• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालयाच्या उपचार पध्दतीची कोविड-19 संसर्गावरील उपचारांच्या शोधकार्यातील भूमिका

Posted On: 24 APR 2020 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24  एप्रिल 2020

कोविड-19 संसर्गाचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीमध्ये आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या विविध उपायांच्या तसेच औषधांच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या संशोधन प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यासाठीची योजना आयुष मंत्रालयाने जाहीर केली आहे.

आयुष मंत्रालयाच्या कार्यकक्षेत नसणाऱ्या आणि कोविड-19 प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांवरील उपचारांशी संबंधित यंत्रणा राबविणाऱ्या संस्था तसेच रुग्णालयांकडून या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. SARS-CoV-2 संसर्ग तसेच कोविड-19 आजार यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि औषधोपचार यांची भूमिका आणि या उपचार पद्धतीचे परिणाम यांच्याशी हे प्रस्ताव संबंधित असणे अनिवार्य आहे.

संबंधित संस्थेच्या आचारसंहिता समितीची मंजुरी मिळालेल्या आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांचा कालावधी असलेल्या प्रकल्पांना आयुष मंत्रालयाकडून 10 लाख रुपयांचे आर्थिक पाठबळ मिळू शकेल. हा निधी आयुषचे वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञान विभाग कर्मचारी, प्रयोगशाळेतील विविध चाचण्या आणि प्रकल्पाशी संबंधित इतर आकस्मिक खर्चासाठी वापरात आणणे अपेक्षित आहे.

इच्छुक संस्थांना या योजनेचे तपशील https://main.ayush.gov.in/event/mechanism-support-short-term-research-projects-evaluating-impact-ayush-interventions-cum. या वेबपेज वर मिळू शकतील. यासाठीचे प्रस्ताव फक्त ई मेलद्वारे पाठविता येणार आहेत. त्यासाठी emrayushcovid19@gmail.com.येथे मेलद्वारे प्रस्ताव पाठवावे. प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख  1मे 2020 आहे. 

 

B.Gokhale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com



(Release ID: 1617792) Visitor Counter : 191


Link mygov.in