रसायन आणि खते मंत्रालय
कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान, जनऔषधी केंद्रांनी केली विक्रमी विक्री; एप्रिल2020 पर्यंत 52 कोटी रुपयांच्या औषधांची विक्री
Posted On:
03 MAY 2020 3:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2020
कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात खरेदी आणि लॉजिस्टिकविषयक समस्या असतानाही प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र- PMBJAK ने एप्रिल महिन्यात 52 कोटी रुपयांच्या औषधांची विक्रमी विक्री केली असून, मार्च महिन्यात या औषधांची 42 कोटी रुपयांची विक्री झाली होती, तर एप्रिल 2019 मध्ये ही विक्री 17 कोटी इतकी होती.
आज जेव्हा संपूर्ण देश कोविड-19 च्या आव्हानांचा सामना करत आहे, अशावेळी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांना मोठी मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी जनऔषधी केंद्रे तत्पर असून एप्रिल महिन्यात त्यांनी जनतेला 52 कोटी रुपये किमंतीच्या स्वस्त आणि उत्तम दर्जाच्या औषधांची विक्री केली आहे. बाजारातील औषधांपेक्षा कमी किमतीची ही औषधे असल्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांच्या सुमारे 300 कोटी रुपयांची बचत झाली आहे. जनऔषधी केंद्रांवर मिळणारी औषधे सरासरी किमतींपेक्षा 50 ते 90 टक्के स्वस्त असतात.
@pmbjpbppi is committed to ensure uninterrupted availability of medicines to people of the country. In spite of lockdown and problems in procurement & logistics, Janaushadhi has achieved an appreciable sales turnover of Rs 52 Cr in April 2020 as compared to Rs 42 Cr in March 2020 pic.twitter.com/t7sHryXyUd
— Sadananda Gowda (@DVSadanandGowda)
May 1, 2020
.@pmbjpbppi के #CoronaWarriors इस संकट की घड़ी में राष्ट्रसेवा का जज्बा लिए जन-जन तक सस्ती एवं गुणवत्ता वाली दवाएं पहुंचे इसे सुनिश्चित कर रहें हैं।
निःसंदेह इन कर्म-योगियों का योगदान सराहनीय है, आइए हम सब मिलकर इन योद्धाओं को नमन करें, सम्मान करें। #IndiaFightsCarona pic.twitter.com/Lj5rhD1bWI
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya)
May 3, 2020
या विक्रमी विक्रीसाठी तसेच या कठीण काळात गरजूंना अविरत सेवा देण्यासाठी, केंद्रीय रसायने आणि खाते मंत्री, सदानंद गौडा आणि राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जनऔषधी केंद्र विक्रेत्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रधानमंत्री जनऔषधी योजनेच्या माध्यमातून देशातील जनतेला माफक दरात औषधांचा अखंडित पुरवठा करण्यासाठी आपले मंत्रालय कटिबद्ध आहे, अशी ग्वाही गौडा यांनी दिली.
कोविड-19 च्या लढ्यात, केंद्र सरकार PMBJP सारख्या योजनांच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेंतर्गत 900 पेक्षा जास्त जेनेरिक औषधे आणि 154 सर्जिकल उपकरणे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.
भारतीय औषधक्षेत्रातील सार्वजनिक कंपन्या विभाग, BPPI चे कार्यकारी प्रमुख, सचिन कुमार सिंग यांनी सांगितले, की BPPI ने विकसित केलेल्या “जनऔषधी सुगम मोबाईल’ ॲपमुळे जनतेला त्यांच्या आसपास जन औषधी केंद्र कुठे आहे,तसेच तिथे त्यांना हवी असलेली औषधे आहेत की नाही,त्यांच्या किमती काय आहेत हे कळू शकते. सध्या 325000 लोक या ॲपचा वापर करत आहेत. ॲन्ड्रोइड आणि आय-फोन फ्लॅटफॉर्मवर हे ॲप उपलब्ध आहे. सध्या देशभरातील 726 जिल्ह्यांमध्ये 6300 जनऔषधी केंद्र कार्यरत आहेत.

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
(Release ID: 1620603)
Visitor Counter : 209
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam