PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश, पूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या 15 राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही: आरोग्य मंत्रालय

रिकामे ट्रक किंवा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील लॉकडाऊन मधून सूट: गृह मंत्रालय

Posted On: 13 APR 2020 8:01PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours and Fact checks undertaken by PIB)

नवी दिल्ली-मुंबई, 13 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 14 एप्रिल 2020 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विविध विद्यापीठांचे कुलागुरु आणि इतर शिक्षणसंस्थांच्या संचालकांशी संवाद साधला. लॉकडाऊन च्या काळात शैक्षणिक वर्षात खंड पडू नये, याची व्यवस्था करावी, अशी सूचना नायडू यांनी यावेळी केली.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या श्रीमती पुण्य सलिला श्रीवास्तव आणि ICMR चे प्रवक्ते श्री रमन गंगाखेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारे सातत्याने काम करत आहेत, एनसीसी आणि एनएसएस चे विद्यार्थी आणि इतर विभागांचे अधिकारी देखील पोलिसांना या लॉकडाऊन ची अंमलबजावणी करण्यात मदत करत आहेत.- गृह मंत्रालय
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्वे संपूर्णत:, जशीच्या तशी पालन करण्याविषयी पत्र लिहिले आहे. या काळात "सर्व" मालवाहू ट्रक्सची(अत्यावश्यक आणि इतरसुद्धा)  आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत अशी दोन्ही प्रकारची वाहतूक करण्यास परवानगी आहे.
  • मालवाहतुकीसाठी वेगळ्या परमीटची किंवा परवानगीची गरज नाही. रिकामे ट्रक किंवा मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना देखील परवानगी आहे. कारण ते मालाची उचल करण्यासाठी जात असतील किंवा माल पोहोचवून परत येत असतील
  • या मालवाहू ट्रक्स मध्ये चालकाशिवाय आणखी एका व्यक्तीला परवानगी आहे. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांना हे ही कळवले आहे की त्यांनी ट्रकचालक आणि त्यांच्या सहाय्यकाला घरापासून ट्रक असलेल्या जागी पोहचण्यास मदत करावी.
  • ज्या संस्थांना कार्यालयीन अथवा व्यावसायिक कामांसाठी परवानगी मिळाली आहे, अशा संस्थांच्या  कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
  • रेल्वे, विमानतळ, सागरी बंदरे आणि सीमाशुल्क अधिकारी यांना त्यांच्या कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना पास देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. हे पास देण्यात आल्याची त्यांनी खातरजमा करावी
  • लॉकडाऊन मधून सवलत मिळालेल्या संस्था किंवा आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांना पासेस देण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाना देण्यात आले आहेत.
  • राज्यांच्या सीमेजवळ असलेल्या उत्पादन कंपन्यांना काम करण्यात काही अडचणी येणार नाहीत, याची काळजी त्यांनी घ्यावी
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या आणि पीठ, डाळी आणि खाद्य तेल यांसारख्या अत्यावश्यक सामग्रीचे उत्पादन करणाऱ्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच अत्यावश्यक आणि इतर गोदामे आणि शीतगृहांना देखील काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे.
  • हॉट स्पॉट आणि कंटेनमेंट एरिया वगळता ह्या सूचना सर्व ठिकाणी लागू असतील.- गृहमंत्रालयाची माहिती
  • मात्र, ही सर्व कामे करतांना सामाजिक अंतराचे नियम आणि योग्य स्वच्छता पूर्णपणे पाळली जावी. ह्या सर्व सूचना सर्व जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पातळीवर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत पोचवाव्यात, असे राज्यांना सांगितले आहे.
  • या उपाययोजनांच्या माध्यमातून आपल्याला लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारच्या अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेता येईल
  • देशात कालपर्यंत कोविड-19 च्या 2,06,212 चाचण्या झाल्या. 14 प्रमुख संस्थाना  प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्याचे काम देण्यात आले आहे, ह्या संस्था इतर सहकाऱ्यांना  प्रशिक्षण देतील आणि आणखी प्रयोगशाळा उभारण्याची गरज आहे का, ते ही तपासून बघतील- ICMR
  • सध्याच्या काळात उपलब्ध असलेला साठा आणि चाचण्यांचा विचार करता आपल्याला काळजीचे कारण नाही, आपण सहजतेने सहा आठवडे चाचण्या करू शकतो – ICMR
  • केंद्रीय आरोग्य ,स्वच्छता आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन आणि CSIR यांनी त्यांच्या 38 लॅब्ससोबत, कोविड19 विषयीच्या संशोधनाचा आढावा घेतल्यानंतर, त्या आधारे एक कोअर धोरण गट बनवला आहे.
  • कोअर धोरण गट डिजिटल आणि मॉलिक्युलर देखरेख, जलद आणि किफायतशीर निदान, नवी औषधे, औषधांचा इतर आजारांसाठी वापर आणि संबंधित उत्पादन प्रक्रिया यावर काम करत आहे.
  • CSIR च्या प्रयोगशाळा सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रांतील विभागांसोबत एकत्रित काम करत असून, मध्यम आणि लघु उद्योग तसेच मंत्रालयांचेही सहकार्य घेत आहेत.
  • 27 राज्यातील 78,000 हजार स्वयं सहायता गट सदस्यांनी राज्य ग्रामीण आजीविका अभियानाअंतर्गत आतापर्यंत 1.96 कोटी मास्क तयार केले आहेत.
  • एनसीसी योगदान उपक्रमांतर्गत, एनसीसी छात्र नागरी प्रशासनाला मदत करत आहेत, कोविड-19 च्या विरोधातील लढ्यात 50,000 हून जास्त लोकांनी त्यांची सेवा उपलब्ध करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे
  • पंतप्रधान म्हणाले होते, की "जान भी हैं जहाँ भी हैं", या उक्तीला कृतीची जोड मिळाली आहे. आतापर्यंत 30 कोटी लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 28,256 कोटी रुपयांची थेट आर्थिक मदत मिळाली आहे.
  • देश लॉकडाऊनमध्ये असला तरीही लोकांच्या उदरनिर्वाहाचे देखील रक्षण झाले पाहिजे याची आम्ही काळजी घेत आहोत
  • आतापर्यंत कोविड19 चे देशभरातील पॉझिटिव्ह रुग्ण -9,152 गेल्या 24 तासांत- 796 नवे रुग्ण, 35 मृत्य, 141 रुग्ण कोरोनामुक्त आतापर्यंत एकूण 857 रुग्ण कोविड-19 च्या आजारातून बरे झाले आहेत. एकूण 308 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे, प्रत्यक्ष कार्यस्थळी एक सकारात्मक परिणाम दिसला आहे. 15 राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकाही पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडलेली नाही. त्यापूर्वी या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.
  • लाईव्ह रुग्ण ट्रॅकिंग साठी, रुग्ण व्यवस्थापन आणि कंटेनमेन्ट योजनेच्या अंमलबजावणी व देखरेखीसाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करतो आहोत.- त्वरित प्रतिसादासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाची माहिती  
  • पॉझिटिव्ह पुष्टी झालेल्या रुग्णांसाठी, सक्रिय हस्तक्षेप विभाग निर्धारित करण्यासाठी, प्रतिबंधात्मक योजनेचा अवलंब करण्यासाठी जीआयएस मॅपिंगचा वापर केला जात आहे; भविष्यात उपाययोजना करण्याची गरज असलेले विभाग ठरवण्यासाठी हीट मॅप्स आणि प्रेडिक्टिव डेटा अॅनॅलिसिसचा वापर करण्यात येतो.
  • एकात्मिक आदेश केंद्रांद्वारे रॅपिड रिस्पॉन्स टिम्स आणि रुग्णवाहिका तसेच विलगीकरण व्यवस्थापन केले जात आहेत. काही जिल्ह्यात, जिथे औषधांची दुकाने जोडली आहेत, तिथे दूरस्थ डिजिटल वैद्यकीय सल्ला आणि उपचार केले जात आहेत.
  • आरोग्य सेतू अॅप सुरु करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांना कोविड19 च्या धोक्याविषयी स्वयंमूल्यांकन करता येईल. ज्यामुळे, ते जर एखाद्या संसर्गित रुग्णाच्या संपर्कात आले असतील, तर त्यांना त्याविषयी अलर्ट केले जाईल. आतापर्यंत 3.5 कोटी लोकांनी  अॅप डाउनलोड केले आहे.
  • आरोग्य सेतू अॅप ब्लूटूथ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते, कृपा करून हे अॅप डाऊनलोड करा आणि त्याचा उपयोग करा
  • गेल्या 11 दिवसांत, भारतीय रेल्वेने 1.9 लाख वॅगन कोळसा आणि 13,000 पेट्रोलियम पदार्थांच्या वॅगनची मालवाहतूक केली आहे, एका वॅगनमध्ये साधारण 58-60 टन माल असतो.- पत्र सूचना कार्यालय प्रधान महासंचालक यांनी माहिती दिली.  
  • विज्ञानामध्ये पुराव्याचे सामर्थ्य सर्वाधिक महत्त्वाचे असते; कोविड-19 चा संसर्ग बुटांमधून होतो, हा दावा करण्यासाठी खूप भक्कम पुराव्याची गरज आहे. केवळ एका बातमीच्या आधारे या तर्काचा स्वीकार करता येऊ शकत नाही- ICMR
  • कोणत्याही व्यक्तीला कोविड19 चा संसर्ग झाल्याची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांना, त्यांच्या लक्षणांनुसार, त्यांची नेमकी परिस्थिती आणि समर्पित कोविड रुग्णालयांविषयी वैद्यकीय मार्गदर्शन केले जाईल.
  • कोविड-19 च्या उपचारासाठी  remdesivir च्या वापरासंदर्भात अलीकडेच केलेल्या अभ्यासाबाबत जे वृत्त आले आहे, ती एक वैद्यकीय चाचणी नसून  केवळ एक निरीक्षणात्मक अभ्यास आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या Solidarity Trial च्या माध्यमातून आपल्याला पुढील घडामोडी समजतील.

 

वरील पत्रकार परिषदेचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

Fact Check on #Covid19

https://pbs.twimg.com/profile_banners/231033118/1584354869/1500x500

https://pbs.twimg.com/profile_banners/231033118/1584354869/1500x500

***

 

DJM/RT/MC/SP/DR



(Release ID: 1614088) Visitor Counter : 348