• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
नागरी उड्डाण मंत्रालय

कोविड-19 च्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान देत लाईफलाईन उडान विमानांद्वारे 541 टन वैद्यकीय साधने, उपकरणांची देशभर मालवाहतूक

Posted On: 21 APR 2020 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  एप्रिल 2020

 

कोविड-19 विरुध्द सुरु असलेल्या लढ्यात सहकार्य करण्याच्या दृष्टीने केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालय सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात वैद्यकीय साधने, उपकरणे आणि इतर वस्तू पोहचवण्यासाठी लाईफलाईन उडान ही मालवाहतूक सेवा देत आहे. या सेवेअंतर्गत लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत 316 विमानांद्वारे सेवा दिली जात असून, त्यात एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय हवाईदल आणि खाजगी विमानसेवांचा समावेश आहे. यापैकी 196 विमाने एअर इंडिया आणि अलायन्स एअरची आहेत. या सर्व विमानांद्वारे आजवर 541.33 टन मालवाहतूक करण्यात आली असून 3,14,965 किलोमीटर्सचा प्रवास पूर्ण करण्यात आला आहे.

त्यासोबत पवनहंस लिमिटेड हेलिकॉप्टर सेवेद्वारे जम्मू कश्मीर, लदाख, बेटे आणि ईशान्य भारतातील दुर्गम भागात वैद्यकीय माल पोहचवला जात आहे. पवनहंस हेलीकॉप्टरने आतापर्यंत 1.90 टन मालवाहतूक केली असून 6537 किलोमीटर्सचा प्रवास केला आहे.

देशांतर्गत वैद्यकीय मालवाहतुकीत औषधे, वैद्यकीय उपकरणे, चाचण्यांच्या किट्स, पीपीई, मास्क, हातमोजे, HLL आणि  ICMR चे इतर सामान , राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी मागवलेले सामान  आणि टपाल पार्सल यांचा समावेश आहे. 

देशांतर्गत उडान विमानसेवा ‘हब एन्ड स्पोक’ मॉडेलनुसार म्हणजेच या ठिकाणाहून थेट गंतव्य ठिकाणी माल पोहोचण्याचे काम करत आहेत. ईशान्य भारत, बेटांचे केंद्रशासित प्रदेश आणि डोंगराळ भागांमध्ये माल पोचवण्यावर भर दिला जात आहे. एअर इंडिया आणि हवाई दलाने जम्मू आणि काश्मीर, लदाख, ईशान्य भारत आणि बेटांवरील केंद्रशासित प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले आहे. लाईफलाईन उडानसंदर्भातील सार्वजनिक माहिती दररोज या पोर्टलवर अपलोड केली जाते-https://esahaj.gov.in/lifeline_udan/public_info.   

देशांतर्गत मालवाहतूक सेवेत स्पाईसजेट, ब्लू डार्ट आणि इंडिगो या खाजगी विमानकंपन्याही व्यावसायिक सेवा देत आहेत.  इतर सामानासोबतच या कंपन्या सरकारसाठी मोफत वैद्यकीय वस्तूंचीही मालवाहतूक करत आहेत. 

आंतरराष्ट्रीय विभाग :- औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि कोविड-19 साठी मदतकार्यात लागणाऱ्या सामानाची पूर्व आशियात वाहतूक करण्यासाठी मालवाहतूक एअरब्रीज तयार करण्यात आला आहे. यामार्फत भारतातून विविध ठिकाणी पाठवण्यात आलेल्या वैद्यकीय मालवाहतुकीची सविस्तर माहिती खाली दिलेल्या तक्त्यात दिली आहे:

S No

Date

From

Quantity (Tons)

1

04.4.2020

Shanghai

21

2

07.4.2020

Hong Kong

06

3

09.4.2020

Shanghai

22

4

10.4.2020

Shanghai

18

5

11.4.2020

Shanghai

18

6

12.4.2020

Shanghai

24

7

14.4.2020

Hong Kong

11

8

14.4.2020

Shanghai

22

9

16.4.2020

Shanghai

22

10

16.4.2020

Hong Kong

17

11

16.4.2020

Seoul

05

12

17.4.2020

Shanghai

21

13

18.4.2020

Shanghai

17

14

18.4.2020

Seoul

14

15

18.4.2020

Guangzhou

04

16

19.4.2020

Shanghai

19

17

20.4.2020

Shanghai

26

 

 

Total

287

 

आवश्यक त्या वैद्यकीय सामानाची मालवाहतूक करण्यासाठी एअर इंडिया गरजेनुसार इतर देशांमध्ये यापुढेही मालवाहतूक सेवा देत राहणार आहे.

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1616704) Visitor Counter : 145


Link mygov.in