• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
अल्पसंख्यांक मंत्रालय

रमजानच्या पवित्र महिन्यात घरात राहूनच धार्मिक कार्ये करण्याबाबत समाजात सहमती- मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 21 APR 2020 4:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  एप्रिल 2020

आपला देश आणि देशवासियांसाठी धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता ही राजकीय पद्धत (पॉलिटिकल फॅशन) नसून संपूर्णपणे उत्कट भावना आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. ह्या सर्वसमावेशक संस्कृती आणि प्रतिबद्धतेने देशाला विविधतेमध्ये एकता या सूत्राने एकाच धाग्यात बांधले आहे, असे विचार आज नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मांडले. अल्पसंख्याकांसह सर्व नागरिकांचे घटनात्मक, सामाजिक आणि धार्मिक हक्क अबाधित राखण्याची संविधानात्मक आणि नैतिक हमी भारताने दिलेली आहे.

खोटे परंपरावादी आणि व्यावसायिक आक्रमक गट अजूनही चुकीची माहिती पसरविण्यासाठीचे कारस्थान रचत आहेत. अशा दुष्ट शक्तींच्या कटापासून आपण सावध राहिले पाहिजे आणि या षडयंत्राला बळी न पडता एकोप्याने काम करायला हवे असे प्रतिपादन नक़्वी यांनी केले.

चुकीची माहिती पसरविण्याच्या हेतूने केलेली सर्व कारस्थाने आणि कोणत्याही प्रकारच्या खोट्या बातम्या यांच्यापासून सर्वांनी सावध राहायला हवे,असे ते म्हणाले. अशा प्रकारची कारस्थाने आणि अफवा कोरोना विरुद्धचा देशाचा लढा कमकुवत करीत आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती आणि कट-कारस्थानांना बळी न पडता एकत्रितपणे काम करून आपण कोरोना विरुद्धची लढाई जिंकायला हवी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाती,धर्म आणि प्रदेशांच्या सीमा ओलांडून सर्व देशवासीय कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी एकजूट झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

येत्या शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या पवित्र रमजान महिन्यातील सर्व धार्मिक रिती-रिवाज आणि प्रार्थना आपापल्या घरी राहूनच करणार असल्याचा निर्णय मुस्लिम समाजातील सर्व धार्मिक नेते, इमाम, धार्मिक आणि सामाजिक संस्था आणि संपूर्ण मुस्लिम समुदायाने संयुक्तपणे घेतला आहे, अशी माहिती नक्वी यांनी दिली.

पवित्र रमजान महिन्यात संपूर्ण संचारबंदी, कर्फ्यू आणि शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाची कडक आणि प्रामाणिक अंमलबजावणी होईल हे सुनिश्चित करण्यासाठी 30 राज्यांमधील वक़्फ़ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी योजनाबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच स्थानिक

प्रशासनाशी समन्वय आणि सहकार्यातून मुस्लिम समाजातील सर्व धार्मिक नेते, इमाम, धार्मिक आणि सामाजिक संस्था आणि संपूर्ण मुस्लिम समुदाय या नियमांचे पालन करणार आहे, असे ते म्हणाले.

नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्याच आठवड्यात सर्व राज्यांमधील वक़्फ़ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि त्यात संपूर्ण संचारबंदी, कर्फ्यू आणि शारीरिक अंतर राखण्याच्या नियमाची कडक आणि प्रामाणिक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा झाली.

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1616707) Visitor Counter : 181


Link mygov.in