रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रिकाम्या आणि मालवाहू वाहनांच्या दळणवळण संदर्भात वाहतूकदारांच्या तक्रारी/ मुद्यांच्या निराकरणासाठी केंन्द्रीय गृह मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष उपयोगात आणणार
केंद्रीय गृह मंत्रालय हेल्प लाईन क्रमांक 1930 आणि एनएचएआय हेल्प लाईन क्रमांक 1033 चा सहाय्यासाठी उपयोग करता येणार
Posted On:
03 MAY 2020 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2020
लॉक डाऊन दरम्यान देशांतर्गत आंतरराज्य माल वाहतुकीसह रिकाम्या ट्रकची ये-जा करण्याबाबत चालक आणि वाहतूकदारांच्या तक्रारी आणि मुद्यांचे जलद गतीने निराकरणासाठी, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचा उपयोग करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अधिकारी या कामासाठी नियुक्त केले जातील.
लॉक डाऊन काळात या संदर्भातल्या तक्रारींसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष क्रमांक म्हणजेच 1930 हा क्रमांक चालक आणि वाहतूकदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.राष्टीय महामार्गाशी संबंधित तक्रारीसाठी एनएचएआय हेल्प लाईन क्रमांक 1033 उपलब्ध करून देण्यात आला आहे.रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांचे वाहतूक विभाग,वाहतूक संघटना, चालक आणि वाहतूकदारांना माहिती पुरवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातून, केंद्रीय गृह मंत्रालय नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी वाहतूक क्षेत्र आणि चालकांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मदत करतील. तक्रारींचा दैनंदिन अहवाल हे अधिकारी सादर करतील.
लॉक डाऊनच्या काळातली वाहतूक केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेश आणि मार्गदर्शक सूचनांना अनुसरून करण्यात येते.
मालवाहू वाहनांची आणि रिकाम्या ट्रकची आंतरराज्य तसेच चालक, क्लिनर यांची घरापासून ट्रक पार्किंग पर्यंत ये-जा करण्याबाबत चालक आणि वाहतूकदारांच्या तक्रारींचे निवारण या द्वारे करण्यात येते.
कोवीड-19 ला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात आंतर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामधली वाहतूकीतील अडथळ्यांची दखल घेण्यासाठी ही यंत्रणा फार उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620666)
Visitor Counter : 311
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam