PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशीम या चार जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही : आरोग्य मंत्रालय कोरोनाशी लढण्यासाठी 1.24 कोटी कोविडयोद्धे सज्ज
Posted On:
21 APR 2020 7:53PM by PIB Mumbai
Delhi-Mumbai, April 21, 2020
(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from field offices, and Fact checks undertaken by PIB)
आपला देश आणि देशवासियांसाठी धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता उत्कट भावना आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. येत्या शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या पवित्र रमजान महिन्यातील सर्व धार्मिक रिती-रिवाज आणि प्रार्थना आपापल्या घरी राहूनच करणार असल्याचा निर्णय मुस्लिम समाजातील सर्व धार्मिक नेते, इमाम, धार्मिक आणि सामाजिक संस्था आणि संपूर्ण मुस्लिम समुदायाने संयुक्तपणे घेतला आहे, अशी माहिती नक्वी यांनी दिली.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवर पत्रकार परिषद
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.
- अधिकारप्राप्त गट 4 च्या अध्यक्षांना कोविड-19 साठी मनुष्यबळ आणि क्षमता बांधणीत वाढ करण्याची जबाबदारी दिली आहे,त्यांनी कोविड वॉरियर्स च्या ऑनलाइन आकडेवारीची माहिती दिली. आता 1.24 कोटी कोविडयोद्धे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
- कोविड19 च्या लढयात व्यवस्थापन कार्यात सहभागी होऊ शकणाऱ्या कोविड योद्ध्यांची 20 श्रेणी आणि 49 उपश्रेणीत वर्गवारी करण्यात आली आहे. या सगळ्यांची माहिती कोविडवॉरियर्स पोर्टलवर उपलब्ध असून राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात सेवेसाठी ते उपलब्ध आहेत.- अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट-4
- कोविडयोद्धे स्वयंसेवक तीन प्रकारच्या कामांमध्ये सहभागी आहेत. सामाजिक अंतर सारख्या प्रतिबंधक उपाययोजना, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, प्रत्यक्ष स्थानावर देखरेख, रोगनिवारक घटक
- केंद्र सरकारने iGOT प्लॅटफॉर्म सुरु केला असून त्यावरुन कोणत्याही उपलब्ध उपकरणाद्वारे कुठेही, केव्हाही प्रशिक्षण दिले जाऊ शकते. 14 अभ्यासक्रम, 53 मॉड्युल, 113 व्हिडीओ व 29 प्रशिक्षण कागदपत्रे उपलब्ध. 2 आठवड्यात 1.31 लाख वापरकर्ते - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 4
- 550 जिल्ह्यात 40,000 इंडियन रेड क्रॉस स्वयंसेवक 19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 3500 NCC कॅडेट्स आणि 500 NCC कर्मचारी, आणखी 47,000 NCC कॅडेट्स नी नोंदणी केली 1.80 लाख माजी सैनिक कामासाठी तयार असून 6,300 जण आधीच सेवेत तैनात आहेत
- कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी 15,000 आयुष व्यावसायिक 17 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. 1 लाख आयुष व्यावसायिक आणि 55,000 आयुष विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यांना तैनात करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. - अध्यक्ष, अधिकारप्राप्त गट 4
- अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात नेहरू युवा केंद्र आणि एनएसएस चे 27 लाख स्वयंसेवक मदतकार्य करत आहेत. गेल्या महिन्यात 18.4 लाख नव्या स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे.- अध्यक्ष ,अधिकारप्राप्त गट, 4
- 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातल्या 61 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यात महाराष्ट्रातील खालील चार जिल्ह्यांची भर पडली आहे- लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशीम.
- केंद्र आणि राज्यांना एकत्र काम करता यावे आणि #COVID19 विरोधातील लढा जिंकता यावा, यासाठी 4 राज्यांमध्ये 6 आंतर- मंत्रालयीन पथके पाठवण्यात आली आहेत. – गृह मंत्रालय
- लॉकडाऊन च्या अंमलबजावणीबाबत गृहमंत्रालयाने स्थानिक पातळीवरील स्थितीचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी 20 एप्रिलपासून काही कामांना परवानगी देण्यात आली आहे, तिथे समाधानकारक सुरुवात झाली आहे. काही राज्यात मनरेगा आणि रस्ते बांधणीची कामे सुरु करण्यात आली आहेत
- आतापर्यंत 4,49,810 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.काल, 35,852 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 29,776 चाचण्या ICMR च्या 201 प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या. आणि 6,076 चाचण्या खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या.
- केंद्र सरकारने व्यापक हित लक्षात घेऊन परिस्थितीचे जागीच मूल्यमापन करून तिचे निराकरण करण्याकरता राज्याच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यासाठी आणि त्याविषयीचा अहवाल केंद्र सरकारला पाठवता यावा, यासाठी (#IMCTs) ची स्थापना केली आहे.
- सर्व राज्यांना रॅपिड टेस्ट किट्स पाठवण्यात आल्या आहेत. या किट्स मध्ये कमी निदान होत असल्याची तक्रार आल्यावर आम्ही 3 राज्यांशी चर्चा केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार, RT-PCR च्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या निदानात मोठी तफावत आढळली आहे, ही तफावत 6% पासून 71% एवढी आहे.- ICMR
- हा आजार सगळ्यांसाठीच नवा असल्यामुळे, जसजसे आपण पुढे जात आहोत, तसतसे अनुभवातून आपल्या पद्धतीत बदल करत आहोत. मात्र, त्याचवेळी, कोविड-19 च्या RT-PCR चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या निदानात आलेल्या तफावतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे ही आम्ही ठरवले आहे.
- RT-PCR पॉझिटीव्ह नमुन्यांमध्ये दिल्लीत ~71 टक्के निदानाचा दर मिळवण्याचे आम्ही ठरवले आहे. मात्र, या चाचणीत आलेली तफावत बघता, पुढचे दोन दिवस आमच्या 8 संस्थामधल्या टीम मैदानावर पाठवून अनेक जणांचे नमुने गोळा करुन या निदानांची पडताळणी करण्याचे आम्ही ठरवले आहे.
- पुढील दोन दिवसात कोविड-19 चाचणीचे किट्स वापरू नका असे निर्देश राज्यांना देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे, कारण या बॅचमध्ये काही दोष असल्यास आम्ही हे किट्स बदलून देण्याची सूचना कंपनीला करणार आहोत.
- आतापर्यंतच्या कोविड19 च्या रुग्णांची संख्या-18,601,गेल्या 24 तासांत- 1,336 नवे रुग्ण; 3,252 जण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 17.48% आहे 4 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. इतर 61 जिल्ह्यांतही गेल्या 14 दिवसांत नवे रुग्ण आढळले नाहीत
- आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये कोविड-19 चे संशयित/ पुष्टी झालेले रुग्ण सापडल्यावर आवश्यक असलेल्या कृतीबाबत आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.
- रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असेल याची काळजी घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना कळवलं आहे.
- कोविड-19 संशोधन संघासाठी जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य परिषदेने अर्ज मागवले आहेत. पहिल्या टप्प्यात 500 अर्ज आले असून, निधीविषयक साहाय्य करण्यासाठी आजपर्यंत 16 प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
- कोविड-19 चे जे गंभीर रुग्ण ग्राम-निगेटिव्ह सेप्सीस च्या आजाराचा सामना करत आहेत त्यांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी एक औषध उपयुक्त ठरु शकेल का याची चाचणी CSIR द्वारे केली जाणार आहे. DCGI ने ही चाचणी करण्यास परवानगी दिली असून, अनेक रुग्णालयांमध्ये लवकरच या चाचण्या सुरु होतील.
- रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होत आहे, सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर कोविड-19 च्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नाही
- आतापर्यंत केलेल्या एकूण कोविड-19 चाचण्यांमध्ये, 69% रुग्ण लक्षणविरहित होते आणि 31% रुग्णांमध्ये लक्षणे होती
- कोविड19 विषयीच्या शास्त्रीय ज्ञानाबाबत गेल्या काही महिन्यांतच, महत्वपूर्ण प्रगती झाली आहे. लॉकडाऊनच्या मदतीने आपण संसर्गाला आळा घालून आपली सज्जता आणि रुग्णालयांची उपलब्धता सुनिश्चित करत आहोत, लस/ औषध विकसित होण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी आपण ही तात्पुरती उपाययोजना करत आहोत.-ICMR
- समुदाय निरीक्षण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चा वापर करुन, आपण हाय रिस्क असलेल्यांच्या संपर्कात आलेल्या सौम्य किंवा काहीही लक्षणे नसलेल्या रुग्णांबाबत आगाऊ काळजी घेत आहोत,जेणेकरुन आपल्याला रुग्णांचे लवकर निदान करुन त्यांच्यावर उपचार करणे आणि मृत्यूदर कमी करणे शक्य व्हावे- आरोग्य मंत्रालय
- केंद्रीय पथकांना महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये पूर्ण सहकार्य मिळत आहे. मात्र, कोलकाता आणि जलपैगुडी येथे गेलेल्या केंद्राच्या पथकांना पश्चिम बंगाल सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याची माहिती, तिथे गेलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे – गृह मंत्रालय
- कोलकाता आणि जलपैगुडी येथील पथकांना सार्वजनिक क्षेत्रभेटीसाठी, आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आणि त्या भागाचे मूल्यमापन करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जारी केलेल्या आदेशांचे हे उल्लंघन आहे.
- केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला गृहमंत्रालयाच्या 19 एप्रिल 2020 आदेशाचे पालन करण्यास सांगितले असून, आंतर मंत्रालयीन पथकांना, त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी, सर्व सुविधा देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत
- कोविड-19 च्या काही रुग्णांच्या प्रयोगशाळेतील चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतरही त्यांच्यात या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याची काही प्रकरणे आढळली आहेत. लक्षणविरहीत प्रसाराची कुठेही नोंद नाही. मात्र, असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संस्थेच्या रिपोर्ट चा हवाला देऊन सांगितले
वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इतर अपडेट्स :
- भारत आणि अफगाणिस्तान कोविड-19चा सामना एकजुटीने आणि सामाईक निर्धाराने करतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्विन, पॅरासेटामोल आणि इतर सामग्रीची मदत केल्याबद्दल अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ. अश्रफ घनी यांनी भारताचे आभार मानले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी केलेल्या ट्वीटला पंतप्रधानांनी उत्तर दिले आहे.
- स्मार्ट शहर योजनेअंतर्गत(smart cities mission SCM) पुणे महानगरपालिकेने संयम नावाचे मोबाईल ॲप बनवले असून त्याद्वारे विलगीकरण केलेले रुग्ण घरातच रहात आहेत अथवा घराबाहेर पडत नाहीत, याची खातरजमा केली जाणार आहे.
- कोविड -19 बद्दल जनजागृती करण्यासाठी, क्षेत्रीय जनसंपर्क विभाग (ROB), माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकार- च्या वतीने, या साथरोगाच्या विविध पैलूंबद्दल माहिती देणारा आणि वापरकर्त्याच्या दृष्टीने चित्ताकर्षक असा डिजिटल मजकूर तयार करण्यात येत आहे.
- 24.3.2020 पासून आजपर्यंतच्या लॉकडाऊन कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत सुमारे 8.89 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला असून यासाठी आत्तापर्यंत 17,793 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
- ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे आर ई सी प्रतिष्ठान, ऊर्जा क्षेत्रातल्या सामाजिक दायित्व निभवणाऱ्या संस्था आणि नवरत्न सीपीएसई यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य करण्यात येत आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांनी काळाची निकड ओळखून मदतकार्याचा वेग वाढवला आहे. यामध्ये तयार भोजनाची पाकिटे, शिधा सामुग्री, जरूरीच्या वस्तू, मास्क, सॅनिटायझर्स आणि ज्यांना कुठेच आश्रय नाही, अशा लोकांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
- “कोविड-19 विरुद्धच्या लढाईत रोटरी सदस्यांनी दिलेले अमुल्य योगदान खरोखरच कौतुकास्पद आहे. पीएम केअर्स निधी आणि रुग्णालयासाठी उपकरणे, सेनिटायझर्स, अन्न, पीपीई संच आणि N95 मास्क इत्यादीसाठी त्यांनी दिलेले योगदान प्रशंसनीय आहे.”आज संपूर्ण देशभरातील रोटरी सदस्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते त्यावेळी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले
- कोविड- 19 महामारीपासून आदिवासी लोकांचे संरक्षण करण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालय सक्रिय झाले असून विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. कोविड-19 महामारीनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठीही या मंत्रालयाच्यावतीने योजना तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्यांनी 15 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
- आयकर विभाग वसुलीची कार्यवाही करीत असून स्टार्ट-अप थकबाकीदारांच्या परताव्यातून त्यांची जुनी थकबाकी वसूल करीत आहे ही समाजमाध्यमांवरील चर्चा पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असल्याचे मत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आज नोंदविले. कर परतावा मिळण्यासाठी पात्र व्यक्ती त्याचबरोबर कर थकबाकीदारांना स्पष्टीकरणासाठी पाठविलेले इ-मेल्स हे छळवणुकीसाठी आहेत असा गैरसमज करून घेऊ नये, असे सीबीडीटीने म्हटले आहे.
- कोविड-19 विरुध्द सुरु असलेल्या लढ्यात सहकार्य करण्याच्या दृष्टीने केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालय सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात वैद्यकीय साधने, उपकरणे आणि इतर वस्तू पोहचवण्यासाठी लाईफलाईन उडान ही मालवाहतूक सेवा देत आहे.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज ‘कोविड इंडिया सेवा' या नागरिक सहभाग मंचाची सुरूवात केली. यामुळे या महामारीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी भारतीयांशी थेट संवाद साधण्यासाठी संवादात्मक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
- देशभर पसरलेल्या कोविड–19 च्या पार्श्वभूमीवर नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने (एमएनआरई) सौर पीव्ही मॉड्यूल आणि सौर पीव्ही सेल्ससाठीच्या मान्यताप्राप्त मॉडेल्स आणि उत्पादक (एएलएमएम) यांच्या याद्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी तारखांची मुदत 30-9-2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे, ती पूर्वी 31-03-2020 पर्यंत होती.
- कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. हे लक्षात घेवून नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून (एमएनआरई) नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांचे काम करणाऱ्या संस्थांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या पीठाचे कामकाज आणि त्यातील सुनावणी 03.05.2020 पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- भारतीय रेल्वेने नुकतेच उन्हाच्या काहिलीत रस्त्यानाक्यांवर कोविड- 19 चा सामना करणाऱ्या दिल्ली पोलिसांना दररोज 10000 पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करायला सुरुवात केली आहे
महाराष्ट्र अपडेट्स
472 नव्या केसेसह महाराष्ट्रातील रुग्ण संख्या 4,676 झाली आहे. घटनास्थळी मूल्यमापन करण्यासाठी आणि आवश्यक ते निर्देश देण्यासाठी केंद्र सरकारच्या दोन आंतरमंत्रालयीन टीम राज्यामध्ये आहेत. मुंबईमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 53 पत्रकारांना एका हॉटेलमध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे
***
DJM/RT/MC/SP/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1616850)
|