कार्यालयात जातो तेव्हा तिथे संसर्ग होण्याची भीती किती आहे याबद्दल आपल्याला माहिती नसते. अशा ठिकाणी आरोग्य सेतू ॲप आपल्याला अलर्ट करतो. ज्या भागात संसर्ग जास्त आहे अशा भागाबद्दल हे ॲप आपल्याला अलर्ट करते. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ब्लूटूथच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग ला मदत होते. जर एखाद्या व्यक्तीला धोरणाचा संसर्ग झाला आहे तर हे ॲप त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची माहिती आपल्याला देतं.

आरोग्य सेतू ॲप आपण जर आपल्या मोबाईलमध्ये असेल तर आपण संसर्गापासून खूप दूर राहू शकतो असं मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर मनोज तिवारी यांनी म्हटले आहे. या ॲप मध्ये आपण जागरूक कसे राहिले पाहिजे या संदर्भात ही माहिती दिली आहे तसेच महत्त्वाच्या ताज्या घडामोडी ही यामध्ये सांगितल्या जातात देशातील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावा आणि या संसर्गापासून आपलं रक्षण करावं.

स्वयं-मुल्यांकन हेही आरोग्य सेतू ॲपचे वैशिष्ट्य आहे, ज्याद्वारे योग्य कृती करण्यासाठी आपल्याला अचूक उत्तर मिळू शकते. तसंच 1075 ह्या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाऊ शकते.

स्वयं मुल्यांकन चाचण्यांमुळे कोविडच्या लक्षणांबाबत आपण जागरूक राहतो आणि त्यामुळे वापरकर्त्याला वेळोवेळी स्वतःच्या आरोग्याबाबत परीक्षण करता येते. कोविडच्या ताज्या माहितीच्या वैशिट्यामुळे आपल्याला सद्याची राज्याची आणि देशातील आकडेवारी कळू शकते.

आरोग्य सेतू ॲपमधील फीचर्समुळे एखाद्या व्यक्तीला संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत सल्ला आणि आजूबाजूची प्रकरणे याबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेसाठीही आपल्याला योगदान देता येऊ शकते.

या ॲपमध्ये रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, मास्क कसे तयार करायचे, ते वापरायचे कसे याविषयीच्या उपलब्ध माहितीच्या माध्यमातून कोविड विरुद्धचा लढा कसा लढायचा याविषयी जागृती केली जाऊ शकते. आरोय सेतू ॲप डाऊनलोड करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करा आणि PMCARES मध्ये आपले योगदान द्या. आपली सर्वात छोटी मदत सुद्धा या लढ्यात खूप महत्वपूर्ण आहे.

R.Tidke/P.Malandkar

 

 

(Features ID: 150602) Visitor Counter : 10
Link mygov.in