PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र


देशात आज किंवा भविष्यातही हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा तुटवडा जाणवणार नाही: आरोग्य मंत्रालय

महामारीच्या विरोधातील लढ्यात केंद्राबरोबर एकत्रितपणे काम करण्याच्या राज्य सरकारांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 08 APR 2020 7:40PM by PIB Mumbai

 

Delhi-Mumbai, April 8, 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संसदेतील राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जग सध्या कोविड -19  च्या गंभीर आव्हानाचा सामना करत आहे. सध्याची परिस्थिती मानवजातीच्या इतिहासामधील एक युग बदलणारी घटना आहे आणि त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी आपण विकसित होण्याची गरज आहे. या महामारीच्या विरोधातील लढ्यात केंद्राबरोबर एकत्रितपणे काम करण्याच्या राज्य सरकारांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या लढाईत संयुक्त आघाडी उघडण्यासाठी देशातील सर्व राजकारण्यांनी एकत्रित येऊन विधायक आणि सकारात्मक राजकारण केल्याचे सम्पूर्ण देशाने पाहिले, असे त्यांनी नमूद केले.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवर पत्रकार परिषद 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.

  • आतापर्यंत एकूण 402 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. एकूण रुग्णसंख्या - 5,194. एकूण मृत्यू - 149 गेल्या 24 तासात - 773 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू
  • देशात आज किंवा भविष्यातही हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा तुटवडा जाणवणार नाही, त्याच्या साठ्यावर सर्वोच्च पातळीवर देखरेख ठेवली जात आहे. त्याचवेळी, HCQ हे केवळ काही विशिष्ट लोकांसाठीच आहे, त्याचा वापर नोंदणीकृत डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शननुसारच केला जावा
  • मनुष्यबळ मंत्रालयाने कोविड19 च्या लढाईत पहिल्या फळीत असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी क्षमता बांधणीच्या दृष्टीने ऑनलाइन प्रशिक्षण मॉड्युल विकसित केले आहे.
  • कोविड19 च्या संशयित रुग्ण अथवा त्याचा संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आरोग्य मंत्रालय डॉक्टरांसाठी एक नवे प्रशिक्षण मॉड्युल विकसित करत आहे. या अंतर्गत अशा महिलांवर गर्भवतीकाळात आणि प्रसूतीकाळात योग्य ते उपचार करता येतील.
  • आपण एका संसर्गजन्य आजाराचा सामना करत आहोत, त्यामुळे आपण एका परिसरात जरी अपयशी ठरलो, तरीही त्याचा आपल्या संपूर्ण प्रयत्नांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच, आमची पुनःपुन्हा सगळ्यांना विनंती आहे की लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या उपाययोजना यशस्वी होण्यासाठी सर्वांनी पूर्ण सहकार्य करावं.
  • कोविड19 च्या लढाईत भारतीय हवाई दल सर्व राज्यांमध्ये वैद्यकीय वस्तू आणि औषध पुरवठा करत असून, राज्यांना आवश्यक त्या सर्व गोष्टी पोचवल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांत भारतीय हवाई दलाने मणिपूर, नागालँड, गंगटोक, जम्मू-कश्मीर आणि लडाख इथे सामान पोचवले आहे. तर लाईफलाईन उडान अंतर्गत 39 टन सामान पोहोचवले गेले
  • कोविड2019 च्या देशभरातील रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे आहेत. आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करण्याच्या दृष्टीने, कोविड केअर सेंटर्स सुरु केली जाणार असून त्यात या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जलद गतीने काम केले जाणार आहे. यासाठी, हॉटेल्स, लॉजेस, इत्यादीचा वापर करता येईल
  • त्याशिवाय, गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात समर्पित  कोविड हेल्थ सेंटर्स आणि कोविड हॉस्पिटल्स उभारण्यासाठी राज्यांसोबत समन्वयाने आवश्यक पावले उचलली जात आहेत
  • कोरोनासंक्रमण साखळी तोडण्यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारे विविध उपाययोजना करत आहेत, जसजशी रुग्णांची संख्या वाढते आहे, त्यानुसार त्या त्या भागात सुसंगत प्रतिसाद आणि सज्जता केली जात आहे. आमची मार्गदर्शक तत्वे आणि कंटेंनमेंट प्लॅन याचा वापर करुन कोरोनावर आळा घातला जात आहे.
  • मध्य पुणे आणि कोंढवा भागात 35 चौ किमी मध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे, आरोग्याच्या समस्या असलेल्या आणि परदेश प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तींची तपासणी पथके करत आहेत आणि त्यांना आवश्यक सेवा दिल्या जात आहेत 
  • केरळच्या पत्तननतिट्टा इथे प्रशासन टेहळणी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहे, वॉर रुमसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे, विलगीकरणात असलेले क्लस्टर्स आणि घरे यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. या सर्वांना मानसिक आधार/समुपदेशन देखील दिले जात आहे.
  • राज्य सरकारांनी हॉट स्पॉट भागात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत, पोलिसांची देखरेख अधिक कडक केली आहे, समुदायाच्या नेत्यांच्या मदतीने जनजागृतीमध्ये वाढ केली जात आहे
  • बाजारपेठा, बॅंक्स आणि इतर भागात  सामाजिक अंतराची अंमलबजावणी करण्यासाठी, जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना, जसे परिसराचे मॅपिंग आणि भाग सील करणे, याचा अवलंब करत आहेत
  • विशेषतः काळाबाजार आणि साठेबाजीच्या घटना लक्षात घेता, गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना,अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 चा उपयोग करतजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवण्याविषयी निर्देश दिले आहेत.
  • इमारत आणि बांधकाम मजूर कल्याण निधीपैकी 1.7 लाख कोटी रुपयांचे, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पॅकेज दिले असून, सर्व राज्यांनी त्यातून 3.5 कोटी मजुरांना आर्थिक मदत करावी,असे निर्देश दिले आहेत; राज्यांनी त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे- केंद्रीय गृहमंत्रालय
  • 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी आधीच 1,000 रु. - 6,000 रु. पर्यंतच्या रोख रक्कम हस्तांतरण योजना जाहीर केल्या आहेत; 2 कोटींहून जास्त कामगारांना 3,000 कोटी रु. देण्यात आले आहेत; 29 लाख कामगारांना अन्नाची देखील मदत करण्यात आली आहे
  • आतापर्यंत कोविड19 च्या 1,21,271 लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत; काल 13, 345 चाचण्या काल करण्यात आल्या. ICMR अंतर्गत 139 प्रयोगशाळा कार्यरत आहेत, तसंच 65 खाजगी प्रयोगशाळांना  कोरोनाच्या चाचण्या करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • सामाजिक अंतराच्या उपायांचा अंगिकार करून वर्तनात महत्त्वाचा बदल करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, रुग्णालयात संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण उपायांचा योग्य प्रमाणात अवलंब करण्यासाठी देखील आम्ही फिल्ड पातळीवर प्रशिक्षण भक्कम करत आहोत
  • आम्ही सर्व राज्ये आणि जिल्ह्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि निरीक्षणावर भर देण्यास सांगितले आहे, तसेच रुग्णालये अद्ययावत करण्याचेही निर्देश दिले आहेत. आपल्याला लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या अंमलबजावणीविषयी कायम दक्ष राहायचं आहे, हा आपला रोजचा लढा आहे.
  • कोविड19 चा प्रादुर्भाव आणि मृत्यूदर रोखण्यासाठी लवकरात लवकर पॉझिटिव्ह रुग्णांची ओळख पटणे अत्यंत आवश्यक आहे, आणि रुग्णांची ओळख पटण्यासाठीसामुदायिक सहकार्याची भूमिका महत्त्वाची आहे.

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Other updates:

 

 

महाराष्ट्रातील अपडेट्स

कोविड-19विरुद्दच्या युद्धात शासनासोबत काम करू इच्छिणाऱ्या आरोग्य सेवेतील व्यक्तींबरोबरच या क्षेत्रातून निवृत्त झालेले, प्रशिक्षण घेतलेल्यांनी आपले नाव, पत्ता covidyoddha[at]gmail[dot]com  या ई-मेल वर कळविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

https://pbs.twimg.com/profile_banners/231033118/1584354869/1500x500

***

 

DJM/RT/MC/SP/PK



(Release ID: 1612328) Visitor Counter : 314